नवी मुंबईत महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा अद्याप नाही खेदाची बाब - केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले

नवी मुंबई महापालिकेवर निळा झेंडा फडकविण्यासाठी  एकजूटीने कामाला लागा - ना. रामदास आठवले यांचे आवाहन

नवी मुंबई:  भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा देशात सर्व राज्यांत सर्व शहरात ; रेल्वे स्थानक; जिल्हा अधिकारी कार्यलय; तसेच उद्यान आणि चौकात उभारण्यात आलेले आहेत.मात्र नवी मुंबईमध्ये आंबेडकरी चळवळीची मोठी ताकद असून देखील अद्याप नवी मुंबईत महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारण्यात आला नाही ही खेदाची बाब आहे असे सांगत नवी मुंबई महापालिकेने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा नवी मुंबईत त्वरित उभारावा अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी केली आहे. रिपब्लिकन पक्षाचा नवी मुंबई शहर जिल्ह्याचा कार्यकर्ता मेळावा नवी मुंबईत विष्णुदास भावे नाट्यगृहात आयोजित करण्यात आला होता. त्यात प्रमुख मार्गदर्शन करताना ना.रामदास आठवले बोलत होते.

यावेळी विचारमंचावर रिपाइं चे नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष महेश खरे ;स्वागताध्यक्ष रिपाइं चे राज्य उपाध्यक्ष सिद्राम ओव्हाळ; रिपाइं चे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस गौतम सोनवणे; सुरेश बारशिंग; एम एस नंदा; रिपाइं चे  मराठा आघाडीचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष बाळासाहेब मिरजे; डॉ. विजय मोरे; ऍड. बी के बर्वे; शिलाताई बोदडे ; विजय कांबळे; शशिकला जाधव; यशपाल ओव्हाळ; चांदू जगताप; एल आर गायकवाड; सचीन कटारे; कविता भंडारे; सुरेश कोरे आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.

 नवी मुंबईत रिपब्लिकन चळवळीची ताकद मोठी आहे. फाटाफुटीमुळे वादविवादामुळे आपली ताकद विखरली. त्यामुळे अद्याप एक ही नगरसेवक नवी मुंबईत रिपाइं ला निवडून आणता आला नाही. येत्या निवडणुकीत नवी मुंबई महापालिकेवर निळा झेंडा फडकविण्याचा असेल तर आपले नगरसेवक निवडुन आणा. त्यासाठी गटबाजी न करता एकमेकांचा विचार घेऊन एकजुटीने काम करण्याचे आवाहन ना.रामदास आठवले यांनी केले. 

रिपाइं चे नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष म्हणून निवड झाल्यानंतर पहिल्यांदाच  जिल्हा अध्यक्ष महेश खरे यांच्या अध्यक्षतेत रिपाइं चा नवी मुंबई जिल्हा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला. मेळावा यशस्वी केल्याबद्दल जिल्हा अध्यक्ष महेश खरे  यांनी सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानले. यावेळी जागतिक  महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर कर्तृत्ववान महिलांचा ना.रामदास आठवले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

 ‘एक पोळी होळीची, भुकेलेल्या मुखाची...'