मार्ग योग्यतेचा आणि यशाचा

सरळ मार्ग शक्यतो फक्त प्रवासात असावा वाटतो; परंतु आयुष्याच्या प्रवासात तो जास्तीत जास्त वाकडा कसा होईल याकडेच प्रत्येकाचे लक्ष असते. कारण आहे आपल्यातील अहंकार. खरे समाधानाचे सत्य हे आपल्या कर्तव्यात असायला हवे, जेथे तुलना होते तेथे समाधान हरवते आणि जेथे समाधान असते तेथे तुलना होतच नाही. प्रत्येकाच्या नशिबात असणारे त्याला मिळणारच आहे, कारण त्याच्याकडून तशीच कर्तव्ये करून घेतली जातात. पण दुसऱ्यांच्या आयुष्यातील आनंद हे जर आपले दुःख असेल तर आपल्याला आपला स्वतःचा आनंद कधीच मिळणार नाही.

रोजच्या जीवनातील घडणाऱ्या घटनांचे कथन करताना नकोत त्या विचारांना अनन्यसाधारण महत्व असते. प्रत्येक घटनेमागे काही ना काही कारण असते, त्यातून तुम्हाला पुढील आयुष्याची दिशा मिळत असते, योग्य अयोग्य, सत्य असत्य, चांगले वाईट अशा विभिन्न प्रकारच्या माध्यमातून त्याची उपयुक्तता ठरवली जाते. प्रत्येकाला चालण्यासाठी हजार मार्ग असतात. परंतु जर तुम्हाला सूर्यासारखे व्हायचे असेल तर तुम्हाला ते सर्व काही करावे लागेल, नव्हे तर सूर्यासारखे जळावेच लागेल.

जीवनात यशस्वी होण्यासाठी स्वतःमध्ये व्यवहारिक दृष्टिकोन असायलाच हवा, प्रत्येक क्षेत्रात प्रामाणिकपणे काम करता आले पाहिजे, नैतिकता विसरून चालणार नाही. एवढेच काय तर सद्या लाच घेणे हा अन्याय आहे हे तत्व देवाने माणसासाठी निर्माण केले, परंतु माणसाने आपल्या सोयीनुसार ते बदलले... लाच घेणे हे इतर उत्पन्न आहे अशा प्रकारे त्याची प्रतिमा किंवा उपजीविकेचे साधन म्हणून पुढे आणले...हाच फरक आहे देवाचे तत्व आणि माणसाच्या कृतीत...आयुष्यभर दान, त्याग, तपश्चर्या, ज्ञान जेव्हा निरुपयोगी होते तेंव्हा तुमच्या आतल्या अहंकाराचे बी अंकुरू लागते. आणि मग त्याचा उद्रेक झालेला दिसतो.

जीवन खरोखर सोपे आहे, परंतु आम्ही ते गुंतागुंतीचे बनविण्याचा आग्रह धरतो. सरळ मार्ग शक्यतो फक्त प्रवासात असावा वाटतो; परंतु आयुष्याच्या प्रवासात तो जास्तीत जास्त वाकडा कसा होईल याकडेच प्रत्येकाचे लक्ष असते. कारण आहे आपल्यातील अहंकार. एक गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे दुसरी संधी देणाऱ्या फक्त कथाच असतात आयुष्य नाही, जीवन नाही. खरे समाधानाचे सत्य हे आपल्या कर्तव्यात असायला हवे, जेथे तुलना होते तेथे समाधान हरवते आणि जेथे समाधान असते तेथे तुलना होतच नाही. प्रत्येकाच्या नशिबात जे असणार आहे ते त्याला मिळणारच आहे, कारण त्याच्याकडून तशीच कर्तव्ये करून घेतली जातात. पण दुसऱ्यांच्या आयुष्यातील आनंद हे जर आपले दुःख असेल तर आपल्याला आपला स्वतःचा आनंद कधीच मिळणार नाही. हेही तितकेच सत्य आहे. आपण जे इतरांना देतो ते आपल्याकडे परत येते, मग तो आदर असो, सन्मान असो वा विश्वासघात असो,  जो माणूस सतत दुःखात रडतो आणि स्वतःचा कम नशिबीपणा समोरच्याकडे मांडण्याचा प्रयत्न करतो, त्याच्या दारात उभा असलेला आनंदही बाहेरूनच परत जातो. माणूस म्हंटल्यावर चुका होणार, चुकतो तोच माणूस, जर आपण चुका केल्या नाहीत तर आपण माणूस नाही तर जनावर आहे. परंतु त्याच त्याच चुका करणे म्हणजे आपण माणूस म्हणून घेण्याच्या लायकीचे राहत नाही. कदाचित जनावराच्या पुढच्या जतित्तले आहोत असे म्हणायला हरकत नाही. कारण चूक झाल्यावर क्षमा मिळते, विश्वासघात झाल्यावर नाही. कोणतीही व्यक्ती तुमच्याकडे तीन कारणांसाठी येते, पहिले कारण म्हणजे प्रभाव, दुसरे कारण म्हणजे  भावना आणि तिसरे कारण म्हणजे अभाव!!  हे अजिबात विसरू नका.

सूर्याची किरणे असोत की आशेची किरणे असोत ती जेव्हा जेव्हा ते बाहेर येतात तेव्हा प्रत्येकजण अंधाराला दूर करण्याचा प्रयत्न करत असतो आणि हीच आशा जगण्याची नवी उमेद घेऊन पुढील वाटचाल करत असते. ज्याला आशा आहे त्याला लाख वेळा हरवूनही तो हरत नाही पण ज्याला आशा नाही, ज्याच्याकडे ध्येय नाही त्याला जिंकूनही हारच मिळालेली असते.

या नवीन जमान्यात परिणामांचा विचार केला तर आनंदाचा अभाव आहे  आणि पूर्वीच्या काळात परिणामातच आनंद मिळत होता खूप कमी एवढेच काय तर आनंदात सुद्धा परिणामांची कमतरता आहे हेच मोठे दुर्दैव आहे.

 गरुडाचे उंच उडणे पाहून चिमणीसुध्दा कधीच उदास होत नाहीत, परंतु माणसाचे उड्डाण पाहून माणूसच सर्वात जास्त लवकर उदास होतो. यासारखे मौलिक सत्य नाही. याला कारण तुलना, जळफळाट, एकमेकांबद्दलचा राग, तिरस्कार, इर्षा, द्वेष आणि अहंकार. सत्य स्वीकारणे हे प्रत्येकालाच जमते असे मुळीच नाही; अन्यथा सर्वजण राजा हरिश्चंद्र झाले असते. प्रत्येकाला आयुष्यात कठीणता आणि संघर्ष याला सामोरे जावेच लागते त्याशिवाय चांगले दिवस कसे येणार? कारण झाडालाही जुनी पानगळ टाकावीच लागते तेव्हांच तर नवीन पालवी फुटते.

ज्याच्या अंगी श्रध्दा, नम्रता आणि योग्यता असते त्याला सन्मान हा मिळतोच कारण श्रध्दा ज्ञान देते नम्रता मान देते आणि योग्यता स्थान देते. -बाबाजी हुले 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

हा तर वेड्यांचा बाजार