दिवाळीत आनंदाबरोबर सुरक्षितताही जपा ! नॅशनल बर्न्स सेंटरचा नागरिकांना सावधतेचा सल्ला
निसर्गाचे सौंदर्य, सामर्थ्य, सर्वोत्कृष्ट निर्मिती पहा आणि नियमाचे पालन करा
पावसाळ्यात तुम्ही कितीही जपून चला, शिंतोडे उडवणारी वाहने येतात आणि आपल्या अंगावर शिंतोडे उडवून जातात. आयुष्यही असंच असतं. तुम्ही कितीही सुस्पष्ट, प्रामाणिकपणे वागा; शिंतोडे उडवणारे लोक येतात शिंतोडे उडवतात आणि निघून जातात. फक्त त्या शिंतोड्याने आपला प्रवास आपणच थांबवायचा नसतो. निसर्गाच्या नियमाचे पालन करा, नाहीतर यम म्हणजे दुखद मृत्यू, अपघाती मृत्यू हा ठरलेला आहे. म्हणूनच निसर्गाचे सौंदर्य, सामर्थ्य, सर्वोत्कृष्ट निर्मिती पहा आणि नियमाचे पालन विचार करून आनंदाने जगा इतरांना जगवा.
जगात एकमेव महामानव तथागत गौतम बुद्ध होऊन गेले त्यांनी स्वयम प्रकाशित होण्यास सांगितले. मानवाला मानवा सारखे वागण्याची शिकवण दिली. सुख, दुख हे कायम स्वरूपी टिकणारे नाही. ते निसर्ग नियमाने येत व जात राहील. ज्याप्रमाणे पावसाळ्यानंतर हिवाळा. हिवाळ्यानंतर उन्हाळा आणि उन्हाळ्यानंतर पावसाळा हा येत राहणार. त्यांचा क्रम बदलविण्याची ताकद कोणातही नव्हती आणि नाही. त्यासाठी उपास तपास, नवस, यज्ञ, महा पूजा अर्चा पायी पदयात्रा काही करा; काही होणार नाही. पण निसर्गाच्या नियमाचे पालन करा, नाहीतर यम म्हणजे दुखद मृत्यू, अपघाती मृत्यू हा ठरलेला आहे. म्हणूनच निसर्गाचे सौंदर्य, सामर्थ्य, सर्वोत्कृष्ट निर्मिती पहा आणि नियमाचे पालन विचार करून आनंदाने जगा इतरांना जगवा. त्यासाठी या आठ साध्या सोप्या नियमाचे पालन करा. मग तुमच्याएवढा सुखी, समाधानी आणि श्रीमंत कोणी नसेल. १) श्रीमंत होण्यासाठी तुमच्या मुलांना शिकवू नका; तर त्यांना आनंदी राहण्यासाठी शिकवा. ज्यामुळे मोठे झाल्यावर त्यांना वस्तूंचं महत्त्व आणि मूल्य कळेल किंमत नाही. २) तुमचं जेवण तुम्ही तुमचं औषध समजून घ्या. नाहीतर औषधच तुम्हाला जेवण म्हणून घ्यावं लागेल. जगण्यासाठी खा, खाण्यासाठी जगु नका. ३) जी व्यक्ती तुमच्यावर प्रेम करते ती तुम्हाला कधीही सोडून जाणार नाही. कारण तुम्हाला सोडून जाण्याची शंभर जरी कारणं असली तरीही त्या व्यक्तीला एकच कारण असं सापडेल की ज्यामुळे ती व्यक्ती तुम्हाला सोडून जाणार नाही. ४) मानव असणे आणि मानवता असणे या मध्ये खूप फरक आहे.तो समजून घ्यावा. ५) ज्या वेळी तुमचा जन्म होतो त्यावेळी तुमच्यावर प्रेम केलं जाते. आणि ज्यावेळी तुम्ही मृत व्हाल त्या वेळीही तुमच्यावर प्रेम केलं जाईल. ही समजूत मनातून काढून टाका. मृत झाल्यावर आठ तासापेक्षा जास्त तुम्ही कितीही प्रिय असला तरी तुम्हाला घरात ठेवले जाणार नाही. ६) तुम्हाला वेगात चालायच असेल तर एकटे चाला; पण दूरवर चालत जावे लागणार असेल तर सर्वांना सोबत घेऊन एकत्र चाला. ७) जगातील सर्वात चांगले सहा डॉक्टर कायम लक्षात ठेवा. १) सूर्यप्रकाश २) विश्रांती ३) व्यायाम ४) योग्य आहार ५) आत्मविश्वास ६) मित्र. आयुष्याच्या सगळ्या टप्प्यांवर यांना सांभाळा आणि आरोग्यदायी जीवन जगाल. ८) जेव्हा तुम्ही चंद्र पाहता त्यावेळी तुम्ही निसर्गाचे सौंदर्य पाहता, जेव्हा तुम्ही सूर्य पाहता त्या वेळी तुम्ही निसर्गाचं सामर्थ्य पाहता, ज्यावेळी तुम्ही आरसा पाहता त्यावेळी तुम्ही निसर्गाची सर्वोत्कृष्ट निर्मिती पाहता. म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा आणि स्वयंप्रकाशित व्हा.
