हा तर वेड्यांचा बाजार

बऱ्याचदा लोक मनोविकार दडवून ठेवतात. एका सर्वेनुसार दर सात मागे एक भारतीय गंभीर विकाराने पीडित आहे. यात फवत भारतीयच नाहीत; तर पाश्चात्य देशातही मनोविकारांची संख्या मोठी आहे. मनोविकारांचे प्रमाण सन २००० सालापासून दुप्पट झाले होते, त्यात २०१४ पासून मोठी वाढ झाली आहे. एका आकडेवारीनुसार सध्या देशात जवळपास दोन लाख लोकांनी आत्महत्या केल्या आहेत. देशात दररोज किमान ५०० होतात. त्यांच्यावर योग्य उपचार करणे गरजेचे असले तरी, मनोचिकित्सक किंवा सायकालॉजिस्ट तेवढे नाहीत.

काळ बदलतो तशी, परिस्थिती बदलते, बदलत्या काळानुसार माणसांची मानसिकताही बदलते. सध्याच्या काळात प्रत्येकजण आपल्या आरोग्याविषयी सजग झाला आहे. कालानुरुप परिस्थितीप्रमाणे लहानापासून वयस्करापर्यंत सर्वच जण आपली, आर्थिक मानसिक व शारीरिक स्थिती चांगली ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहे. म्हणतात ना.. मन निरोगी तर सगळे चांगले ते योग्यच आहे. आपली मानसिक स्थिती चांगली असेल तर काहीही अशवय नसते. पण सध्याच्या काळातील वाढत्या तणावाचा परिणाम मेंदूवर होत असून, मानसिक आरोग्याबाबत जागरुक होण्याची गरज आहे.

शारीरिक आरोग्याकडे आपण जेवढे लक्ष देतो तेवढे मानसिक आरोग्याकडे देत नसल्याची वस्तुस्थिती आहे. मनोविकाराकडे दुर्लक्ष करणे किंवा त्यावर उपचारांत हयगय करण्याचे परिणाम गंभीर होतात. मनोविकाराने पीडितांची संख्या कोरोना महामारीनंतर वाढली असून, नैराश्यासारख्या मनोविकाराने पीडितांची संख्या दिड ते दोन पटीने वाढली आहे. नैराश्य अथवा चिंतेसारखे विकार टोकाला गेल्यावरच लोक उपचारासाठी जातात. विकाराची लक्षणे दिसायला लागल्यावरच उपचार सुरु करणे योग्य असते. मात्र आजही लोक मनोविकार दडवून ठेवतात. एका सर्वेनुसार दर सात मागे एक भारतीय गंभीर विकाराने पीडित आहे. यात फवत भारतीयच नाहीत; तर पाश्चात्य देशातही मनोविकारांची संख्या मोठी आहे. मनोविकारांचे प्रमाण सन २००० सालापासून दुप्पट झाले होते, त्यात २०१४ पासून मोठी वाढ झाली आहे. एका आकडेवारीनुसार सध्या देशात जवळपास दोन लाख लोकांनी आत्महत्या केल्या आहेत. देशात दररोज किमान ५०० होतात. त्यांच्यावर योग्य उपचार करणे गरजेचे असले तरी, मनोचिकित्सक किंवा सायकालॉजिस्ट तेवढे नाहीत.

तज्ज्ञांच्या मते शरीरांतर्गत दोषामुळे जसे आजार होतात तसेच मेंदूची कार्यप्रणाली बिघडल्यावर मनोविकार होतात. मेंदूत येणाऱ्या विचारांचा प्रभाव त्याच्यावर पडतो. त्यात सुशिक्षितांचे प्रमाण जास्त आहे. त्यातच शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य किंमत न मिळाल्यामुळे ते कर्जबाजारी होतात. कर्जाच्या परतफेडीचा ताण त्यातच घरच्या जबाबदाऱ्या, मुलांचे शिक्षण इतर अनेक कारणे आहेत. तरुणांना चांगले शिक्षण घेऊनही योग्य ती नोकरी  मिळत नसल्याने व घरच्या जबाबदारीत वाटा उचलता येत नसल्याने त्यांच्यावर मानसिक ताण येत आहे. काहीजण त्यातही स्वतःला काही प्रमाणात सावरतात, मात्र कमजोर मनाचे तरुण आत्महत्येचा विचार करताना दिसून येतात. खरंतर आत्महत्या त्यावरचा उपाय नाही. ते भेकडपणाचे लक्षण आहे. हे सर्व खरे असले तरी परिस्थिती त्यांना नीट जगू देत नाही.

