वर्षभरातील उत्सवांबरोबरच प्रथा साजरे करताना...

प्रत्येक उत्सवाच्या कालावधी दरम्यान मानव निर्मीत उपयोगी जीवनावश्यक वस्तूंची रुढी परंपरांच्या नावाखाली मानवतेच्या दृष्टिकोनातून अज्ञानापोटी चुकीच्या प्रथा अस्तित्वात असतील ! किंवा हानी पोहोचत असेल! तर आजच्या विज्ञान प्रगतशील युगात आपल्याला यांचा गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता आहे.

बेंदूर (बैल पोळा) : शेतकरी राजा हा संपूर्ण जगाचा पोशिंदा आहे. बेंदूर उत्सव हा (सण) त्याच्या जीवनातील अत्यंत आनंदाचा उत्सव माणला जातो आहे. बैल हा शेतकरी  बांधवांचे माल वाहतूकीसाठी किंवा दळणवळणासाठी एक माध्यम मानलं जातं. काळ्या आईची सेवा ऊन्ह, पावसात, थंडी वाऱ्यात, मशागतीची कामे अत्यंत प्रामाणिकपणे आपल्या धन्याची अखंड सेवा करीत असतात. बेंदूर हा सण शेतकरी बांधवांच्या जीवनातील सर्वात आनंदाचा क्षण मानला जातो. बैलांना स्वच्छ आंघोळ घालून (धुवून), सजवून, प्रत्येक शेतकऱ्यांच्या घरी गोडधोड पदार्थ बैलांना खायला देऊन त्यांची गावांतून वाजत गाजत मिरवणूक काढली जाते. काही भागात गावच्या वेशीवर तोरणं बांधून ती गावातील प्रतिष्ठीत घराण्यातील बैलांच्या साहाय्याने तोडली जाते. हा उत्सव साजरा करीत असतांना काही ठिकाणी रुढी पंरपरा किंवा प्रथा चुकीच्या दिसून येतात.

बेंदुराच्या दिवशी पाची पक्वान्नाचे फराळ बनवले जातात. सर्व पै पाहुणे नातेवाईक, मित्रमंडळींना आग्रहाचे निमंत्रण पत्रिका दिल्या जातात. प्रत्येकांच्या घरपती बकरी कापली जातात. मांसाहरी जेवणा बरोबर बाकीच्या ही सुविधांची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येते. गावात इतकी गर्दी होती की एकंदरीत जत्रेचे स्वरूप प्राप्त झालेले असते. भरपूर प्रमाणात खर्चही केला जातो. मात्र गोरगरीब या महागाईत भरडला जातो आहे. खास स्पेशल सिटी बसेसची व्यवस्था केली जातेकिंवा सोडल्या जातात. पै पाहुण्यांच्या सेवा किंवा व्यवस्था करण्यात गुंतल्यामुळे ज्यांच्यासाठी हा उत्सव साजरा करण्यात येतो, तो बैल मात्र उपाशीपोटी गोठ्यातील बंदिखान्यात बंद असतो. त्यामुळे प्रामुख्याने मुख्य उद्देश बाजूला ठेवून उत्सव साजरा केला जातो. तेंव्हा तो दिवस बैलांच्या आनंदोत्सव म्हणूनच साजरा केला जावा.

 नागपंचमीः- प्रामुख्याने शेतकरी बांधव दिवसरात्र शेतीच्या कामानिमित्त रानातील जात असतात. अनेकवेळा विविध प्रकारचे सर्प दिसत असतात. काही वेळा सर्पदंश होऊन शेतकरी बांधवांना मृत्यूशी सामना करावा लागतो. त्यांच्यापासून आपले संरक्षण व्हावे या भ्रामक चुकीच्या समजुतीमुळे त्या दिवशी चिखलाचा नागोबा तयार करून त्याची मनोभावे पूजा अर्चा केली जाते. कर्नाटक भागात पाच पक्वानांचे पदार्थ बनवून फार मोठ्या प्रमाणात हा सण साजरा केला जातो. प्रत्येक गांवागांवात महिलांसाठी वेगळे आणि पुरुषांच्या साठी वेगळे पाळणे मोठ्या झाडांना बांधून दिवसभर पाळणा खेळतात. घरी रव्याचे, बुंदीचे, पोह्याचे,भाजलेल्या तांदळाच्या पिठापासून तंबीठाचे लाडू तयार करून मोठ्या मातीच्या मडक्यात ठेवून श्रावण महिन्यात उपवासाला खात असत. मातीच्या खापरात ऊंडा  घालतात. सर्व महिलांना नवीन कपडे, केसांची वेणी बांधण्यासाठी रंगीबेरंगी रेबीन घेतली जाते. मुलांना सुकलेल्या खोबऱ्याच्या वाटीत नारळीच्या काड्या टोचून त्याला मध्यभागी दोरा बांधून दिवसभर गोल फिरवत असतात. डोळे बांधून मडकी फोडणच्या स्पर्धा आयोजित केल्या जात होत्या. गावातील महिला नटून थटून रानातील वारुळांची दुध लाह्या वाहून पुजा अर्चा करतात.

