नवी मुंबई मध्ये ‘एमआयएम'च्या दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशनाचे आयोजन

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रिमोट कंट्रोल - खा. इम्तियाज जलील

वाशी ः काँग्रेस-राष्ट्रवादी या पक्षांना विरोध करण्यासाठी शिवसेनेचा जन्म झाला. पण, शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे सत्तेसाठी महाविकास आघाडी मध्ये सामील झाले. तर शिवसेना फोडून एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री झाले . मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील सध्या ‘भाजप'च्या तालावर नाचत असून, त्यांचा रिमोट कंट्रोल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे, अशी घणाघाती टिका ‘एमआयएम'चे खासदार इम्तियाज जलील यांनी केली. नवी मुंबई मध्ये ‘एमआयएम'च्या दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. या अधिवेशनात २५ फेबु्रवारी रोजी खा. इम्तियाज जलील बोलत होते.

 शिवसेनेत सध्या दोन गट झाले आहेत. मात्र, शिवसेना मध्ये दोन नव्हे तर चार गट झाले पाहिजेत. तसेच भाजप मध्येही गट पडले तर ‘एमआयएम' सत्तेच्या जवळ जाईल, असा दावाही खा. इम्तियाज जलील यांनी केला. सरकार सध्या नामांतरावरुन राजकारण करत आहे. इतिहास खराब असू शकतो. मात्र, आता नामांतर करुन काय फायदा ?, नाव बदलून शहरातील समस्या बदलणार आहेत का ?, सध्या औरंगाबाद, उस्मानाबाद शहराचे, जिल्ह्याचे नामांतर लोकांना विश्वासात न घेता केले आहे. सदर आदेश ‘एमआयएम' सुप्रीम कोर्टात गेला असताना दिले आहेत, असा आरोप ‘औरंगाबाद'चे छत्रपती संभाजीनगर नामांतरावरुन खा. इम्तियाज जलील यांनी केला.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

‘आप'च्या वतीने कोपरखैरणे येेथे भाजपा विरोधात आंदोलन