दिवाळीत आनंदाबरोबर सुरक्षितताही जपा ! नॅशनल बर्न्स सेंटरचा नागरिकांना सावधतेचा सल्ला
शिवाई महिला मंडळाच्या महिला मेळाव्याला उत्स्फुर्त प्रतिसाद
सानपाडा : महिला दिनाचे अवचित्य साधून दरवर्षी विशेष कार्यकारी अधिकारी व शिवाई महिला मंडळाच्या अध्यक्ष शुभांगी मिलिंद सूर्यराव आणि त्यांच्या सर्व सभासद एकत्र येऊन महिला मेळावा आयोजित करतात. या वर्षी सुद्धा शनिवार दिनांक १२ मार्च २०२२ रोजी सानपाडा येथील सौराष्ट्र हॉल येथे महिलानं करीता हळदी कुंकवाचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला शेकडो महिला उपस्थित होत्या. शिवसेनेचे उपनेते विजय नाहटा, उपजिल्हा प्रमुख मिलिंद सुर्यराव, डॉ.आर.एन. पाटील यांनी उपस्थित राहून महिलांना मार्गदर्शन केले.
या स्नेहसंमेलनात महिलांनी विविध कला सादर करीत आपल्या नृत्याने, गाण्याने, प्रेक्षकांची मने जिंकलित. महाराष्ट्राचा लावणी सम्राट व नवी मुंबई भूषण अश्मिक कामठे यांच्या लावणी सादरीकरणाने कार्यक्रमात रंगत भरली.
महिलांकरिता विविध खेळ सादर करण्यात आले व विजेत्या महिलांना बक्षिसे प्रदान करण्यात आली. उपस्थित सर्व महिलांना वाण देऊन हळदी कुंकवाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करत शिवाई महिला मंडळाला शुभेच्छा दिल्या.