भारत जोडो यात्रेचा संदेश गावा गावातील पोहोचवण्यासाठी काँग्रेस पक्षाचे हात से हात जोडो अभियान

हात से हात जोडो अभियान  रायगड जिल्ह्यात यशस्वी करावे' -महेंद्र घरत

उरण : काँग्रेस नेते खासदार राहुलजी गांधी यांनी भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून दिलेला संदेश गावा गावातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी काँग्रेस पक्षाने हात से हात जोडो अभियान सुरु केले आहे. हे अभियान नियोजन पद्धतीने रायगड जिल्ह्यात सर्व गावांमध्ये पोहचविण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न करावे असे आवाहन काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा कामगार नेते महेंद्र घरत यांनी केले.

    रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीची बैठक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षा तथा रायगड जिल्ह्याच्या सहप्रभारी श्रीमती राणी अग्रवाल मॅडम.यांच्या प्रमुख उपस्थित शुक्रवारी ( दि२७) शेलघर येथील जोमा नारायण घरत सभागृहात पार पडली. त्या वेळेस जिल्हा कार्यकारणीला संबोधीतांना रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष यांनी वरील मनोगत व्यक्त केल यावेळी त्यांनी असं हि सांगितलं कि राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा ऐतिहासिक ठरली आहे. देशातील जनतेला भेडसावणाऱ्या अनेक ज्वलंत प्रश्नांना या पदयात्रेने ऐरनीवर आणले आहेत. केंद्र सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे महागाई व बेरोजगार वाढली आहे. या विरोधात संघर्षासाठी व देशातील जनते मध्ये प्रेम, विश्वास व बंधु -भाव निर्माण करण्यासाठी रायगड जिल्ह्यातील तरुण युवक, जेष्ठ नागरिक, महिला. काँग्रेस कार्यकर्त्यांनी हात से हात जोडो अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक गाव, वस्ती येथील व्यक्ती पर्यंत पोहचण्यासाठी प्रयत्न करावेत असे सांगितले.

   याप्रसंगी सह प्रभारी राणी अग्रवाल यांनी सांगितले कि महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याला महेंद्र घरत साहेब यांच्यासारख्या जिल्हाध्यक्ष मिळाला तर काँग्रेस नक्कीच पुढे जाईल. त्यांची कार्य प्रणाली पाहुन मी खुपच प्रभावित झाली आहे. नक्कीच रायगड जिल्ह्यात महेंद्र घरत यांच्या नेतृत्वात 'हात से हात जोडो अभियान ' यशस्वी होईल याची माझ्या मनात कोणतीच शंका नाही. यावेळी रायगड जिल्हा महिला काँग्रेस च्या अध्यक्षा. सौ. श्रद्धाताई ठाकूर, वरिष्ठ उपाध्यक्ष मिलिंद पाडगावकर, राजाभाऊ ठाकूर तसेच जिल्हा कार्यकारणी व काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

माजी नगरसेवक सुरेश कुलकर्णी शिंदे गटात नाराज?