‘'महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस'चे उपाध्यक्ष सुभाष कानडे यांच्या हस्ते कोपरखैराणे येथे काँग्रेस जनसंपर्क कार्यालयाचे उद्‌घाटन

‘काँग्रेस'च्या प्रभाग क्र.१६ जनसंपर्क कार्यालयाचे उद्‌घाटन

नवी मुंबई ः कोपरखैराणे नोडमधील प्रभाग १६ मधील काँग्रेस जनसंपर्क कार्यालयाचे उद्‌घाटन ‘'महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस'चे उपाध्यक्ष तथा ‘काँग्रेस'चे नवी मुंबई निरीक्षक सुभाष कानडे यांच्या हस्ते २१ जानेवारी रोजी करण्यात आले. यावेळी ‘नवी मुंबई जिल्हा काँग्रेस'चे अध्यक्ष अनिल कौशिक, जिल्हा प्रववते तथा कामगार नेते रवींद्र सावंत, ‘काँग्रेस'च्या जेष्ठ नेत्या लीना लिमये यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थितीत शनिवारी सांयकाळी करण्यात आले. यावेळी उद्‌घाटक सुभाष कानडे यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना जनसेवेतून पक्षसंघटना लोकाभिमुख करताना पक्षाचा जनाधार वाढविण्याबाबत मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाप्रसंगी ‘काँग्रेस'चे उपाध्यक्ष एजाज हुसेन, बाळकृष्ण बैले, कोपरखैराणे ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष धोंडीराम पाटील, ब्लॉक सचिव सलीम अन्सारी, ब्लॉक उपाध्यक्ष तथा ‘नवी मुंबई इंटक'चे उपाध्यक्ष सुनील पारकर, ब्लॉक उपाध्यक्ष अभिजित काकडे, समाजसेवक संदीप डिचोलकर, प्रभाग क्र.१६चे वॉर्ड अध्यक्ष विकास शिंदे, अल्पसंख्यांक सेलच्या वॉर्ड अध्यक्षा सौ. हुरुनिशा खान, अमित हांडे, प्रभू कोरे, गणेश मोरे काका, राहुल गावडे, अशोक कंक, रितेश जयस्वाल, राहुल सिंग, विशाल शुक्ला, किरण चिकणे, शुभम सावरतकर, परशुराम कोरे, सोमेश उबाळे, अलिम अन्सारी आदिंसह स्थानिक रहिवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

‘महायुती'चे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या प्रचारार्थ कोपरखैरणेत सभा संपन्न