समाज माध्यमात प्रसिद्ध झालेले छत्रपती!

छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या सर्वच मोहिमा हया कसलेही पंचांग आणि मुहूर्त न पाहता सुरू केल्या आहेत. अशुभ मानल्या गेलेल्या अमावस्येच्या रात्री सर्व लढाया करुन त्या सर्वच्या सर्व लढाया जिंकून अंधश्रध्दा निर्मुलनाचा संदेश देणारे चिकीत्सक राजे इतिहासात फार विरळ आहेत. ३५० वर्षांपूर्वी छत्रपती शिवरायांनी सुरु केलेली शिवकालीन पाणी साठवण व्यवस्था आजही तितकीच प्रभावी आहे.

नुकतीच शिवजयंती तारखेप्रमाणे सर्वत्र साजरी करण्यात आली. सर्वच ठिकाणी, बरेच वक्ते आणि लेखक मंडळीदेखील छत्रपती शिवाजी महाराजांबाबत प्रमुख्याने फक्त पुढील तीनच गोष्टी मांडून आपले महाराज मय्राादित करण्याचा प्रयत्न करतात आणि शिवाजी महाराज म्हटलं की जसे आपण पाढे पाठ करतो तसे एक, एक आपणास आठवत जाते, जसे काही....!

१.अफजलखानाचा वध,
२.शाहीस्तेखानाची बोटे,
३.आगऱ्याहून सुटका,
४.महाराज यांचा राज्याभिषेक.. हे मुद्दे तर असतीलच, जरा महाराज ढाल-तलवार, घोडा, बंदूका आणि हर हर महादेव हया गोष्टींच्या पुढे आहेत.

      आपणास भावलेले छत्रपती शिवाजी महाराज अनेक अंगाने समजून घ्यावेसे तुम्हा आम्हा साऱ्यांना वाटतील. तसे बघता काही बाजू, ज्या विचार कराव्या इतक्या खऱ्या आहेत, म्हणून त्यावर देखील बोललं गेलं पाहिजे, ऐकलं आणि मांडलं गेलं पाहिजे.

उदाहरणार्थ....आईसाहेब जिजाऊ हया, शाहजी राजे जेव्हा घोड्यावरून पडले आणि स्वर्गवासी झाले, तेंव्हा आपल्या आईला जिजाऊ माँसाहेबांना सती जाण्यापासून रोखणारे छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक क्रांती करणारे महान सुपुत्र ठरतात. महाराज यांनी दुसरी बाजू अशी की रयतेच्या भाजीच्या देठालासुद्धा हात लावता कामा नये हा आदेश देणारे ते ‘लोकपालक' राजे होते. कोणासही कसला त्रास होता कामा नये, हा त्यांचा सक्त आदेश होता आणि त्याचबरोबर दुसऱ्या बाजूस सर्व प्रथम हातात तलवारीबरोबरच पट्टी घेऊन जमीन मोजून तिची नोंद त्यांनी ठेवायला चालू केली असे ‘उत्तम प्रशासक' होते.

     शिवाजी महाराज हे काही प्रजा सुखी आणि आनंदी तर सारे काही आलबेल आहे आहे असे मानणारे नव्हते, त्यांचे प्रेम हे निसर्ग आणि पर्यावरण यावर देखील होते. जर विनाकारण व विना मोबदला झाडं कूणी तोडल्यास नवीन झाड लावून जगवण्याची शिक्षा देणारे ते ‘पर्यावरण रक्षक' असे महाराज होते. ज्ञान आणि विज्ञान याचा संगम कायम राखत नवीन विचार ते अंमलात आणून,त्यांनी स्वतः राबवले. जसे काही, समुद्र प्रवास करण्यास हिंदू धर्मात बंदी होती. तो विरोध पत्करून महाराज यांनी आपले आरमार उभे केले व आधुनिक नौदलाचा पाया रचून धर्मापेक्षा देश मोठा हा संदेश देणारे, छत्रपती शिवाजी महाराज हे ‘स्व-धर्मचिकित्सक' होते.

     त्यांनी त्यांच्या सर्वच मोहिमा हया कसलेही पंचांग आणि मुहूर्त न पाहता सुरू केले आहेत. अशुभ मानल्या गेलेल्या अमावस्येच्या रात्री सर्व लढाया करुन त्या सर्वच्या सर्व लढाया जिंकून अंधश्रध्दा निर्मुलनाचा संदेश देणारे चिकीत्सक राजे इतिहासात फार विरळ आहेत. ३५० वर्षांपूर्वी छत्रपती शिवरायांनी सुरु केलेली शिवकालीन पाणी साठवण व्यवस्था आजही तितकीच प्रभावी आहे. म्हणून महाराज आपणास ‘जलतज्ञ राजे' छत्रपती शिवराय, म्हणून पहावेसे वाटावे आणि अभिमान वाटावा असे दर्शवणे गरजेचं आहे.
३५० वर्षांपूर्वी दळणवळणाचे कोणतेही साधन नसताना अभेद्य असे १०० राहून अधिक गड-किल्ल्यांचे निर्माते, ‘उत्तम अभियंते' राजे शिवराय हे आहेत.

सर्व जातीधर्मातल्या मावळ्यांना समान न्याय देत सामाजिक क्रांतीचा पाया रचणारे महाराज आपणास नवीन पिढीस दाखवता येणे गरजेचे आहे तर नवीन पिढी शिव छत्रपती विचार हे त्रिकालाबाधित सत्य आहे, हे मानून कार्य करतील.महाराज हे  सर्व पातळीवर आपल्या कारकिर्द मध्ये जितके समाज आणि लोकशाहीभिमुख वाटत आहेत, त्या पलीकडे ते आहेत.

     आपल्या राज्यात परस्त्री मातेसमान मानत महिलांना सन्मानाने वागवाणारे मातृभक्त, नारीरक्षक छत्रपती शिवराय हे देखील व्यवस्थित मांडणे गरजेचे आहे. संपुर्ण विश्वात फक्त छत्रपती शिवरायांच्या दरबारातच मनोरंजनासाठी कोणतीही स्त्री नर्तिका नाचवली गेली नाही की मद्याचे प्याले ही रिचवले गेले नाहीत, हेही शाश्वत सत्य आहे.

 शाहिस्तेखान प्रकरणात तर शत्रूदेखील आपल्या घरातील महिलांना, शिवाजी हा कधी स्त्री आणि कुणा लेकी सूनांना छळत नाही, खऱ्या अर्थाने ते लोकराजे होते कारण ते धर्मजातीच्या पलीकडे जाऊन सुखी जनतेचे स्वप्न पहात होते हीच खरी त्यांची लोकशाही होती.

    वरील लेख सर्वच मुद्दे मला व्हॉट्‌स ॲप वर  मिळाले आणि समाज माध्यमात चांगलं देखील खूप काही व्हायरल होत असते, हे देखील सत्य पटले. हे  शिव विचार माझ्या आणि आपल्या सर्वांच्या मनातले शिव विचार आहेत, असे समजून मी प्रसिध्द करत आहे.

  चला, अपरिचित शिवराय.. साप्ताहिक लेख मालिका वाचत राहू या. - प्रा. रविंद्र पाटील. 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

 रेडिओवरील आवाजाचा जादूगार हरपला