‘स्वतंत्र भारताच्या तिरंग्याचे अभिकल्पक' पिंगली वैंकय्या

भारताचा तिरंगा ध्वज पिंगली वेंकय्या यांनी निर्माण केला. त्यांचा जन्म २ ऑगस्ट १८७६ रोजी दक्षिणेतील आंध्र प्रदेशातील भटणापूरम या स्थळी झाला. तेलगू ब्राह्मण पद्मशाली कुळात त्यांचा जन्म झाला. ही त्यांची तेलुगू म्हणून ओळख! मद्रास येथून हायस्कुल पर्यंतचे शिक्षण पूर्ण करून पुढील उच्च शिक्षण त्यांनी केंब्रीज विद्यापिठात जाऊन पूर्ण केले. भारतात परतल्यावर १९१६ ते १९२१ पर्यंत जगातील विविध देशातील राष्ट्र ध्वजाचे अध्ययन करण्यांत त्यांनी स्वतःला झोकून दिले.आपल्या देशाचा भावी राष्ट्र ध्वज कसा असावा, त्याची संकल्पना सुमारे पंचवीस वर्षे आधीच तयार होती!  

भारतीय लोकसंख्येच्या विविध छटा त्या-त्या राज्य क्षेत्रातील भाषेवर आधारित आहेत. अनेकांना दक्षिणेकडील एखादी व्यक्ती दाक्षिणात्य भाषेत बोलत असेल तर ती व्यक्ती चक्क मड्राशी' असेल, नव्हे आहे! असे एकांगी आणि धाडसी विधान करून मोकळे होतात. इतक्यांत अँड्रॉइड काय आले आणि भारतीयच काय, जगांतील बहुतांश लिखित भाषांचे ज्ञान नसेल पण किमान माहिती तरी मिळू शकते, तेव्हां आपल्याला कळू लागले की दक्षिणेकडे लिखित आणि बोलल्या जाणाऱ्या भाषांचे अस्तित्व किती श्रेष्ठ आणि महान आहे ते... यांत दुमत नसावे! तमिळ, तेलुगू, मळ्यालम, कन्नड अशा एकाहुन एक श्रेष्ठ भाषा दक्षिणेकडे लिहिल्या-बोलल्या जातात. ज्याप्रमाणे गुजराती, मराठी, हिंदी, पंजाबी या आणि अशा अनेक राज्य भाषावरून आपण त्या-त्या व्यक्तीची प्रांतावर ओळख करुन घेतो, तशाच दक्षिणेकडे बोलल्या, लिहिल्या जाणाऱ्या भाषांचे अस्तित्व राज्यांत टिकून आहे. भाषा ही त्यांची पहचान होती आणि आजही आहे. येथे भाषावार प्रांतरचने विषयी भाष्य करण्याचे कारण त्या मातीत जन्मलेले महान स्वातंत्र्य सैनिक म्हणून ओळखले जाणारे श्री. पिंगली वेंकय्या हे आहेत.

पिंगली वेंकैय्या हे एक थोर स्वातंत्र्य सैनिक होऊन गेले. शिवाय कृषी वैज्ञानिक म्हणुन त्यांची एक वेगळी ओळख आहेच. त्यांचे नांव आज आठवावे याला एक विशेष कारण आहे! सर्वप्रथम त्यांना त्रिवार नमन करतो आणि पुढे आपण त्यांची ओळख करून घेऊ या! ‘स्वतंत्र भारताच्या तिरंग्याचे अभिकल्पक'  हिच त्यांची खरी ओळख असू शकते. होय ! भारताचा तिरंगा ध्वज पिंगली वेंकय्या यांनी निर्माण केला. त्यांचा जन्म २ ऑगस्ट १८७६ रोजी दक्षिणेतील आंध्र प्रदेशातील भटणापूरम या स्थळी झाला. तेलगू ब्राह्मण पद्मशाली कुळात त्यांचा जन्म झाला. ही त्यांची तेलुगू म्हणून ओळख! मद्रास येथून हायस्कुल पर्यंतचे शिक्षण पूर्ण करून पुढील उच्च शिक्षण त्यांनी केंब्रीज विद्यापिठात जाऊन पूर्ण केले. तेथून स्वदेशी परतल्यावर काही काळ सरकारी नोकरी करून पुढे लाहोर येथील एंग्लो वैदिक महाविद्यालयात जाऊन उर्दू आणि जपानी भाषांचे अध्ययन केले.

