गरजेपोटी बांधलेल्या घरांना कायम करण्याचा शिंदे ,फडणवीस सरकारचा निर्णय

   नवी मुंबई : गेल्या ३५ वर्षा पासून प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेल्या घरांना कायम करण्या संदर्भात सातत्याने मागणी केली जात होती. गेल्या अनेक वर्षांपासून प्रकल्पग्रस्तांच्या गरजेपोटी बांधलेल्या घरांना कायम करावे ही मागणी सातत्त्याने जोर असताना गेली चाळीस वर्षे शासन दरबारी हे भिजत घोंगडे पडले होते.परंतु नवी मुंबई महापालिकेचे माजी आयुक्त तथा बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे उपनेते  विजय नाहटा यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रमुख विजय चौगुले, उपजिल्हा प्रमुख शिवराम पाटील, रोहिदास पाटील, किशोर पाटकर यांच्या पाठपुराव्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रकल्पग्रस्त बांधवांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न निकाली काढला आहे.

 

गरजेपोटी बांधलेल्या घरांना कायम करण्याचा शिंदे ,फडणवीस सरकारने निर्णय घेतला असून गरजेपोटी बांधलेल्या घरांना कायम करण्याची घोषणा केली आहे.मागील २५ फेब्रुवारी २०२२ रोजी तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सानपाडा येथे पत्रकार परिषद घेऊन प्रकल्पग्रस्तांची घरे कायम करण्याचा शासन निर्णय जाहीर केला होता. परंतु, त्यावेळी जाहीर केलेला प्रति चौरस मीटरचा दर ० ते २५० चौ. मिटरला ३० % आणि २५१ ते ५०० चौ. मिटरला ६० % असा दर लावण्यात आला होता. त्यामुळे दर जास्त असल्याची भावना स्थानिक भुमीपुत्रांनी व्यक्त करून नाराजी दर्शविली होती. जनभावनेचा विचार करून विजय नाहाटा यांनी प्राप्त परिस्थिती विध्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कानावर घालून क्षेत्रफळाच्या दरात कपात करण्याची मागणी केली होती. एव्हढे जास्त दर भरणे भूमिपुत्रांना शक्य नसल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लेखी निवेदनाव्दारे कळवून दर कमी करण्याची  मागणी करून सातत्याने पाठपुरावा केला होती. 

गेल्या अनेक वर्षा पासून होत असलेल्या प्रकल्पग्रस्तांच्या मागणीचा आदर करून त्यांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धोरणात्मक शासन निर्णय जाहीर केला आहे. त्यात प्रकल्पग्रस्त नागरिकांनी गरजेपोटी बांधलेल्या घरांना कायम करून  0 ते 250 चौ. फूट क्षेत्रफळाला प्रचलित सिडकोच्या राखीव दराला ( R.P.) दराच्या प्रमाणात १५ % आणि 251 ते 500 चौ. फूट. क्षेत्रफळाला 25 % दर लागू करण्यात आले आहेत. भूमीपुत्रांच्या अडचणीची जाणीव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आहे म्हणून त्यांनी उपनेते विजय नाहटा व जिल्हा प्रमुख विजय चौगुले यांच्याशी चर्चा करून आर.पी.दरात कपात केल्याची घोषणा केली आहे.

      शासनाच्या या धोरणात्मक निर्णयामुळे नवी ठाणे,नवी मुंबई ,रायगड येथील परिसरातील स्थानिक प्रकलग्रस्त बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. स्थानिक भूमिपुत्रांनी महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच बाळासाहेबांची शिवसेनेचे उपनेते विजय नाहटा व जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांचे आभार व्यक्त केले आहेत.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

नवीन शेवा ग्रामपंचायत निवडणूक प्रचार शिगेला