दिवाळीत आनंदाबरोबर सुरक्षितताही जपा ! नॅशनल बर्न्स सेंटरचा नागरिकांना सावधतेचा सल्ला
गुरूचा मान, तेच समाजाचे उत्थान !
राजकारण्यांनी मास्तरांना शिक्षणासह सरकारच्या इतर कार्यातही वापरायला सुरूवात केल्यामुळे शिक्षकांचा समाजातील मान खालावला. एखाद्या कार्यालयातील चपराशाला जेवढा मान मिळतो, तेवढाही मान मास्तरांना मिळेनासा झाला. यामुळे शिक्षकही आपल्या कामापुरतेच पाहू लागले. शिकवा किंवा नको शिकवा ते आपल्या पगारापुरताच विचार करू लागले. त्यामुळे गुरू-शिष्यांतील नात्यात दुरावा येऊ लागला. शिक्षक आपले कर्तव्य विसरून, निती विसरून समाजातील अप-प्रवृत्तीचे बळी बनु लागले. त्यांच्यात निराशेने शिरकाव केला आणि त्यांची मानसिक स्थिती बिघडून गेली.
नुकताच पाच सप्टेंबर हा दिवस ‘शिक्षक दिवस' म्हणून साजरा करण्यात आला होता, शिक्षक दिनाचे औचित्य साधून देशभरातील आदर्श शिक्षकांना राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पूर्वीच्या काळात विविध गुरूच्या आश्रम शाळा असायच्या त्यात गुरूजन आपल्या चेल्यांना विविध प्रकारच्या विद्येत पारंगत करायचे व शिक्षण पूर्ण होताच त्यांना आपापल्या घरी पाठवायचे. त्या काळात गुरूकुलात राजे महाराजाचीच मुले किंवा तत्कालीन श्रीमंताची मुले असायची.
दिवस बदलत गेले. शिक्षण पद्धतीत सुधारणा झल्या. गुरूकुलाची जागा, शाळांनी घेतली, ‘गुरूच्या ऐवजी गुरूजी झाले. हे गुरूजी आपल्या विद्यार्थ्यांकडून कसून अभ्यास करून घ्यायचे. वेळप्रसंगी शिक्षाही करायचे व म्हणायचे, ‘छडी लागे छम् - छम्, विद्या येई घम् घम्' त्यावेळी मुलांचे पालक गुरूजींना शिक्षेबद्दल अवाक्षरही बोलायचे नाहीत; उलट गुरूजींची तारीफच करत. कारण त्यांना माहित होते, की आपल्या पाल्याच्या भविष्यासाठी व त्यांच्या प्रगतीसाठी गुरूजींचे वागणे योग्य आहे.
कालांतराने त्यातही मोठे बदल होत गेले, गुरूजींची जागा मास्तरांनी घेतली. मास्तर म्हटला की, त्याला गुरूजींचा मान मिळेनासा झाला. कारण राजकारण्यांनी मास्तरांना शिक्षणासह सरकारच्या इतर कार्यातही वापरायला सुरूवात केली, मग ती जनगणना असो वा निवडणुकीत मतदान केंद्रावर सुपर व्हिजन असो, वा इतर कोणत्याही योजनाचा प्रचार प्रसार असो. त्यामुळे शिक्षकांचा समाजातील मान खालावला. एखाद्या कार्यालयातील चपराशाला जेवढा मान मिळतो, तेवढाही मान मास्तरांना मिळेनासा झाला. त्याचा परिणाम व्हायचा तोच झाला. शिक्षकही आपल्या कामापुरतेच पाहू लसगले. शिकवा किंवा नको शिकवा ते आपल्या पगारापुरताच विचार करू लागले. त्यांनी आपली खरी ओळख विसरायला सुरूवात केली व आपले कर्तव्य व आपली नितीमत्ता सोडायला सुरूवात केली. त्यामुळे गुरू-शिष्यांतील नात्यात दुरावा येऊ लागला. त्यातच भर की, काय शिक्षक आपले कर्तव्य विसरून, निती विसरून समाजातील अप-प्रवृत्तीचे बळी बनु लागले. त्यांच्यात निराशेने शिरकाव केला. ते डिप्रेशनमध्ये जावू लागले आणि त्यांची मानसिक स्थिती बिघडून गेली. त्यांना चांगले वाईटाचे भान न राहिल्याने त्यांच्याकडून अमानवीय वर्तन घडू लागले. त्याची प्रचिती आपल्याला रोज येत आहे. त्यामुळे सध्याच्या स्थितीत शिक्षकांवर विश्वास ठेवला जात नाही. त्यामुळेही शिक्षकांची मानसिक स्थिती खालावत चालली आहे. त्यातच, त्यांच्यावर अत्याधुनिकतेचा व सोशल मिडियाचा पगडा बसत चालला आहे.
