नेरुळ येथे ‘बाळासाहेबांची शिवसेना पक्ष'च्या मध्यवर्ती कार्यालयात २४ तास वैद्यकीय मदत कक्ष सुरू

नववर्षाच्या शुभमुहूर्तावर वैद्यकीय मदत कक्ष सुरु

नवी मुंबई ः राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नववर्षाच्या शुभमुहूर्तावर १ जानेवारी रोजी उपनेते विजय नाहटा यांच्या शुभहस्ते आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधी प्रमुख मंगेश चिवटे यांच्या प्रमुख उपस्थितीत नेरुळमध्ये ‘बाळासाहेबांची शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष'चे उद्‌घाटन संपन्न झाले.

त्यामुळे नवी मुंबईतील गरजू नागरिकांना तत्पर आणि वेळीच वैद्यकीय मदत प्राप्त होणार आहे. नेरुळ, सेक्टर-२८ येथील ‘बाळासाहेबांची शिवसेना पक्ष'च्या मध्यवर्ती कार्यालयात २४ तास वैद्यकीय मदत कक्ष सुरू झाला आहे. या मदत कक्षच्या शुभारंभ प्रसंगी व्यासपीठावर उपनेते विजय नाहटा, मुख्यमंत्री सहाय्यता निधी प्रमुख मंगेश चिवटे, जिल्हाप्रमुख विजय चौगुले, माजी उपमहापौर तथा निमंत्रक अशोक गावडे, वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख राम राऊत, विजय यादव, महिला जिल्हा संघटक सौ. सरोजताई पाटील, शितल कचरे, माजी नगरसेविका ॲड. स्वप्ना गावडे, उपजिल्हाप्रमुख रोहिदास पाटील, अजित सावंत, उत्तर भारतीय सेल प्रमुख कमलेश वर्मा, युवा सेना प्रमुख महेश कुलकर्णी, वैद्यकीय मदत कक्ष नवी मुंबई प्रमुख सोमेश्वर बढे यांच्यासह ‘बाळासाहेबांची शिवसेना पक्ष'चे नवी मुंबई मधील पदाधिकारी-कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वैद्यकीय कक्ष हक्काच व्यासपीठ...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून साकार झालेले वैद्यकीय मदत कक्ष गरजू नागरिकांसाठी आपल्या हक्काचे व्यासपीठ आहे. नेरुळमधील पक्षाच्या मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालयात नागरिकांसाठी २४ तास वैद्यकीय सेवा मदत कक्ष सुरु झाला आहे. आजारावर बिलात सवलत, आर्थिक मदत, विविध दुर्धर आणि महागड्या आजारावर राज्य तसेच केंद्र आणि विविध चॅरिटी हॉस्पिटल कडून कशी आणि कोठून निधी मिळेल याची माहिती, मार्गदर्शन आणि प्रत्यक्ष मदत कक्षातून नागरिकांना उपलब्ध होणार  आहे. कार्यकर्त्यांनी स्वयंस्फूर्तीने गरजू नागरिकांना मदत करण्यासाठी प्रयत्नशील रहावे. -अशोक गावडे, माजी उपमहापौर तथा निमंत्रक-वैद्यकीय मदत कक्ष.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

‘एपीएमसी'तील प्रसाधनगृह चौकशी मागे राजकीय षडयंत्र -शशिकांत शिंदे