दिवाळीत आनंदाबरोबर सुरक्षितताही जपा ! नॅशनल बर्न्स सेंटरचा नागरिकांना सावधतेचा सल्ला
पंजाब जिंकलो आता लक्ष पनवेल महानगरपालिका
खारघर: पंजाब विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीने एकतर्फी विजय मिळविल्यावर पनवेल पालिका हद्दीतील आपचे कार्यकर्ते एकत्र येवून पंजाब जिंकलो आता लक्ष पनवेल महानगरपालिका हे घोष वाक्य घेवून पक्ष नोंदणीची मोहीम हाती घेवून पालिका हद्दीतील विविध नोड मध्ये जनजागृतीचे काम हाती घेतले आहे.
आम आदमी पार्टीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली मध्ये मोफत वीज, पाणी तसेच शिक्षण, आरोग्य आदी जनहिताचे काम केले आहे. आप कडून जनहिताचे काम केले जात असल्यामुळे दिल्लीच्या शेजारी असलेल्या पंजाब राज्यात पक्षाला मतदारांनी बहुमताने निवडून दिल्यामुळे आम आदमी पक्षावर लोकांचा विश्वास वाढत असल्यामुळे पनवेल पालिका हद्दीतील आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते एकत्र येवून पनवेल पालिका हद्दीत आम आदमी पक्षाकडून पनवेल पालिकेवर एकहाती विजय मिळविण्यासाठी आता पासून जनजागृतीचे काम हाती घेत नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन करीत आहे. नागरिकांच्या गाठीभेटीसाठी पनवेलमध्ये जनसंपर्क कार्यालय सुरु करण्यात केले आहे. ज्या भागात आम आदमी पक्षाकडून सभा बैठका घेतल्या जात आहे. त्या भागात नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात नागरिकांचा प्रतिसाद मिळत असल्याचे आपच्या पदाधिकाऱ्यानी सांगितले.
पनवेल पालिका हद्दीत आम आदमी पक्षाचे कार्य तसेच पक्ष वाढीसाठी जनजागृतीचे काम सुरू आहे. नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. दिल्ली सारखे काम पनवेल पालिकेत व्हावे अशी मागणी नागरिकांची आहे. तसेच पालिका निवडणुकीत सर्व जागेवर निवडणूक लढविण्याचा संकल्प पक्षाचा आहे.- अॅड.जयसिंग शेरे, कार्याध्यक्ष पनवेल महानगरपालिका पनवेल तालुका आम आदमी पार्टी.