दिवाळीत आनंदाबरोबर सुरक्षितताही जपा ! नॅशनल बर्न्स सेंटरचा नागरिकांना सावधतेचा सल्ला
श्रावण म्हणजे काय? माहेरच्या आठवणींची साय!
श्रावणाचे कौतुक माणसाला नेहमीच आहे. श्रावण महिना महिलांचा फार लाडका असल्याचे मानले जाते. समाजातलं ५०% प्रतिनिधित्व करणाऱ्या महिला, श्रावणात पूजा अर्चा असे विविध विधी करतात. जे माहेर सोडून सासरी येऊन रुजावं लागलं त्या माहेरची आठवण काढतात. माहेरी भेटी देतात. बालपणीच्या सवंगड्यांना भेटतात. झाडावर झोके लावून खेळतात. मात्र अलिकडे शहरी भागात श्रावणातले खेळ, श्रावणातली गाणी, मंगळागौरी, जागरण या गोष्टी फक्त एक उत्सवाचा भाग आणि दुकानदारांचा मार्केटिंगचा प्रकार म्हणून शिल्लक आहेत.
श्रावणात घननिळा बरसला, रिमझिम रेशीम धारा,
उलगडला पानातून अवचित, हिरवा मोर पिसारा !
असे श्रावणाचं वर्णन केलं जातं. पण मी माझ्या जवळच्या व्यक्तीला म्हटलं, श्रावण सुरू होईल ऑगस्टमध्ये, भेट, त्यावर तिने विचारलं, श्रावण म्हणजे काय? श्रावणाचे एवढं काय महत्त्व असतं?
पूर्वीच्या काळी श्रावणाची वाट महिला खूप आनंदाने बघायच्या. कारण की श्रावणात त्यांना माहेरी जायला मिळायचं. माहेरी जाण्याचा आनंद असला, तरीही माहेरी राहायच्या काळात पतीपासून दूर राहावं लागायचं, पतीचा विरह सोसावा लागायचा. त्यामुळे त्या काळातली बहुतांश गाणी ही श्रावणातल्या पति विरहाबद्दलची आहेत. जसे की ‘सावन की झुले पडे तुम चले आओ' किंवा ‘रिमझिम झरती श्रावणधारा धरतीच्या कलशात प्रियाविण उदास वाटे आज', काही श्रावणात माहेरचा सांगावा येण्याची आहेत.
रक्षाबंधन, श्रावणी सोमवारची शंकर पूजा, श्रावणी शुक्रवार, हळदी कुंकू सर्व सण हे श्रावणात येतात. आषाढाचा तीव्र धबधबाक आवाज करत येणारा पाऊस कमी झालेला असतो. चिकी मी चिक्की मीकी असा घुंगरासारखा मंद आवाज करणारा पाऊस श्रावणात रिमझिम बरसत असतो. हलकासा शिडकावा येतो, परत थांबतो. दिवस रात्री, छत्री, रेनकोटला न जुमानणारा असा हा पाऊस नसतो. त्यामुळे श्रावणाचे कौतुक माणसाला नेहमीच आहे. श्रावण महिना महिलांचा फार लाडका असल्याचे मानले जाते. समाजातलं ५० % प्रतिनिधित्व करणाऱ्या महिला, श्रावणात पूजा अर्चा असे विविध विधी करतात. जे माहेर सोडून सासरी येऊन रुजावं लागलं त्या माहेरची आठवण काढतात. माहेरी भेटी देतात. बालपणीच्या सवंगड्यांना भेटतात. झाडावर झोके लावून खेळतात.
