दिवाळीत आनंदाबरोबर सुरक्षितताही जपा ! नॅशनल बर्न्स सेंटरचा नागरिकांना सावधतेचा सल्ला
रबाळे येथे विजय चौगुले यांच्या हस्ते जनसंपर्क कार्यालयाचा उद्घाटन समारंभ संपन्न
शिवसेनेचे समाजसेवक गणेश दगडे यांच्या साईबाबा नगर येथील जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन दिलीप काकनाटे यांच्या नेतृत्वात राज्यमंत्री दर्जा व नवी मुंबई महापालिका मा. विरोधी पक्ष नेते विजय चौगुले यांच्या हस्ते कार्यालयाची फीत कापून करण्यात आले.
येत्या निवडणुकीत महापालिकेवर भगवा फडकवण्यासाठी शिवसेनेने जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून तयारी सुरू केली आहे, साईबाबानगर येथील जनतेच्या मूलभूत समस्या सोडविण्यासाठी नगरसेवक निवडून देण्याचे आवाहन विजय चौगुले यांनी उद्घाटन सोहळ्याला शुभेच्छा देत स्थानिक मतदारांना केले.
याप्रसंगी मा.नगरसेवक राम आशिष यादव, मा.नगरसेवक जगदिश गवते, मा.नगरसेवक बहादुर बिष्ट, समाजसेविका ज्योतीताई दगडे, विभाग प्रमुख सं परुळेकर, उपविभाग प्रमुख संजय देसाई, समाजसेविका वत्सलाबाई कांबळे, समाजसेवक सुन्दरलाल जाधव, नामदेव भालेराव, चांद शेख, वाजिद शेख, सलीम शेख, महेंद्र सावंत, मोनीश हलगे, समाजसेवक नंदू मेहकर, मोफतलाल जाधव, बिरजू जाधव, रमेश दगडे, संदीप दगडे, संजय दगडे, दिलीप दगडे, रवी पवार, संतोष मगरे, माधव शिरसाट, रवी साळुंके, रवि सूर्यवंशी, राहुल सातपुते, विवेकानंद मिश्रा, सीताबाई डोंगरे, संगीता काकनाटे, रंजना पंडित, पिंकी चौधरी, रूपाली दगडे, मिनाक्षी जाधव, समाजसेवक बाळू जाधव, दिनेश यादव, चंद्रकांत काकनाटे, रत्नदीप गायकवाड, राज धावणे, रमेश मिष्रा, सचिन मिश्रा, गुंडाप्पा रमन, शिवा दर्गा, पांडुरंग कांबळे, रमेश सूर्यवंशी, बालाजी सूर्यवंशी, रोशन चक्रे, अविनाश साठे, आकाश साळवे, सूर्यकांत कदम, तातेराव चंदनशिवे, अनिकेत गोटमुकले, यांच्यासह बहुसंख्य शिवसैनिकांच्या उपस्थितीत कार्यालयाचा उद्घाटन सोहळा पार पडला.
यावेळी उपस्थित मान्यवरांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी महिला शिवसैनिकांची उपस्थिती लक्षणीय होती.