दिवाळीत आनंदाबरोबर सुरक्षितताही जपा ! नॅशनल बर्न्स सेंटरचा नागरिकांना सावधतेचा सल्ला
महिषासुरमर्दिनी
समस्त देवतांना उपद्रवकारी ठरलेल्या महिषासुर या दैत्याने अंबामातेला ‘तू सुंदर आहेस. तू माझी वधू हातू सुंदर आहेस. तू माझी वधू हो असे देवीच्या सुंदर रुपावर भाळून सांगितले. ‘मी वधू म्हणून नाही; तर तुझा वध करण्यासाठी उभी ठाकले आहे' असे देवीने त्याला वीरोचित प्रत्युत्तर केले. देवतांच्या हाकेला ओ देऊन देवीने उन्मत्त महिषासुर दैत्याचा वध केला. म्हणूनच तिला महिषासुरमर्दिनी असे नाव पडले.
नवरात्र म्हणजे देवीचा उत्सव, अंबेचा उत्सव. अंबा म्हणजे माता. म्हणून हा मातेचाही उत्सव ठरतो. अंबा, माता यांना आपल्या संस्कृतीत देवीचे स्थान प्राप्त झालेले आहे. आपल्या देवीभागवत पुराण कालिकापुराण, दुर्गासप्तशती सारख्या ग्रंथांनी तिचा उदंड महिमा गायलेला आहे. दुर्गा, कालिका, अंबिका, महिषासुरमर्दिनी ही तिचीच रूपे, तिचीच नावे.
समस्त देवतांना महिषासुर नामक दैत्याने सळो की पळो करून सोडले होते. त्राहि माम् मला वाचव अशी आर्त साद घालीत त्या देवीला शरण गेल्या. महिषासुरवधाखातर इंद्राने वज्र, विष्णु देवतेने सुदर्शनक्र, तर महादेवाने त्रिशूल ही आपापली शस्त्रास्त्रे देवीच्या स्वाधीन केली. तू सुंदर आहेस. तू माझी वधू हो असे देवीच्या सुंदर रुपावर भाळून महिषासुर म्हणाला. मी वधू म्हणून नाही; तर तुझा वध करण्यासाठी उभी ठाकले आहे असे देवीने त्याला वीरोचित प्रत्युत्तर केले. देवतांच्या हाकेला ओ देऊन देवीने उन्मत्त महिषासुर दैत्याचा वध केला. म्हणूनच तिला महिषासुरमर्दिनी असे नाव पडले.
शाळेच्या पाठ्यपुस्तकात आम्हाला महिषासुरमर्दिनी देवीची आरती अभ्यासाला होती. नरहरी नामक कवीने लिहिलेली ती आरती मला फार आवडायची. आजही आवडते. या कवीबद्दल फारशी माहिती नाही. माझ्या मते हा कवी अठराव्या शतकात होऊन गेला असावा. त्याआधी त्याचा आविर्भाव काळ जाऊ शकत नाही. मात्र ही आरती निवडक मराठी आरती वाङ्मयात शीर्षस्थानी असलेल्या आरत्यांमध्ये गणली जावी अशीच आहे.
दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी
अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी
वारी वारी जन्म मरणाते वारी
हारी पडलो आता संकट निवारी
जय देवी जय देवी महिषासुरमर्दिनी
सुरवर ईश्वरवरदे तारकसंजीवनी
अंबे तुजवाचून कोण पुरवील आशा
नरहरी तल्लीन झाला पदपंकजलेशा
या महिषासुरमर्दिनी देवीचा नरहरी कवीने गायलेला महिमा अगाध आणि अद्वितीय वाटतो. कवीचे शब्दचयन आणि कल्पनाविलास कौतुकास्पद आहे. आपल्या धार्मिक प्रतीकांचा कवी नरहरीने येथे उचित वापर केला आहे.
आरती हा मराठी वाङ्मयातला एक जुना; पण प्रभावी साहित्यप्रकार. तो आपले सांस्कृतिक धनही आहे. ते आपण जपले पाहिजे. - नाना ढवळे