करिअरमध्ये चांगली प्रगती करणाऱ्यांना नैराश्याची समस्या नसल्याचा गैरसमज आहे. त्यांनाही या समस्येला सामोरे जावेच लागते. या देशात अनेकजण नोकरीधंद्यात आहेत, पण त्यांनाही आपले जीवन दिशाहिन असल्याची जाणीव होताना दिसते. अनेकांना आपल्या आयुष्यात खूप सहन करावे लागते. चांगल्या कंपनीत चांगल्या पगारावर असलेल्यांनाही, कामाचा ताण व बॉसची किरकिरी सहन होत नाही. परिणामस्वरुप ते नैराश्याच्या गर्तेत जातात. या सर्वांचा परिणाम त्यांच्या जीवनशैलीवर होतो. या बाबतीत सरकार काही अंशी प्रयत्नशील असल्याचे सांगितले जाते. मात्र ते सर्व कागदोपत्रीच पहायला मिळते. ग्राऊंड लेवलवर त्याचे परिणाम दिसत नाहीत.

एका व्यवतीने केलेल्या आत्महत्येचा प्रभाव १३५ लोकांवर पडतो. त्यात आत्महत्या केलेल्या, व्यवितचे कुटूंबीय, जवळचे नातलग, मित्र आणि कार्यालयीन सहकाऱ्यांचा समावेश होतो. मनोविकारांतून आत्महत्या अथवा हत्येसारख्या घटना घडतात. ती व्यवती हत्या करेल की आत्महत्या हे तिच्या मानसिक स्थितीवर अवलंबून असते. सामुहिक आत्महत्येचे उदाहरण पहा. नैराश्याने पिडलेली एखादी माता आत्महत्या करते आणि तिच्या मुलांनाही ती सोडत नाही. एखादी व्यवती नैराश्यावर उपचार घेत असताना आत्महत्या करते म्हणजे या घटनेला तिचे नैराश्य जबाबदार आहे असे नाही.

कर्जात बुडालेल्या आणि भविष्यात काहीही चांगले होण्याची आशा नसलेल्या एखाद्या व्यवतीचा विचार करा. आपल्याला तुरुगात जावे लागेल किंवा आपले कुटूंबिय अपमानित होईल असे त्या व्यवतीला वाटते तेव्हा तिला काय पर्याय योग्य वाटतो याची कल्पना करा. ती व्यवती आत्महत्येचा विचार करेल. पण त्यामुळे आपल्या कुटूंबीयांना वाईट वाटेल याची जाणीवही तिला असेल. अशा वेळी ती व्यवती द्विधा मनःस्थितीत सापडून काय करावे हे तिला समजत नाही. वाढत्या अनिश्चिततेमुळे ती उदास व्हायला लागते आणि त्याचा परिणाम शारीरिक आरोग्यावर होतो. अशा व्यवती एवढ्या दुर्बल होतात की, त्यांना हत्या अथवा आत्महत्या करणेही शवय होत नाही. नैराश्यग्रस्त लोक उपचारानंतर आत्महत्या करत असल्याचेही दिसून आले आहे.

त्यासाठी समाजानेच त्यांचे आरोग्य जपले पाहिजे आणि त्यातही लहान मुलांकडे जास्त लक्ष द्यावयास हवे. मुलांमधील स्मार्टफोनचा वाढता वापर त्यांच्या मानसिक आरोग्याला धोवयाचा ठरतो. स्मार्टफोनच्या आहारी गेलेल्या मुलांकडून तो काढून घेतला, तर ती संतापतात किंवा आक्रमकही होतात. त्यावर उपाय म्हणजे मूल सव्वा तीन वर्षाचे होईपर्यंत तिला किंवा त्याला स्मार्ट फोनपासून दूर ठेवणे. त्यांनी हट्ट केला तरी समजूत काढून, अन्य कशात रमवून ही सवय तोडली पाहिजे. मुले दिवसभरात एक दोन तासच गॅजेटस्‌ वापरतील अशा पध्दतीने त्यांची दिनचर्या आखा. डिजिटल स्क्रीनवर मुले काय पाहतात यावरही पालकाचे लक्ष हवे. मुलांची भूक आणि झोपेवर परिणाम होतो. वारंवार आत्महत्येचा विषय किंवा इतर कोणतेही नकारात्मक विषय बोलण्यात येणे किंवा आणणे टाळले पाहिजे.

