दिवाळीत आनंदाबरोबर सुरक्षितताही जपा ! नॅशनल बर्न्स सेंटरचा नागरिकांना सावधतेचा सल्ला
मुशाफिरी
नवी मुंबईची ओळख तीन प्रकारची आहे. एक.. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्र. दोन.. सिडकोची नवी मुंबई व तीन..नवी मुंबई पोलीस आयुवतालय हद्दीत येणारी नवी मुंबई. ही तिसरी ओळख खूप मोठी असून यात ठाणे तालुक्याच्या दक्षिणेकडील टोकाप्रमाणेच पनवेल व उरण तालुक्यांचाही समावेश होतो. नवी मुंबई महानगर पालिका स्थापन होण्याआधी या परिसराला ठाणे बेलापूर पट्टी म्हणायचे. आशिया खंडातील सर्वाधिक मोठी कारखानदारी इथे होती. सामाजिकदृष्ट्या एकेकाळी शांतताप्रिय असलेल्या येथील लोकजीवनाला आता अक्षता म्हात्रे व यशश्री शिंदे यांच्या हत्यांमुळे ग्रहण लागले असून नकारात्मक ओळख सर्वदूर गेली आहे.
एकेकाळच्या ठाणे-बेलापूर पट्ट्यातील केमिकल कंपन्यांच्या प्रदूषणाने स्थानिक हैराण असत. नोसिल कंपनीची धूर ओकणारी अवाढव्य चिमणी कळवा-ठाणे येथून लोकलमधून जाताना आगीच्या ज्वाळांमुळे पाहता येत असे. तसा सामाजिकदृष्ट्या हा परिसर शांतच असे तेंव्हा. अगदी १९९२ साली बाबरी पतनानंतर देशभर दंगली पेटल्या; पण नवी मुंबई मात्र निवांत होती. नवी मुंबई महानगरपालिका अस्तित्वात आली, पहिले सभागृह १९९५ साली सुरु झाले आणि मग येथील राजकीय उलाढालींना जोर आला आणि माहौल बदलण्यास प्रारंभ झाला. ग्रामपंचायत ते महानगर पालिका ही ओळख रुढ झाली. मग "सेस" कराचा पहिलाच यशस्वी प्रयोग करणारी महापालिका म्हणून परिचय झाला. नवी मुंबई परिवहन समिती स्थापन केल्यावर वर्ष पूर्ण व्हायच्या आधीच स्वतःच्या मालकीची परिवहन सेवा पुरवणारी महापालिका तीही हीच. खालापूर तालुक्यातील धायरी नदीवरील मोरबे धरण हे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून महापालिकेसाठी घेणारी महापालिका नवी मुंबईचीच! आशिया खंडातील सर्वात मोठी पाच मार्केट्स तुर्भे भागात आहेत. नवी मुंबई महानगरीला सायबर सिटी, इन्फोटेक सिटी तसेच एज्युकेशनल हब या नावांनीही ओळखले जात असते. अलिकडे गेली काही वर्षे सातत्याने स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत देशभरात पहिल्या पाच शहरांमध्ये येणारी महापालिकाही नवी मुंबई हीच होय. अशा या सकारात्मक ओळखीला धक्के बसायला सुरुवात २००६ सालच्या धूलिवंदनानिमित्त झालेल्या स्थानिक आगरी-कोळी विरुध्द माथाडी समूहांमध्ये पेटलेल्या दंगलीमुळे झाली. त्यानंतर तीन दिवस नवी मुंबई धगधगत होती.
