‘एपीएमसी'तील प्रसाधनगृह चौकशी मागे राजकीय षडयंत्र -शशिकांत शिंदे

वाशी ः मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) मधील प्रसाधनगृह वाटप आणि अनुषंगिक बाबींमध्ये चौकशी अहवालातील त्रुटी दूर करुन नव्याने फेरचौकशी करण्यात येईल, असे आदेश राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. दरम्यान, आमदार महेश शिंदे  प्रसाधनगृहातील भ्रष्टाचार बाबत फेरचौकशीची मागणी केली होती.
वास्तविक पाहता सदर प्रकरणात न्यायालयाच्या आदेशाने चौकशी होऊन देखील पुन्हा चौकशी करण्याचे आदेश देणे म्हणजे एक राजकीय कट असल्याचा पलटवार आमदार शशिकांत शिंदे यांनी केला आहे. तर तक्रार करण्यासाठी आपल्यावर आ. महेश शिंदे यांच्यासह इतर दोन जणांनी दबाव टाकून आत्महत्या करण्यास परावृत्त केल्याचा आरोप ठेकेदार सुरेश मारु यांनी केला आहे. त्यामुळे एपीएमसी प्रसाधनगृहाच्या प्रकरणाला नवीन कलाटणी मिळाली आहे.

‘एपीएमसी'मधील शौचालयाच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाला असून माजी आमदार शशिकांत शिंदे यांच्या सहित शासकीय अधिकाऱ्यांनी २ कोटी १९ लाख रुपये आपल्याकडून लाच म्हणून वसूल केली असल्याचा आरोप ठेकेदार सुरेश मारु यांनी  मागील वर्षी केला होता. मात्र, सदर आरोप करण्यासाठी आमदार महेश शिंदे, संचालक राजेंद्र पाटील आणि ॲड. संतोष यादव यांनी आपल्यावर दबाव टाकला होता. तसेच सुरु असलेल्या अधिवेशनादरम्यान आत्महत्या करण्यास परावृत्त केले, असा आरोप ठेकेदार सुरेश मारु यांनीच केला असून याबाबत एपीएमसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.


तर सदर भ्रष्टाचाराबाबत उच्च न्यायालयाच्या आदेशाने एका उच्चस्तरीय अधिकाऱ्यामार्फत चौकशी पूर्ण झाली असून त्याचा अहवाल राज्य सरकारने स्विकारले आहे. असे असताना देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेरचौकशीचे आदेश दिले आहे. त्यामुळे राजकारणात राजकीय द्वेषापोटी  एखाद्याचे राजकीय जीवन संपवण्यासाठी एखाद्याला आरोप करायला लावणे आणि ते कमी म्हणून काय की त्या व्यक्तीला आत्महत्या करण्यास फुस लावली. त्यामुळे याबाबत सदर तक्रारदाराला विधान भवनाबाहेर आत्महत्या करण्यास कोणी सांगितले?, तो जिवंत आहे का मृत झाला आहे याची चौकशी कोणी केली? आणि सदर तक्रारदाराच्या मृत्युचे भांडवल कोणाला करायचे होते? याची चौकशी करण्याची मागणी आम्ही करणार आहोत, असे शशिकांत शिंदे यांनी सांगितले. त्यामुळे एपीएमसी मधील ठेकेदार सुरेश मारु यांनी केलेल्या आरोपांमुळे सदर प्रकरणाला नवीन कलाटणी मिळाली आहे. 

 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

नवी मुंबई शहरात दोन आंदोलने करण्याचा अजब फतवा ; भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये खळबळ