शेकडो कार्यकर्त्यांचा मुख्यमंत्र्यांच्या शिवसेनामध्ये प्रवेश

महिलांनी राजकारणात सहभाग घेणे काळाची गरज -विजय नाहटा

नवी मुंबई ः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून बेलापूर विधानसभा क्षेत्रातील विविध पक्षातीलशेकडो कार्यकर्त्यांनी उपनेते विजय नाहटा यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये(बाळासाहेबांची शिवसेना) प्रवेश केला.

नेरुळ येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालय येथे २८ फेब्रुवारी रोजी पार पडलेल्या सदर पक्ष प्रवेश कार्यक्रमाप्रसंगी माजी उपमहापौर अशोक गावडे, नवी मुंबई संपर्क प्रमुख किशोर पाटकर साहेब, महिला संपर्क प्रमुख दमयंती आचरे, महिला जिल्हा संघटक शितल कचरे, महिला जिल्हा संघटक सरोज पाटील, शहरप्रमुख सुरेश भिल्लारे, शहर संघटिका सुरेखा गव्हाणे, प्रियांका गाडे, उपजिल्हाप्रमुख रामाशेठ वाघमारे, नवी मुंबई सह संपर्क प्रमुख सचिन कांबळे, उपजिल्हा प्रमुख अजय पाटील, माजी सैनिक सेनेचे जिल्हा संघटक सुरेश काकडे, मायनॉरिटी (ख्रिश्चन) सेलचे नवी मुंबई जिल्हा संघटक बरनोडशहा नाडर, दुधभाते, आदि उपस्थित होते.

उपजिल्हाप्रमुख दिपक सिंग, प्रकाश आमटे, हेमंत जैस्वाल यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, आरपीआय, टायगर ग्रुप आणि इतर संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी महिलांची लक्षणीय  उपस्थिती होती.

दरम्यान, राजकारणात महिलांनी सहभाग घेतला पाहिजे. त्यांच्याकडे योग्य नियोजन आणि संघटन कौशल्य असल्याने पक्षाचा विस्तार होण्यास मोठ्या प्रमाणात मदत होते. कित्येक महिलांकडे गुण आणि कौशल्य असतानाही त्या राजकारण पासून दूर असतात. त्यामुळे असे न करता महिलांनी पक्षात सहभागी होऊन पक्षाची जबाबदारी हातात घेतली पाहिजे. राजकारणात येऊन महिलांसाठी असणाऱ्या  शासनाच्या विविध योजना हाती घेऊन महिलांना आर्थिक सक्षम केले पाहिजे, असे उपनेते विजय नाहटा यांनी महिलांना उद्देशून सांगितले.

काही लोक आता संघर्ष यात्रा काढून महाराष्ट्रभर फिरण्याचे सांगत आहेत.खऱ्या अर्थाने ते आता जागी झाले आहेत असे म्हणावे लागेल. पण, हेच अगोदर सरकार असताना केले असते आणि सर्वांना वेळ देऊन त्याची कामे मार्गी लावली असती तर आज शिवसेना फुटली नसती तर शिवसेना एकसंघ राहिली असती, असा टोलाही नाहटा यांनी शिवसेनाला (उध्दव बाळासाहेब ठाकरे) लगावला.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

नवी मुंबईत महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा अद्याप नाही खेदाची बाब - केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले