‘आप'च्या वतीने कोपरखैरणे येेथे भाजपा विरोधात आंदोलन

 मनिष सिसोदिया याच्या अटकेचा ‘आप'तर्फे निषेध

नवी मुंबई ः अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली दिल्ली मधील आप सरकारच्या सरकारी स्वास्थ क्रांतीचे जनक सत्येन्द्र जैन आणि शिक्षण क्रांतीचे जनक मनिष सिसोदिया यांंच्या जनताभिमुख कामाच्या झपाट्याची धास्ती घेऊन सरकारी स्वायत्त संस्थांचा गैरवापर करुन या दोन दिल्ली सरकारच्या मंत्र्यांना तुरुंगात टाकण्याचे काम ‘भाजपा'च्या हुकूमशाही सरकारने केले आहे. २६ फेब्रुवारी रोजी केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) कडून उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांना झालेल्या अटकेच्या निषेधार्थ देशभरात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. ‘आप'चे कार्यकर्ते देशभर आंदोलन करीत आहेत.

त्याअनुषंगाने ‘आम आदमी पार्टी-नवी मुंबई'च्या वतीने २७ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र राज्य समितीच्या नेतृत्वाखाली कोपरखैरणे मधील जनसंपर्क कार्यालयासमोर ‘भाजपा'च्या विरोधात निषेधाच्या घोषणा देत आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी ‘आप'चे महाराष्ट्र राज्य सचि धनंजय शिंदे, नवी मुंबई सहसचिव निन जोहरी, वॉर्ड अध्यक्ष तथा सोशल मिडीया समन्वयक धनवंती बच्चन सिंग, नवी मुंबई युवा अध्यक्ष संतोष केदारे यांच्यासह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थि होते. देशाला आर्थिक संकटात टाकणारा हिंडनबर्गने उजेडात आणलेला सर्वात मोठ्या अदानी घोटाळ्यासाठी साधी समिती नेमायला तयार नसलेले हुकूमशाह केंद्र सरकार, गरीबांच्या मुलांना उत्कृष्ट मोफत शिक्षण देणाऱ्या मनिष सिसोदिया यांना असंवैधानिक मार्गाने अटक करीत आहे. केंद्र सरकारच्या या वृÀतीचा ‘आप-महाराष्ट्र'च्या वतीने निषेध करीत असल्याचे धनंजय शिंदे यांनी यावेळी सांगितले.

तर ‘भाजपा'च्या हुकूमशाही कृत्याचा निषेध करताना आता समाजातील सर्वच सुशिक्षित आणि पांढरपेशा वर्गाने सुध्दा राजकारणात सक्रिय सहभाग घेऊन सत्ता परिवर्तन घडवून आणायलाच पाहिजे, असे निना जोहरी म्हणाल्या.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

आपण कार्यकर्ते नाही तर सैनिक, आता जिंकेपर्यंत लढायचे आहे