आम्रपुराण
प्रत्येकाचे जीवनात तसे आम्रपुराण छान आहे. प्रयत्नाने अजून चव वाढवता येईल. शुभफलाचा मान आंब्याला मिळतो. सणाला शुभकार्याला आंब्याचे पानांचे तोरण बांधतात. मेंदीत हातावर आंबा कापतात. हळदी कुंकवाची कुईरी आंब्याचे आकाराची असते. कोयीचा गाभा औषधी असतो. आम्र वृक्षावर पक्षी, घरटी बांधतात, पिल्लं येतात, कोकिळा गाते. सख्या झोका बांधतात, ईतर किडे जगतात. या झाडाला पाणी वारंवार द्यावं लागत नाही.
शीर्षक नीट वाचून पुढे जा ! हे आम्रपुराण, आम्र वर्णन आहे. आम सूत्र आहे, म्हणजे आंब्याबद्दलची माहिती आहे. आमच्या नासिकच्या गावाच्या वाड्याच्या पुढे, कच्च्या रस्त्याने गेले की एक ओढा लागायचा. जरा लांब पुलावरून जाणारा रस्तापुढे नदीकडे जाई. त्या नदी किनारी पोचेपर्यंत दुतर्फा अनेक गावठी आंब्याची, बिट्ट्याची रायवळची अशी गडद हिरव्या रंगाच्या पानांचा मुकुट घातलेली आंब्याची झाड असत. या गोदावरी नदीचे ओढ्याला ईथे फक्त पावसाळ्यातच पाणी असायचे. लहान डोह होता; पण बाकी काय, किरकोळ ओढा होता. आमराई, झाडी होती. दुपारी खडकावर कपडे सुकत असत. आजूबाजूच्या बायका कपडे धूत त्या खडकावर सुकवायच्या. आम्ही भावंड तिथे कधी कधी पाण्यात पाय टाकून बसायला जायचो.
मे महिन्याच्या सुट्टीत सगळी भावंडं भाचरे आणि इतर गावचे, दूरचे नातेवाईकसुद्धा आमच्या घरी गावी, नासिकला सुट्टीला येवुन राहिल्याचे आठवते. उन्हाळ्याच्या सुट्टीच्या आठवणी या आंबापोळी, आमरस पोळी, सुकवलेल्या आंबा फोडी, आटवलेला आंबा, पन्हे, आंब्याच्या आमट्या, आम कैरी यांच्याशी जोडलेल्या होत्या. या आठवणी पुढे जावून लोणचं घालणं कैऱ्या फोडून सुकवणे, छुंदा, आंबोशी या आंब्यांची संबंधित बनत. सुट्टी तसल्या विविध आमक्रियांची जोडलेल्या होत्या. कधी एखादे संध्याकाळी धडधड, थडथडणार, थरथरा करत पावसाच्या मोठ्या मोठ्या थेंबांचा किंवा गारांचा पाऊस पडायचा. अवकाळी पाऊस पडायचा. त्याकाळी काही घरं ..फार छान आणि पॉश नसायची. मागच्या बाजूच्या आउटहाऊसवर तर पत्रे टाकलेले असायचे. आकाशात वीज चमकायला लागली आमची सगळ्यांची भीतीने पाचावर धारण बसायची. आजी आई वडील सगळे जण असायचे. कंदील पेटवले जायचे. बॅटरी एखादी सोसो असायची आणि तिचे सेल्स मग संपून जायचे. धाडधाड आवाज करत त्या पसरणाऱ्या गारांनी अनेक आंब्याची फळं जमिनीवर पडायची. आम्हाला राग यायचा. किती नुकसान करतो हा पाऊस ? पावसाच्या माऱ्याने झाडावरची सर्वच फळ उंबर, जांभळ, पेरुवाडीतील झाडांच्या कैऱ्या जमिनीवर पडायच्या. काही कैऱ्या फुटून जायच्या. काही चांगल्या राहायच्या. जमिनीवर याआंब्यांच्या कैऱ्यांचा सडा पडलेला असायचा. डोक्यावर छत्री किंवा कांबळे सरकारी एखादा प्लास्टिकचा तुकडा घेऊन कापडाच्या