महविकास आघाडीचे उमेद्वार आमदार बाळाराम पाटील यांच्या समोर तगडे आव्हान

कोकण शिक्षक मतदार संघातील निवडणुकीची रंगत वाढली

नवी मुंबई -: कोकण शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत कोकण शिक्षक परिषदेचे उमेद्वार वेणू गोपाळ कडू यांनी आपला उमेद्वारी अर्ज मागे घेत भाजप - सेना (शिंदे गट) पुरस्कृत उमेद्वार ज्ञानेश्वर म्हात्रे यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे.त्यामुळे महविकास आघाडीचे उमेद्वार व आमदार बाळाराम पाटील यांच्या समोर तगडे आव्हान उभे केले आहे.

कोकण शिक्षक मतदार संघाची निवडणूक ही भाजप शिवसेना युती एकत्र लढत आली आहे. मागील वर्षी या मतदार संघातून आघाडीतर्फे २०१७ साली (काँग्रेस, राष्ट्रवादी, शेकाप ) बाळाराम पाटील यांना उमेद्वारी दिली होती आणि ते विजयी झाले होते. त्यांनी ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा पराभव केला होता. मात्र मागील अडीच वर्षापूर्वी भाजप सेना युती तुटली आणि महाविकास आघाडी स्थापन होऊन ठाकरे सरकार आले. मात्र सात महिन्यापूर्वी सेनेत फूट पडली आणि  राज्यात भाजप शिंदे गटाचे सरकार आले. त्यामुळे राज्यात होऊ घातलेल्या विधान परिषदेच्या पाचही जागा जिकण्यासाठी भाजप शिंदे गटाने मोर्चे बांधणी सुरू केली आहे. आणि त्याच पार्शवभूमीवर कोकण शिक्षक मतदार संघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरुंन वेणू गोपाळ कडू यांनी आपला उमेद्वारीर अर्ज मागे घेत असल्याचे सांगितले. त्यामुळे भाजप शिंदे गटाने महाराष्ट्र शिक्षक परिषदचे उमेद्वार ज्ञानेश्वर म्हात्रे यांना आपला पाठिंबा देत महाविकास आघाडीकडून शेकाप उमेदवार बाळाराम पाटील यांच्या समोर तगडे आव्हान उभे केले आहे. त्यामुळे ही लढत चुरशीची होण्याची शक्यता आहे.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

भाजपा दिनदर्शिका प्रकाशन सोहळा संपन्न