‘एक पोळी होळीची, भुकेलेल्या मुखाची...'

 

भाजपा कामोठे शहर मंडल अनुसूचित जाती विभागाचा उपक्रम

कामोठे ः होळी सण सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. हिवाळ्यातील थंडीपासून सुटका व्हावी म्हणून सार्वजनिक रित्या अग्निप्रज्वलित करुन अग्नीदेवतेची आराधना केली जाते. आपापसातील द्वेष मत्सर शत्रुत्व होळीच्या पवित्र अग्नीत जाळून टाकून आपापसात प्रेम, स्नेह निर्माण व्हावा, असा उद्देश या सणामागे असतो. होळीला नैवेद्य म्हणून पुरणपोळ्या अर्पण करण्याची प्रथा आहे. मात्र, अर्पण म्हणून करण्यात येणाऱ्या त्याच पुरणपोळीने एका गरजु भूकेल्याचे पोट भरुया! या उदात्त उद्देशाने ‘भाजपा' कामोठे शहर मंडल अनुसूचित जाती विभाग तर्फे ‘एक पोळी होळीची भुकेलेल्या मुखाची' उपक्रम राबवण्यात आला. यासाठी कामोठे शहरातील विविध संस्था आणि मंडळे यांना होळी सणावेळी पुरणपोळ्या संकलित करण्याचे आवाहन करण्यात आले होते.


जमा करण्यात आलेल्या पुरणपोळ्यांचे जेवण पनवेल येथील इम्मानुल मेरी होम आश्रमामधील सर्व वृध्द आणि लहान मुलांना देण्यात आले. सदर उपक्रम यशस्वी करण्यासाठी ‘भाजपा' उपाध्यक्ष साधना आचार्य, ज्योती रायबोळे, अमित गायकवाड, सचिन शिंदे, सुरेंद्र हल्लिकार यांनी विशेष परिश्रम घेतले.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

ठोक मानधन, कंत्राटी पध्दतीवरील कर्मचाऱ्यांना कायमस्वरुपी करण्याची मागणी