यंदा जुलै महिन्याच्या तीन आठवड्यात झालेल्या दोन मुलींच्या हत्याकांडांनंतर सर्वांच्या नजरेत नवी मुंबई एका वेगळ्या अर्थाने भरली. आगरी विरुध्द आगरी, आगरी व अन्य जाती जमाती विरुध्द ब्राह्मण पूजारी आणि मागासवर्गीय समाजातील शिंदे आडनावधारक यशश्री हिच्याबद्दल सहानुभुती बाळगणारा संवेदनशील वर्ग विरुध्द मुस्लिम समाजात जन्मून बिगर मुस्लिम लोकांना काफिर समजणारे, बिगरमुस्लिम मुलींना प्रेमजाळ्यात अडकवणारे व त्यानंतर त्यांची अमानवी पध्दतीने हत्या करणारे असे तट समाजामध्ये उघडउघड पडलेले दिसून येत आहेत. उरण असो, पनवेल असो की कोकणातील अन्य कोणताही तालुका. येथे गेल्या अनेक वर्षांपासून मुस्लिम समाज वास्तव्य करीत आहे. जाणकार सांगतात की हे मुसलमान म्हणजे काही अफगाणिस्तान, पाकिस्तान, इराक, इराण येथून आलेले टोळीवाले, अत्याचारी, क्रूर, हिंसक, धार्मिक मूलतत्ववादी अतिरेकी लोक नव्हेत. हे तर इथलेच मूळचे हिंदू. पण यवनी आक्रमण काळात त्यांना तलवारीच्या जोरावर बाटवले गेले आणि मग पाटीलचे पटेल झाले. काहींची तर आडनावेही हिंदू जसे तांबोळी, देशमुख असल्याचेही दिसून येते. अपवाद दाऊद इब्राहिम कासकर. हा मुंबई पोलीसात कामाला असणाऱ्या मूळचा रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथील इब्राहिम कासकरचा वाया गेलेला कार्टा. तो मात्र या देशाशी गद्दारी करुन शत्रुराष्ट्रात लपून बसला व भारतविरोधी कारवाया करण्यात अजूनही पुढे आहे.
आगरी कोळी समाजात अजिबातच अस्तित्वात नसलेल्या हुंडाबळी प्रकाराची नोंद अक्षता म्हात्रे हत्याकांड प्रकरणाने नवी मुंबईतून पहिल्यांदा झाली की काय अशी चर्चा सुरु झाली आहे. या हत्येनंतर सारा समाज एकवटला व तीव्र स्वरुपाचा आक्रोश विविध जनआंदोलनांतून, निदर्शनांतून दिसला. प्रसारमाध्यमे, समाजमाध्यमे यांनी त्याची तपशीलवार दखल घेतली, आगरी-कोळी समाजातील वकीलांच्या संघटनाही या निमित्त एकत्र आल्याच; पण राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी हे प्रकरण निष्णात सरकारी वकील ॲड उज्ज्वल निकम यांच्याकडे सोपवण्याचेही निर्देश दिले. खरे तर आगरी-कोळी हे समाज कष्टकरी, काटक, लढवय्ये, आक्रमक मानले जातात. अक्षताला चहातून भांग पाजली गेली नसती, तर तिने त्या पूजाऱ्यांना नवकीच तुडवले असते. यातील सत्य आता एक एक करुन बाहेर येईल. पण अक्षता म्हात्रे हत्याकांड प्रकरणी अन्य समाजांतील बुध्दीजिवी वर्ग, स्त्रीवादी संघटना, सामाजिक नेते, प्रभावशाली व्यवितमत्वे मात्र अपेक्षेप्रमाणे व्यक्त झाली नाहीत. अत्याचार करुन अक्षताची हत्या करणारे नराधम पूजारी ब्राह्मण होते म्हणून विशिष्ट वर्ग मूग गिळून या घटनेवर गप्प बसला असे जे समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणावर व्यक्त झाले ते अगदीच असत्य मानता येत नाही. उठसुठ स्त्री स्वातंत्र्य, स्त्री मुक्ती, महिलांची दुःखं, महिला सक्षमीकरण, महिला सबलीकरण, निर्भय नारी, बेटी बचाव बेटी पढाव, स्त्रीयांना मोकळे आकाश उपलब्ध करुन द्या वगैरे वगैरे म्हणत रील्स बनवून समाज माध्यमांवर मिरवणाऱ्या अनेक तथाकथित आधुनिक महिलाही या प्रकरणी मुवया बाहुल्या बनून राहिल्या, हेही कठोर वास्तव उरतेच!