 विशेष कृषी विषयावर अभ्यास करतांना महात्मा गांधी यांच्याशी साऊथ आफ्रिका येथे त्यांची भेट झाली. अर्थातच पिंगली वेंकय्या यांच्या एकूणच जीवनीवर महात्मा गांधी यांच्याविचारसरणीचा प्रभाव पडला व ते आंग्ल राजवटीला विरोध करण्यासाठी म्हणून लढा देऊ लागले. त्याशिवाय आपले कृषी विषयींचे शोध कार्यात ते कायम व्यस्त राहिले. त्यांचे विशेष संशोधन विविध प्रकारच्या कापूस या विषयावरच केंद्रित झाले. अंतिम श्वास घेईपर्यंत त्यांनी आपले संशोधन कार्य सुरूच ठेवले.

त्यांच्या एकूण जीवन प्रवासाचे अध्ययन करण्यासारखे आहे. भारतात  परतल्यावर १९१६ ते १९२१ पर्यंत जगातील विविध देशातील राष्ट्र ध्वजाचे अध्ययन करण्यांत त्यांनी स्वतःला झोकून दिले. पुढे आपला देश १९४७ मध्ये स्वतंत्र झाला. आश्चर्य म्हणजे तत्कालीन स्वातंत्र्याच्या त्या लढ्यात स्वतःला झोकून देणाऱ्यांची जीवनी काय असेल? त्यांचा लढा किती प्रामाणिक असेल याची जाणीव आजच्या पिढीला होणे आवश्यक आहे. पिंगली वेंकय्या या व्यक्तीचा आत्मविश्वास किती सशक्त होता, किती दृढ मातृप्रेम असेल की आपल्या मायभूमीवरून आंग्ल राजवटीस हद्दपार करणारच, हे किती चकित करणारे स्वप्नं असेल! जे एक किंवा दोन व्यक्तींचे काम नव्हे. त्या काळी आंग्ल व्यवस्था भारतीयांना आणि त्यातल्या त्यात स्वातंत्र्य सैनिकांना भिवविण्याचा प्रयत्न करत असत. पण लढा देणाऱ्यांना माहित होते जग भित्र्याला भिवविते, आणि भिवविणाऱ्याला भिते! गोऱ्यांचे पलायन हेच एक उद्दिष्ट होते, ब्रीद होते त्यांचे! आपल्या देशाचा भावी राष्ट्र ध्वज कसा असावा? त्याची संकल्पना सुमारे पंचवीस वर्षे आधीच तयार होती! याला म्हणतात दृढ निश्चय! एकसंघ विचार, द्वेषाने नव्हे, तर अहिंसेच्या मार्गावर चालत अधिकाराने आपला लढा सुरु ठेऊन अनेक शूर वीर, विचारवंत, मुत्सद्दी आपापले जात-धर्म असले विचार दूर ठेऊन या लढ्यात सहभागी झाले. भारत स्वतंत्र झाला. जे-जे या लढ्यात सहभागी झाले त्यांच्या कार्यास सलाम करत तिरंगी ध्वजाचा सन्मान केला जातो.

विजयी विश्व तिरंगा प्यारा
झंडा उंचा रहे हमारा
सदा शक्ती बरसाने वाला
प्रेम सुधा सरसाने वाला
विराें को हरसाने वाला
मातृ भूमिका तन मन सारा
झंडा उंचा रहे हमारा

भारत देशाचे प्रतीक म्हणजे आपला प्रिय तिरंगा ध्वज, त्यांस कोटी-कोटी प्रणाम! तसेच स्वातंत्र्य सैनिक पिंगली वेंकय्या यांना मनःपूर्वक प्रणाम. जयहिंद! -इक्बाल शर्फ मुकादम 

 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

रसिकांना हसवता हसवता...!