गोर गरीब बांधवांसाठी झटणारा आदर्शवत समाजसेवक म्हणजे बापू मोकल - महेंद्र घरत

उरण  :  शासकीय सेवेतून निवृत्त झाल्यावर घरी न बसता, आपण समाजाचे कोणीतरी देणे करु लागतो या भावनेतून गोरं गरीब बांधवांच्या अडीअडचणी समजून घेऊन त्या सोडविण्यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न करणारा आदर्शवत समाजसेवक म्हणजे चिरनेर गावातील बापू मोकल असे गौरव उद्गार काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी व्यक्त केले.

 काँग्रेस पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी २५ सप्टेंबर १९३० सालच्या गौरव व शौर्यशाली चिरनेर जंगल सत्याग्रहाच्या पावन झालेल्या अक्कादेवी भूमिला काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते मिलिंद पाडगांवकर, महेंद्र ठाकूर, डॉ मनिष पाटील,रायगड जिल्हा परिषद सदस्य बाजीराव परदेशी, मार्तंड नाखवा, तालुकाध्यक्ष विनोद म्हात्रे,कुष्णा नवाळे,माजी सरपंच अविनाश पाटील, युवा नेते राजेंद्र भगत यांच्या उपस्थितीत शुक्रवारी ( दि११) भेट दिली.यावेळी चिरनेर गावातील सामाजिक कार्यकर्ते बापू मोकल यांनी काँग्रेस पदाधिकारी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. याप्रसंगी महेंद्र घरत हे बोलत होते.

    करोना महामारीत मागील दोन वर्ष गोर गरीब बांधव होरपळत असताना, त्या गोर गरीब बांधवांना तसेच आदिवासी बांधवांना अन्नधान्या बरोबर इतर मूलभूत सुविधा, रुग्णालयात औषध उपचार करून देण्यासाठी चिरनेर महागणपती देवस्थानच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते बापू मोकल यांनी स्वखर्चाने अहोरात्र कोणत्याही प्रकारची प्रसिध्दी न घेता पुढाकार घेतला. तसेच परिसरातील रहिवाशांना भविष्यात आँक्सिजनची कमतरता भासू नये यासाठी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने ओसाड माळरानावर १० हजार वुक्षांची लागवड व संवर्धन करण्याचे काम हुतात्म्यांच्या स्मूती दिनी सुरू केले.अशा बापू मोकल यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून प्रत्येकांनी कार्यरत राहणे गरजेचे आहे. असे आवाहन महेंद्र घरत यांनी केले.

    यावेळी बापू मोकल यांनी आपल्या परिसरातील गोरं गरीब बांधवांच्या तसेच आदिवासी बांधवांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी महेंद्र घरत यांनी पुढाकार घ्यावा असे सुचित केले. याप्रसंगी रायगड जिल्हा परिषद सदस्य बाजीराव परदेशी, माजी सरपंच तथा काँग्रेस तालुका उपाध्यक्ष पद्माकर फोफेरकर, काँग्रेस पक्षाचे युवा नेते राजेंद्र भगत, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष उमेश भोईर, ग्रामपंचायत सदस्य किशोर भगत, तिरंगा पतपेढीचे व्हा चेअरमन सूनील नारंगीकर, विकास म्हात्रे,किरण कुंभार, रमेश गोंधळी,प्रविण म्हात्रे,संगम म्हात्रे, आदिवासी बांधव, ग्रामस्थ उपस्थित होते.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

काही दिवसातच सरकारची काळी कृत्य अधिवेशनात सर्वांना दिसून येतील