घरात आई-वडिलांनी कर्कश आवाजात किंवा भांडण्याच्या मुडला टाळले पाहिजे. पण सध्याचे आई-वडिल किंवा घरातील वडीलधारी मंडळी या ना त्या विषयावरुन वादंग निर्माण करणारी ववतव्ये करत असतात. त्याचाही मुलां-मुलींवर परिणाम होतो.लहान मुलांचे सोडाच, सध्या माध्यमिक, उच्च माध्यमिक किंवा कॉलेजला जाणारी मुले-मुली आपला कामधंदा सोडून, अभ्यास वा होमवर्क सोडून दिवसाचा बराचसा वेळ मोबाईलमध्ये बोटे चालवताना दिसतात. त्यातही त्यांचे लक्ष अश्लील गॅजेटस्‌वर असल्याचे दिसते. त्याच बरोबर ॲडल्स चित्रपट किंवा मालिकांवर ही तरुण मंडळी गर्क असल्याचे दिसते. त्याचाही मनावर काही ना काही परिणाम होतोच. हाणामाऱ्या किंवा वाईट संगतीत राहिल्यामुळे त्यांचाही कल अशा गोष्टीकडे वाढतो. त्यांना हिरोपेक्षा व्हिलन आवडू लागतो. कारण व्हिलन आपल्या टपोरी मित्रांच्या गराड्यात दिसतो, त्यातच त्याचे माजोरे शॉक, सिगारेट, दारु किंवा नशीले पदार्थ सेवन करुन आपली शान शौकत दाखवीत असतो. त्या व्हिलनचे नखरे त्याच्या बापजाद्याच्या हरामाने कमावलेल्या पैशावर चालतात. मुलांनाही आपल्या बापजाद्याकडून अशाच प्रकारची वागणूक व पैसा मिळावा अशी अपेक्षा असते, पण कष्टाने मिळवणारी मंडळी, मुलांचे हे शौक पुरे करण्यास असमर्थ असतात. अशावेळी मुलांचा राग त्यांच्यावर ओढवतो. अशा वेळी आपल्या मागण्या मान्य न झाल्यास, मुले संतापून तो राग आई-बाप किंवा आजोबा-आजीवर काढतात. प्रसंगी शिवीगाळ वा मारहाण करण्यासही ही मंडळी कमी करत नाहीत.

कधी कधी तर आपल्या शौकासाठी खून करण्यापर्यंतही जातात. असे म्हणतात ना ‘रिकामे मन सैतानाचे घर' सध्या तर आपल्या देशात बेकारांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. शिकुन डिग्रया मिळवूनही हाताला काम नाही. रिकामा वेळ फवत आणि फवत मोबाईलवरच घालवला जातोय. त्यामुळे तरुणाईची मोठी गोची झाली आहे. त्यातच राजकारण्यांनी आपल्या स्वार्थासाठी तरुणाईच्या मनात जातीय आणि धार्मिक अस्मितेचे भूत सोडले आहे. बहुतेक तरुण तरुणी जाती-जातीत, धर्मा-धर्मात विभागले जात आहेत. त्यांची कट्टरता वाढताना दिसत आहे. त्यातूनच मॉब लिंचिंगचे प्रकार वाढताना दिसत आहेत. बहुतेक राजकारणी स्वार्थासाठी या तरुण तरुणीचा वापर करत आहेत. तरुणाईला थोडेसे आमिश दाखवून व थोडासा पैसा खर्च करुन आपल्या षडयंत्रात गुंतवत आहेत व त्यांच्याकडून समाजविघातक कार्य करवून घेत आहेत. या गर्तेत  अडकलेली मंडळी मानसिक आजाराची शिकार होत आहेत. काही काळापूर्वी म्हणजेच प्राथमिक शिक्षणात असताना हीच मुले म्हणायची, ‘भारत माझा देश आहे आम्ही सर्व भारतीय एक आहोत. वर्गातील मुले माझे भाऊबंद आहेत, तर मुली बहिणी समान आहेत.' आता असे काय झाले की, मुली या बहिणी राहिल्या नाहीत वा मुले भाऊ राहिले नाहीत. उलट हा या जातीचा तो त्या जातीचा, हा हिंदू तो मुसलमान, हा शीख, तो बौध्द, हा वरच्या जातीचा तो खालच्या जातीचा यातूनच भेदभाव दिसून येतो, हा भेदभाव कमी करण्याऐवजी राजकीय मंडळी तो वाढवत आहेत.

आमचे सरकार सतत म्हणते, मुलींना वाढवले पाहिजे, त्यांना शिक्षण दिले पाहिजे. त्यांचा आत्मसन्मान वाढवला पाहिजे. त्यांना सशवत केले पाहिजे. मात्र प्रत्यक्षात काय होत आहे. महिला-मुलींवर अत्याचार वाढले आहेत. सामूहिक बलात्काराचे प्रकारही वाढले आहेत. जागोजागी महिला मुलींना अपमानीत केले जात आहे. त्यांच्यावर शारीरिक, मानसिक दबाव टाकला जात आहे. असा दबाव टाकणारी मंडळी खुले आम वावरत आहेत आणि त्यांना महिला राजकारणीही काही बोलत नाहीत.

त्या मुक प्रकारे दुजोराच देताना दिसतात. म्हणूनच म्हणावे लागते की, सध्याची राजकारणी मंडळीही मनोरुग्णाच्या मालिकेत शिरली आहे काय? यांच्यावर उपचार कोण आणि कधी करणार? अरे हा तर वेड्यांचाच बाजार.
-भिमराव गांधले 

 

 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

चैत्र गुढी पाडवा आणि चैत्री नवरात्रीचे आध्यात्मिक महत्व