‘आप'तर्फे प्रजासत्ताक दिन साजरा

नवी मुंबई ः ‘आम आदमी पार्टी'चे महाराष्ट्र प्रदेश सहाप्रभारी गोपाल इटालिया, राज्य संयोजक रंगा राचूरे आणि राज्य समिती यांच्या मार्गदर्शक सुचनेनुसार ७४ व्या प्रजासत्ताक दिनी ‘आम आदमी पार्टी'च्या कोपरखैरणे, ऐरोली आणि नेरुळ जनसंपर्क कार्यालयात ध्वजारोहण कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी माजी खासदार तथा ‘आम आदमी पार्टी'चे महाराष्ट्रप्रदेश उपाध्यक्ष हरिभाऊ राठोड यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. सदर कार्यक्रमास नवी मुंबईतील अनेक वरिष्ठ नागरिक, माजी सैनिक, सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी यांच्यासह ‘टीम आप नवी मुंबई'चे कार्यकर्ते आणि पदाधिकारी सहभागी झाले होते.

सदर सोहळ्यावेळी ‘भारतीय संविधान'ची प्रस्तावनाचे समूह वाचन करण्यात आले. आपला देश सर्व थोर पुरुष आणि घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या घटनेप्रमाणे चालला पाहिजे. संविधानातील मूल्ये आपण सर्वांनी अंगिकारली पाहिजे. तसेच समाजातील सर्व जात, भाषा, धर्म आणि पंथाच्या लोकांनी एकत्र येऊन संविधानाचे रक्षण केले पाहिजे, अशी भावना उपस्थित मान्यवरांनी व्यवत केली.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

भारत जोडो यात्रेचा संदेश गावा गावातील पोहोचवण्यासाठी काँग्रेस पक्षाचे हात से हात जोडो अभियान