समाजात अत्याधुनिकतेच्या नावाखाली, स्वैराचार, हिंसाचार, व्यभिचार व नशापान वाढत चालले आहे. ज्यांच्याकडे मुबलक पैसा आहे ती मंडळी या सर्व गोष्टी सहजगत्या करू शकतात, मात्र शिक्षकांकडे यासाठीचा पुरेसा पैसा नसल्याने त्या गोष्टी सहजासहजी करू शकत नाहीत आणि त्या गोष्टी मिळवण्यासाठी ते वाम मार्गाचा अवलंब करत आहेत. अर्थात सर्वच शिक्षक मंडळी त्यात नाहीत. समाजात चांगले लोक आहेत, तसेच वाईटही आहेत. चांगल्यांचे प्रमाण जास्त आहे, वाईटाचे प्रमाण कमी असले तरी, बदनाम सर्वांनाच केले जाते ही आपली सामाजिक मानसिकता आहे, त्यात कुठेतरी बदल घडवून आणला पाहिजे. त्यात शिक्षकांनाही सामील करून घेतले पाहिजे. हा विचार असला आणि त्याची अंमलबजावणी करायचे ठरवले तरी ती तेवढी सोपी गोष्ट नाही. आपल्या व्यवस्थेत शिक्षकांवर विश्वास दाखविणे एवढे सोपे काम नाही. प्रत्यक्षात ते पीडित आहेत. आपल्याला वाटते, शिकवण्याचे काम कोणीही करू शकतो. शिक्षकांची ती मवतेदारी नाही. खरं तर शिकवणे वाटते तितके सोपे नाही. सर्वच विद्यार्थी समान बुद्धिमत्तेचे नसतात, त्यातच नाठाळ विद्यार्थी स्वतःबरोबर इतर चांगल्या विद्यार्थ्यांनाही बिघडवण्याचे काम करतात. अशा विद्यार्थ्यांना स्वार्थी आणि मतलबी राजकारण्यांचा राजकीय आश्रयही मिळतो, केवळ राजकीय आश्रयच नव्हे, तर आर्थिक लाभही मिळतो.
अनेक राजकीय पक्ष अशा नाठाळ मुलांबरोबरच नाठाळ शिक्षकांनाही आपल्या षडयंत्रात सामिल करून घेताना दिसतात. स्वतःच्या राजकीय लाभासाठी अपप्रवृत्तीच्या लोकांचा बचाव करतात. परिणाम स्वरूप शिस्तबध्द वागणाऱ्या लोकांवर दबाव टाकला जातो व मनमानीला वाव दिला जातो. त्यामुळेच सामाजिक स्थिती बिघडत चालली आहे. अनेकजण मानतात की, आपल्या शाळांमध्ये शिस्तबध्दतेचा अभाव आहे. त्यासाठीही शिक्षकांनाच जबाबदार ठरवितात. इतर अनेक लोकांचे मानणे आहे की, शिक्षक काम करू इच्छित नसतात. त्यामुळे ते तितवया पगारासाठी पात्र नाहीत जितका त्यांना मिळतो. अशा विचारांनी कमी पगार धोरणाच्या संकल्पनेला एक लोकप्रिय समर्थन मिळण्यात भूमिका पार पाडली, जिचे बहूतांश खाजगी शाळा पालन करतात. एक विचार हा सुध्दा आहे की, शिक्षक सुधारणांच्या दिशेत अडथळे ठरतात.