पिशवीत आम्ही पावसात बाहेर जावून जमिनीवर पडलेली फळ गोळा करायचो. कोळ्याला त्याने पकडलेल्या मच्छीचा काय आनंद वाटेल त्याहून अधिक आनंद मला या गोळा केलेल्या पडक्या फुटवया कैऱ्यांचा वाटायचा. त्या कैऱ्या कापुन लोणचे घातले जाई. आंबे डाळ केली जाई. मला आठवत की आंबट गोड कैऱ्या खावून सारेजण खोकत असु. कैऱ्यांचा चिक, आमच्या बोटा ओठांवर उभरे. त्यात कैरीच्या चिकांनी ज्वर आला असायचा. तरीही आम्हाला त्या आंब्याचा मोह संपायचा नाही. त्यातल्या एका झाडाला आम्ही भावंडांनी केशर बाग नाव ठेवले होते. तो अजुन आहे, उभा डोलतांना आढळतो. त्या झाडाला आम्ही मुली झोके बांधुन खेळलो. मग दादा येत, ते त्या झाडाला घडीची खुर्ची टेकवुन लावून बसत. मग आम्ही केशर बाग झाडाखाली खिचडी आणि लोणच्याचे जेवणसुद्धा करायचो.
या वर्षी मला अजिबात आंबा खायलाच मिळाला नाही. याचं खरंच खूप वाईट वाटतं. आपल्या मुलाला दहा वर्ष, परदेशी आंबा खायला मिळत नाही. कारण की त्या प्रदेशांमध्ये आंब्यावर बंदी आहे. कारण आंब्यात कीड असते. परदेशी म्हणून त्याने अनेक वर्षे नाही खाल्ला. मी एक वर्ष नाही खाल्ला तरी चालतं. मी स्वतःला समजावलं. प्रत्येकाचे जीवनात तसे आम्रपुराण छान आहे. प्रयत्नाने अजून चव वाढवता येईल. शुभफलाचा मान आंब्याला मिळतो. सणाला शुभकार्याला आंब्याचे पानांचे तोरण बांधतात. मेंदीत हातावर आंबा कापतात. हळदी कुंकवाची कुईरी आंब्याचे आकाराची असते. कोयीचा गाभा औषधी असतो. आम्र वृक्षावर पक्षी, घरटी बांधतात, पिल्लं येतात, कोकिळा गाते. सख्या झोका बांधतात, ईतर किडे जगतात. या झाडाला पाणी वारंवार द्यावं लागत नाही.
माझ्या एका मैत्रिणीने बदलापूरच्या पुढे एक फार्म हाऊस विकत घेतलं होतं. तिथे तिन्ही बरीच आंब्याची झाडे लावली होती. बँगन पल्ली, बेगम पल्ली केशर, अशी झाडं मी तीला त्या बागेत लावण्यासाठी बक्षीस म्हणून दिली. पिवळा अगदी महागड्या अशा आंब्याचे रोप देखील तिला मी तिथे लावायला घेऊन दिलं. मला तर काही ही शेतीची चैन परवडणारी नव्हती. त्यामुळे मला आवडणारी केशर, तोतापुरी, राजापुरी हापूस अशी काही आंब्याची रोप मी तिच्याच फार्मवर जाऊन लावली. काही कलमी आंबे, काही साधे आंबे, काही गावठी आंबे अशा रितीने मी हे आंबे हळूहळू तिच्या बागेत खोचून मनापासून लावी. एखाद्या जातीची झाडे जगत, एखादे जगतच नसे. काही झाडांचे असे असे की ती नंतर मरतसुद्धा असत. कधी कधीनदी किनारी हे फार्म असल्यामुळे फार्महाऊसवर पाणी शिरे आणि नुकसानसुद्धा होई. दिवाळीत फळे येणारा परभणी हापूस, कोट्यामधून आणलेला फळे देणारा सदाबहार हापूस देखील मी त्यांच्या ठिकाणी लावला. आंध्र प्रदेशमधील सुवर्णरेखा चा कलमी आंबा अचानक वाळून गेलेला पहिला. केरळमधला