इतर वेळी सर्पाचे दर्शन झाल्यावर माणूस घाबरून पळ काढतात आणि माणसाला घाबरुन सर्प आपला प्राण वाचविण्यासाठी पळ काढतात. वेळ प्रसंगी हातात उपलब्ध असतील त्या माध्यमांचा वापर करून सर्पाना ठार मारुन, त्याचं डोकं चेचून नंतर त्याच्या तोंडात पैसे घालून त्याला जाळून टाकले जाते. एखाद्या वेळेस सर्पाला दुखलं तर तो डुख  धरुन पाठलाग करत घरी येऊन आपला दंश करतो. किवा बदला घेतो, म्हणून मांत्रिकाकडे जाऊन वाळू किंवा तांदूळ मंत्रून आणतात. स्वतःजवळ आणि घराच्या सभोवताली टाकून देतात. सर्पाबद्दल माणसांत अज्ञानामुळे चुकीच्या गैरसमजुती पसरवलेल्या आहेत. सर्प कधीच एखाद्याचा बदला घेण्यासाठी डुख धरत नाही. स्वतःहून चावत नाही. इतर कोणत्याही प्राण्यांची चाहूल लागली की तो आत्मसंरक्षणासाठी फक्त नाग सर्प आपल्या हालचालींवर नजर ठेवून थांबतो. बाकीचे सर्व सर्व घाबरून पळून जातात. सर्वंच सर्प विषारी नसतात. जगात ८० टक्के सर्प बिनविषारी आहेत.२० टक्के सर्प विषारी असतात. त्या पैकी आपल्याकडे नाग, मण्यार, घोणस, फुरसे. काही सर्प अंडी घालतात; तर काही सर्प पिलांना जन्म देतात. सर्वात जास्त पिले देणारा सर्प म्हणजे घोणस. तीस ते साठ पिलांना एकाच वेळी जन्म देत असतो. सर्पाला कान नसल्याने त्याला कोणत्याही प्रकारचा आवाज ऐकायला येत नाही. सर्प कधीच दुध पीत नाही. तो पुर्ण मांसाहारी आहे. आपल्या घरात धान्य असते. ते खाण्यासाठी उंदीर येतात. उंदीर खाण्यासाठी सर्प घरी येतात. शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे नुकसान उंदीर करतात. त्यांचा बंदोबस्त करण्याचे कार्य सर्प करत असतात. म्हणून सर्प हा शेतकरी बांधवांचा शत्रू नसून मित्र आहे. सर्पाच्या विषाने दंश केलेलाच प्राणी दगावू शकतो.

वर्षाला उंदरांच्या एका जोडप्यापासून ८८८ उंदरांची निर्मिती होत असते. यांच्या नियंत्रण ठेवण्याचे कार्य सर्प करीत असतात. विषारी सर्पाने दंश केल्यास आज सर्व शासकीय दवाखान्यात औषध उपचार पद्धती उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तेव्हा अज्ञानापोटी सर्पांना मारुन टाकू नका. निसर्गाच्या नियमाप्रमाणे जगा आणि जगू द्या हा निसर्गाचा नियम आहे. येथे प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे.

रक्षाबंधन ( नारळी पौर्णिमा)ः कोळी बांधव एकत्र येऊन वाद्यांच्या तालावर नाचत गाणी म्हणत जोमाने उत्सव साजरा करीत असतात.कोळी बांधव स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी समुद्रात मासेमारी करण्यासाठी या उत्सवापासून सुरुवात करीत असतात. समुद्रातील भरती, लाटांपासून आपल्या बांधवांचे संरक्षण व्हावे म्हणून समुद्राला मनोभावे पूजा करून नारळ वाढवून मासेमारी कार्याला सुभारंभ  करीत असतात. रक्षाबंधन भावाकडून बहिणीचं संकटांच्या वेळी रक्षण व्हावे या उद्देशाने बहिण आपल्या भावाचे हात बळकट करण्यासाठी भावाच्या हातात रक्षणाचे बंधन म्हणून रक्षणासाठी राखीचा धागा दरवर्षी बांधत असते. पुर्वी काही भागात गावातील गुरव धाग्याला हळद लावून प्रत्येकाच्या घरी  जाऊन देत असत. त्याला त्या वेळी पोतं म्हणतं असतं. पोत्याची (पुणाव) किंवा पौर्णिमा म्हटले जात होते. तो धागा घरातील सर्वांना वडीलधारी माणसांच्या हस्ते हातात बांधला जात होता. नंतर तोच धागा शेतकरी धान्याची मळणीच्या वेळी खळ्यासाठी उभ्या केलेल्या लाकडी मेडकीला बांधत असतं.आजकाल दिवसेनदिवस परिस्थिती फारच बदलत चाललेली दिसून येते. सर्वत्र बाजारीकरण आणि व्यापारीकरण दिसून येते. डझनांने राख्या बांधून घ्ोतलेल्या दिसतात. पण हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच भाऊ बहिणीचे रक्षण करणारे दिसून येतात. काही जण राखी बांधून बहिण भाऊ म्हणून जवळीक करतात आणि कालांतराने प्रेमात रूपांतर होऊन विवाह केलेली उदाहरण पहावयास मिळतात. त्यामुळे बहिण-भावाच्या पवित्र नात्याला कुठेतरी गालबोट लागलेलं पहावयास मिळते. जो तो आपल्या सोयीनुसार वापर करत असलेला दिसून येतो. राख्या बांधून मिरविण्यापेक्षा त्यामागील मुख्य उद्देश समजून तो आपल्या जीवनामध्ये आचरणात आणणें महत्त्वाचे आहे. - आयु. देशमुख पी.आर. 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

 एकाच ह्या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मेन मी....