सरकारी आणि खासगी शाळातील शिक्षकांची तुलना केली जाते. त्यात नेहमी सरकारी शाळांतील शिक्षकांपेक्षा खासगी शाळातील शिक्षकांना प्राधान्य मिळते. म्हणूनच पालकांना खाजगी शाळांना प्राधान्य देण्यासाठी एक सोपे कारण मिळते. शिक्षकांवर असाही आरोप ठेवला जातो की, शिक्षक राजकारणात सहभागी आहेत. काही दशकामध्ये अनेक राज्य सरकारांनी शिक्षक युनियनना संपविण्याचा रस्ता स्विकारला आहे. शाळा शिक्षक, महाविद्यालयीन तसेच विद्यापीठ शिक्षकांवरसुध्दा आहे.
या स्थितीमुळे शिक्षकांविषयी अविश्वास जोराने वाढला आहे. जेव्हा सुरतमध्ये एका खासगी शाळेचे मुख्याध्यापक म्हणाले होते की, ‘मी आपल्या खुर्चीतून न उठताच सांगू शकतो की, कोणत्या वर्गात काय चालले आहे. त्याचे कारण, प्रत्येक वर्गात ‘सी सी टी व्ही' लावलेले होते. त्यामुळे कोणतेही शिक्षक किंवा विद्यार्थी कॅमेऱ्याच्या डोळ्यापासून दूर नव्हता. शिक्षकांना कसे हाताळायचे हे प्रशासनाला चांगले कळले आहे. पण शिक्षण संचालनालयाला अजून कळलेले नाही. ते आताही चाचपडत आहेत की, आता काय करावे?
एकीकडे सरकारी शाळातील शिक्षकांची ही स्थिती आहे. त्यांच्यावर योग्य प्रकारे शिकवत नसल्याचा आरोप केला जातो, त्यासाठी पालकांना कोचिंग वलासेसचा आधार घ्यावा लागतो. सध्या कोचिंग वलासेसने सरकारी आणि प्रायव्हेट स्कूल दोन्हींवर ताबा मिळविला आहे. परंपरागत रूपाने सेकेंडरी स्तराचे शिक्षक बोर्ड परिक्षांमध्ये मुलांची तयारी करण्यासाठी जबाबदार होते, ते आतासुध्दा हेच काम करत आहेत. पण कोचने त्यांच्याकडून हे काम हिसकावून घेतले आहे.
कोचिंगवाल्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना शिक्षक म्हणून बदलले आहे. जो शिकविणे आणि परिक्षाचे स्वरूप यांची व्याख्या करत होता. वलास, टिचरना एकच पर्याय म्हणजे पुष्टीकरण. आज बाजाराने त्यांना जवळ आणले आहे. कोचचा एक मर्यादीत उद्देश असतो आणि मुलांच्या जीवनात मर्यादित भूमिका असते. दुसऱ्या बाजूला एका शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या सर्व मुद्दयाकडे लक्ष देण्याऐवजी चालू मागण्यांनासुध्दा संबोधित करायचे असते.
प्राथमिक शिक्षकांना आपल्या समाजात कोणतेही स्टेटस नाही आणि त्यापूर्वीच्या शिक्षकांना तर नाहीच नाही. प्रायमरी शिक्षक मुलांना समाजाविषयी सांगतात. मुलांची आवड आणि बौध्दिक उर्जेला आकार देण्याबरोबरच संवेदनशील भूमिका पार पाडतात. परंपरा आणि नियम रचना दोन्हीही हा मानदंड कायम ठेवणारे झाले आहेत की, तुम्ही जितवया लहान मुलांना शिकवलं, तुमचे स्टेटस आणि पगार तितकाच कमी असेल.
सध्याच्या सुधारणामध्ये शिक्षकांचा विसर पडत आहे. अनेक वर्षापासून शिक्षकांनीच शिक्षण व्यवस्था सांभाळली आहे. करिअरशी केलेल्या तडजोडीमुळे हे सारे घडत आहे. आजच्या काळात शिक्षकांचा जॉब, ज्युनिअर डॉवटर इतकाच महत्त्वाचा आहे. पण युनिव्हर्सिटी, कॉलेजमध्ये कोणताही इमर्जंन्सी वॉर्ड नाही. पूर्वग्रह असलेल्या लोकधारणेपासून पीडित शिक्षकांना, शिक्षक दिनाला वापरल्या जाणाऱ्या अलंकारिक भाषेची सवय झाली आहे. कोणताही देश शिक्षकांच्या नाराजीपासून वाचू शकत नाही. ही स्थिती चिंताजनक आहे. -भिमराव गांधले