आंब्याचं लाकूड मऊ असतं, त्यामुळे आंब्याच्या झाडाला झोका बांधत नसतात. कडुलिंबाच्या झाडाला झोका बांधतात आणि तो नारळाच्या रस्सीने बांधला जायचा. याच्यावर तरुणी, लहान मुलं, सर्वजण खूप योग्य झोके घ्यायची. ‘आया सावन झुमके, ‘सावन मे आग लगाये, (चले आओ.) ११ महिने न मिळालेला माहेरचा आनंद ह्या एक महिन्याच्या श्रावणातील माहेरवास मिळवून घ्यायचा असायचा. त्यामुळे महिला त्या एक महिना खूप मजा करायच्या. हातावर मेंदी लावायच्या पायावर आलता लावायचे आणि साज शृंगार करायच्या. फुलं पान सजावट, चांगले चांगले खाद्यपदार्थ खाणे, दाग दागिने यांनी सजून, चांगले कपडे घालून देवदर्शनाला जायचे. मित्र-मैत्रिणींना भेटायचं एक हे श्रावणाचे महत्व हल्लीच्या तरुण-तरुणींना समजतं का?
सहसा श्रावणात सामेश जेवण जेवत नाहीत. साधं साधं भारतीय पद्धतीचा आणि वेजीटेरियन जेवण घेतलं जातं. श्रावणानिमित्त खास बनवलेले हॉटेलमधील उपवासाचे मेनू, हॉटेलमध्ये तीज, पूजा, सण साजरी करतात. हॉटेलमध्ये, बाहेर गेट-टुगेदर करा असे करतात. या जाहिरात, यांच्यावर ह्या श्रावणाचा येणे समजतं. नोकरदार महिलांना श्रावणाची जाणीव म्हणजे त्या त्या ठराविक रंगाचे कपडे घालून, सजून ऑफिसला जाणे एवढच आहे. बाकी श्रावण पूर्ण दुर्लाक्षितच झाला आहे.
श्रावणातले खेळ, श्रावणातली गाणी, मंगळागौरी, जागरण या गोष्टी फक्त एक उत्सवाचा भाग आणि दुकानदारांचा मार्केटिंगचा प्रकार म्हणून शिल्लक आहेत. घरोघरी एखादंच मूल आहे आणि रक्षाबंधनाला मग चुलत मावस, अशा कुठल्यातरी भावाच्या घरी जाऊन राखी बांधली जाते. त्यात पार्टीचाच भाव असतो. आनंद व्यक्त होतो, मजा येते. श्रावणाचं धार्मिक महत्त्व मात्र अधोरेखित होत नाही.
सेलिब्रेशन श्रावण, सेलिब्रेटिंग श्रावण बॉक्स, श्रावण क्वीन असे वेगळे वेगळे कार्यक्रम श्रावणात होतात. पण तो फक्त उत्सव राहतो. आम्ही संपूर्ण श्रावण महिनाभर, विविध पूजा, सोमवारचा उपवास, श्रावणी सोमवारची शंकराची भक्ती करायचो. त्या पूजा आठवा. लहानपणी आमच्या शाळादेखील लवकर सोडायचे, कारण की श्रावण सोमवारी तो उपास सगळी जनता करायची. संध्याकाळी तो उपवास सोडला जायचा, म्हणजे भरपेट चांगलं चांगलं गोडधोड खायला, दिले जायचं. श्रावणाचा महिना हा शंकराच्या पूजेचाच महिना आहे. या महिन्यात दोनो चव करतात. या झोपाळ्यावर झूलण्याचे तत्व असा आहे की, गौरीने, म्हणजे शंकराची पत्नी पार्वती हिने झोपाळ्यावर मूर्ती विराजमान करून पूजा केली होती.
आजच्या तरुण तरुणी आणि नवीन पिढीला श्रावण म्हणजे काय हेच माहीत नसतं. श्रावणातले सण माहिती नसतात. अर्ध्या घरची मुले परदेशी जाऊन, धडगुजरी आणि अ-देशी होऊन गेली आहेत. परदेशात उगीचच आपली संस्कृती टिकवायचे, टिकवायचं असे करतात आणि जीन्स पॅन्टवर, कसातरी श्रावण साजरा करतात. फार पूर्वीची शाळेतील कविता आठवा.
देवदर्शना निघती ललना हर्ष मावेना गगनात, वदनी त्यांच्या वाचून घ्यावे श्रावण महिन्याचे गीत.
श्रावण म्हणजे काय? तर माहेरच्या आठवणींची साय!