विजयाबद्दल संजीव नाईक यांच्याकडून ज्ञानेश्वर म्हात्रे यांचे अभिनंदन

शिक्षकांनी दाखविला ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्यावर विश्वास

नवी मुंबई ः कोकण विभाग शिक्षक मतदार संघातील निवडणुकीत ‘महायुती'चे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी ‘महाविकास आघाडी'चे उमेदवार बाळाराम पाटील यांचा दणदणीत पराभव केला. ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या विजयाबद्दल माजी खासदार संजीव नाईक यांनी त्यांचे प्रत्यक्ष भेटून अभिनंदन केले असून म्हात्रे यांच्यावर शिक्षकांनी विश्वास दाखवल्याची प्रतिक्रिया दिली. नवनिर्वाचित शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्याकडून शिक्षक, शिक्षकेत्तर, शैक्षणिक संस्था अशा सर्व घटकांची अधिकाधिक सेवा घडेल, असा विश्वास व्यक्त करुन या विजयासाठी ‘महायुतीे'च्या सर्व कार्यकर्त्यांनी आणि शिक्षकांनी अपार परिश्रम घेतल्याचे सांगितले. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आशीर्वादाने ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा विजय साकारला आहे, असे संजीव नाईक म्हणाले.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

शेकाप नेते दिलीप भोईर भाजपमध्ये