नवीन शेवा ग्रामपंचायत निवडणूक प्रचार शिगेला

उरण : रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील अठरा ग्रामपंचायतिच्या निवडणूकीची  रणधुमाळी सुरू आहे, गुरुवार दिनाकं 15 डिसेंबर 2022 रोजी शिवसेना जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार  मनोहर भोईर यांच्या अध्यक्षतेखाली नवीन शेवा ग्रामपंचायत निवडणूकिसाठी शिवसेना-शे का पक्ष युतीचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ झालेली जाहीर सभा मोठ्या प्रतिसादात व दणक्यात संपन्न झाली, या सभेत मार्गदर्शन करताना  माजी आमदार मनोहर भोईर म्हणाले की,  शेव्याच्या विकास कामासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, आमची  25 वर्ष सत्ता असताना व 5 वर्षे  नसताना सुद्धा आम्ही गावासाठी केलेली कामे ही लोकांसमोर आहेत, गावाच्या वाढीव गावठाणासाठी मी आमदार असताना व आता तीन वर्षे नसताना केलेला प्रयत्न व पाठपुरावा हे वेळोवेळी गावासमोर मांडले आहे, ते मिळवून दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही, जेएनपीटीमध्ये येणाऱ्या नवीन पोर्ट म्हणजेच जे एन बक्सी, जेएनपी सेझ व  इतर कंपन्यांच्या माध्यमातून तरुण पिढीला नोकऱ्या व रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत, त्यामुळे मला खात्री आहे नवीन शेव्यातील मतदार हे शिवसेना-शे का पक्ष युतीचे उमेदवार यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहेत. यावेळी उरण तालुकाप्रमुख  संतोष ठाकूर, शेकापक्षाचे नेते राजेंद्र पाटील, रमाकांत म्हात्रे, उपतालुकाप्रमुख  कमलाकर पाटील, उपतालुका संघटक  के एम घरत, द्रोणागिरी शहरप्रमुख  जगजीवन भोईर, कामगार नेते  गणेश घरत, जेएनपीटी वसाहत शाखाप्रमुख एल जी म्हात्रे, जेष्ठ कार्यकर्ते  धनाजी भोईर, सरपंच पदाच्या उमेदवार सोनल घरत, उमेदवार भावना भोईर यांचीही दणक्यात भाषणे झाली.

यावेळी शेकापक्षाचे तालुका चिटणीस  विकास नाईक, शिवसेनेचे तालुका संपर्कप्रमुख जेपी म्हात्रे, उधोगपती दयाळ भोईर, दीपक भोईर, शे का पक्षाचे  मयूर सुतार, किसन सुतार, शाखाप्रमुख  शैलेश भोईर, महिला शाखाप्रमुख वैशाली सुतार व शेकापक्षाचे महेश म्हात्रे, यांच्यासह शिवसेना-शेकापक्ष युतीचे प्रभाग क्र.1 चे उमेदवार मयुरी मनोजकुमार घरत, रेखा महेश म्हात्रे, भुपेंद्र रामचंद्र पाटील, प्रभाग क्र.2  कुंदन नारायण भोईर, सतिश जनार्दन सुतार, भावना रोहित भोईर, प्रभाग क्र. 3  अशोक मोरेश्र्वर दर्णे, प्रणिता अमित भोईर व वैशाली अशोक म्हात्रे तसेच शिवसेना - शेकापक्ष युतीचे आजी-माजी पदाधिकारी, जेष्ठ-श्रेष्ठ कार्यकर्ते, महिला कार्यकर्त्या व शिवसैनिक मोठया संख्येने उपस्थित होते.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

बेलापूर गांव येथे महाआरोग्य शिबीर संपन्न