दिवाळीत आनंदाबरोबर सुरक्षितताही जपा ! नॅशनल बर्न्स सेंटरचा नागरिकांना सावधतेचा सल्ला
भाजपा दिनदर्शिका प्रकाशन सोहळा संपन्न
नवी मुंबई ः नववर्षानिमित्त भाजपा सह विविध सामाजिक संघटना, संस्थांकडून आकर्षक दिनदर्शिकांचे प्रकाशन केले जात आहे. सर्वसामान्यांना आपले वार्षिक नियोजन करण्याबरोबरच सण, समारंभ, मुहूर्त, राशीभविष्य पाहण्यासाठी दिनदर्शिका उपयुक्त ठरतात. त्याअनुषंगाने भारतीय जनता पार्टी प्रभाग क्र.३२ च्या वतीने भाजपा दिनदर्शिका प्रकाशन १४ जानेवारी रोजी स्वयंभु गणेश मंदिर शिरवणे येथे माजी महापौर जयवंत सुतार यांच्या हस्ते पार पडला.
याप्रसंगी त्यांच्या समाजसेवक जयेंद्र सुतार, संजय झणझणे, वार्ड अध्यक्षा सौ. अरुणा भोईर, समाजसेविका सौ. अनिता पाटील, वार्ड अध्यक्ष सुभाष जाधव, ‘भाजपा'चे प्रमुख पदाधिकारी माधव सुतार, संतोष गुप्ता, विनायक भोईर, विकास डोंगरे, संदिप पाटील, राहुल मंडल, उमाकांत पाटील, दत्तात्रेय गुरव, नितीन शेडगे, श्रीकांत भोसले, प्रशांत घरत, किरण गोडसे तसेच प्रभागातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.