बारा महिने फळ येणाऱ्या प्रकारचा आंब्याचा प्रकार देखील लावला. लखनऊमधल्या एका संस्थेच्या नुसार साठ लाख वर्षांपूर्वी दगडात सापडलेल्या, दगडी फोसिलनुसार आंब्याचे फळ मेघालयातील गारो हिल्स दावणगिरी येथे सापडलं होतं. पेरू आणि आंबा याचा हायब्रिड केलेला तोतापुरी आवडतो. पूर्वी हे आंध्र अन् तामिळनाडू पासून येत. त्या त्या शहरातील आणि त्या त्या परिसरातील हवामानानुसार फळांची चव आणि स्वाद आणि सुगंध बदलत असतो. कलकत्त्याचा काही तूर प्रकारचा आंबा जुन्नरचा हापूस तो देखील प्रसिद्ध आहे. या वर्षी करोनाने फार नुकसान केलं. कोकणातील हापूस नीटपणे पूर्ण देशभर पाठवता आला नाही. पाठवला गेला तरी गाजला नाही. अपराधी भावना न ठेवता, खाली जाणे, विक्रेत्याने आणलेला तो बॉक्स खालून (आंबा) विकत आणण्याचा साबणाने वर धुवायचा. हाताला साबण लावायचा आणि नंतर घाबरत घाबरत खायचा. नी तरीही पोट दुखायच्या त्या भितीमुळे मी यावर्षी आंबा खाल्ला नाही.
आंब्याचे बेगमी करणारे पदार्थ लोणची साखरांबा, आंब्याचे साठे, आंबोशी, मॅन्गो जाम आंब्याची सरबत साठवलेल्या आंब्याचा गर हे खाऊनच आता वर्षभर आंब्याचा विरह कसा तरी काढायचा आहे. पाऊस आला की आंबा संपतो. मुंबईचा पाऊस गावच्या पावसाच्या आठवण करून देतो; पण मुंबईचे आंबे आणि गावचे आंबे यांच्यात फार फरक आहे. अंगावर टॉवेल गुंडाळून आणि अंगात कसे तरी कपडे घालून आंबे सोलून चोखून खाण्यात तोंडानी कपडे बरबटविण्यात जो आनंद असतो तो उपभोगायला आमच्या नाशिकला, भुतकाळात जायला हवं. नुकतच माझ्या कानावर आल की ते झाड तोडलं गेले आणि एका लाकुड वखारवाल्याला विकण्यात आले. माझ्या घशात कसेतरी झाले. श्वास गुदमरल्यासारखे वाटलं माझी आंब्याची आठवण संपली असे क्षणभर वाटलं. जुन झाड तोडतांना नवीन झाडत्या जागी लावावं असं सोसायटीत कुणालाच वाटलं नव्हतं. आंबा म्हातारा झाला होता. ‘नवा वृक्ष कसचा लावता? पार्किंगला जागा झाली आणि काय त्या आंब्याला काही फळे येत नव्हती. वाळवीपण लागली होती म्हणून तो तोडला असं कारण मला देण्यात आलं. मात्र जवळ कुठे अन्यत्र नवीन का लावला नाही ? याचं कारण कुणीही दिले नाही. माझे आमसूत्र हे अस आहे. या वर्षी करोनामुळे आंबा अजिबात न खाल्ल्याने मनात विचार केला. आंबा पीक कमी होते आहे का? नुकताच माझ्या असं कानावर आलं की नाशिकच्या त्या आमच्या वाड्यातली बरीच झाडं तोडली गेली. त्यातील जे एक वळणावर आंब्याचे झाड एक वाकडे अस माझा पत्ता पुसत स्वप्नात येणारे झाड होतं तेदेखील नुकतच तोडण्यात आले. पण तरी ही मला त्या गावचे घर नदीकाठचे वाकडे आंब्याचं झाड रात्रभर स्वप्नांमध्ये झोपेमध्ये आणि भावविश्वामध्ये अस्वस्थ करत होते. आत रुतत होते.
-शुभांगी पासेबंद