आपण सगळे जण प्रवासी आहोत आपला अंतिम मुक्काम आधीच ठरलेला आहे. हे जीवन ही एक सहल समजून आनंद घ्या. तुमचे अनेक गुण पाहून अनेक लोक तुमच्यावर प्रेम करतील; पण आयुष्यात त्यालाच स्थान द्या, जे तुमच्यातले दोष पाहूनही तुमची साथ सोडणार नाही. सुंदर काय असतं. कितीही गैरसमज झाले, किंवा कितीही राग आला तरीही, थोड्या अवधीमध्ये मनापासून सर्व माफ करून पुन्हा पूर्ववत होते ते नाते सुंदर असते. पावसाळ्यात तुम्ही कितीही जपून चला, शिंतोडे उडवणारी वाहने येतात आणि आपल्या अंगावर शिंतोडे उडवून जातात. आयुष्यही असंच असतं. तुम्ही कितीही सुस्पष्ट, प्रामाणिकपणे वागा; शिंतोडे उडवणारे लोक येतात शिंतोडे उडवतात आणि निघून जातात. फक्त त्या शिंतोड्याने आपला प्रवास आपणच थांबवायचा नसतो. एकमेकांना धीर देणे हे सुद्धा अत्यावश्यक सेवेतच मोडतं. हे सुद्धा कायम लक्षात ठेवा. मला कोणाची गरज नाही. हे मनातून काढून टाका.
RICH असणं म्हणजे काय ?
RICH शब्दामधला
'R' हा Relationship चा,
' I ' हा Income चा,
'C' हा Character चा आणि
'H' हा Health चा.
नातेसंबंध, पैसा, चारित्र्य आणि आरोग्य हे चारही स्तंभ मजबूत आणि संतुलित असणे. म्हणजे RICH असणं. यातला एक स्तंभ जरी डळमळीत असेल किंवा मजबूत असूनही संतुलित नसेल तरी बाकी सारं असूनही आयुष्य विकलांग आहे. चला...एकमेकाना Wish करूया आणि सगळेच जण RICH होण्याचा प्रयत्न करूया...! जिवन खुप सुंदर आहे फक्त तसं जगायला हवं..!. काळजी घ्या. तुमचे दिवस सुखाचे जावोत. आयुष्य खूप सुंदर आहे. जी गोष्ट तुम्हाला आव्हान देते, तीच गोष्ट तुमच्यात बदल घडवू शकते, भले यशस्वी होण्याची खात्री नसेल, परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच असली पाहिजे. अनुभव हा मोफत मिळत नसतो. त्यासाठी कधी वेळ, कधी किंमत, तर कधी आयुष्य खर्च करावं लागतं आणि संघर्ष करावा लागतो. त्याशिवाय फुकटात काहीच मिळत नाही. अति विचारामुळे आपण आपल्या आयुष्यात काल्पनिक समस्या निर्माण करतो, ज्या अस्तित्वातच नसतात. म्हणून समजूतदारपणा हा ज्ञानापेक्षाही खूप महत्त्वाचा असतो. - सागर रामभाऊ तायडे