हे झाल्याला काही दिवस उलटत नाहीत तोच उरणच्या यशश्री शिंदे हिची क्रूर, नृशंस हत्या दाऊद रमजान शेख या ड्रायव्हरने केल्याचे प्रकरण उघडकीस आले आणि पुन्हा नवी मुंबई पोलीस आयुवतालय क्षेत्र सर्वांच्या चर्चेच्या केंद्रस्थानी आले. त्रास देण्याच्या तक्रारीवरुन हा दाऊद रमजान शेख तुरुंगात सजा भोगत होता व जामिनावर सुटला होता, त्याच्याशी यशश्री पुन्हा मोबाईलवर दीर्घकाळ संपर्कात राहू कशी शकते, (तिच्या शरीरावर त्याच्या नावाचे टॅटू ?) त्याच्या बोलावण्यावरुन ती २०२४ मध्ये उरण रेल्वे स्थानक भागात एकटी जातेच कशी अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मिळायची आहेत. दाऊद रमजान शेख याने यशश्रीची हत्या करताना जातीवाचक शिविगाळ केल्याने त्याच्यावर आता ॲट्रॉसिटीचाही गुन्हा दाखल झाला आहे म्हणे! या सगळ्यात यशश्रीचे पालक बऱ्याच गोष्टी माहित असूनही तिला रोखत का नव्हते, शेजारीपाजारी या साऱ्याची चर्चा नव्हती का, उरणच्या ज्या इंदिरानगर भागात दाऊद रमजान शेख काही वर्षांपूर्वी काही काळ राहात होता तेथील बाकीच्यांचा काही दोष नसतानाही ती वस्तीच जाळून टाकायची भाषा काहीजण का बरे करतात? यातून उरणच्या धार्मिक सलोख्याचे वातावरण बिघडवायचे आहे काय, बिगर मुस्लिम मुली या अशा काही छपरी, फालतू, गैरवर्तनी मुसलमान मुलांच्या जाळ्यात फसतातच का? देशातील विविध पोलीस ठाण्यांमधील बहुतांश आरोपी, गुन्हेगार हे मुसलमानच कसे? तोंडावर फडकी बांधून भारतीय सैनिकांवर काश्मिरमध्ये दगडफेक करणारे कोण होते? काश्मिरमधील पंडितांना त्यांच्या पिढीजात राहत्या घरातून पळवून लावणारे, त्याच्या महिला-मुलींच्या अब्रूशी खेळणारे, त्यांच्या जमिनी बळकावणारे देशद्रोही कोण? कुर्ल्याच्या रझा अकादमीने काढलेल्या मोर्च्याच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जवळील अमर जवान स्मारकावर लाथा मारणारे हरामखोर कोण? असे अनेक प्रश्न एकमेकांत गुंतलेले आहेत.
यशश्री शिंदे हे लव्ह जिहाद चे पहिले किंवा एकमेव प्रकरण नव्हे! हा मजकूर वाचेपर्यत आणखी काही मुली देशभरात कुठे ना कुठेतरी अशा घटना घडल्या असतील. मात्र यात सुवयाबरोबर ओलेही जळता कामा नये. या देशासाठी सय्यद कादरी, पीर अलि खान, मौलवी अहमदउल्ला शाह, प्रोफेसर अब्दुल बारी, मगफूर अहमद अजाझी, असफ अली, अब्बास अली, खान अब्दुल गफार खान, अब्दुल हमीद, आबादी बानो बेगम, बेगम अनिस किडवई, कुलसुम सयानी, बेगम हजरत महल यांच्यासारखे अनेक स्वातंत्र्यसैनिक तसेच डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम, डॉ. झाकीर हुसेन, पद्मश्री डॉ जहीर काजी, नौशाद, बिस्मिल्ला खान या आणि यांच्यासारख्या अनेकांचे योगदान मोठे आहे. दुधात विरघळणाऱ्या साखरेप्रमाणे हे लोक भारतीय लोकजीवनात सामावून गेले. त्यांच्या धर्मातील काही मुर्ख लोकांच्या देशद्रोही वर्तनाची शिक्षा सरसकट सर्वांना देणे अगदीच गैर. महात्मा गांधी यांना एका ब्राह्मणाने खून करुन मारले तर सरसकट ब्राह्मणांची घरे जाळली गेली, इंदिराजी गांधी यांची हत्या शीख सुरक्षा रक्षकांनी केली म्हणून शीखांचे हत्याकांड घडवून आणण्यात आले हे प्रकार अत्यंत दुर्दैवी आहेत. हिंदू, बौध्द, शीख व्यवतीला चाकूने भोसकले, गोळ्या घातल्या तर वेदना होतात किंवा जीव जातो..आणि तेच मुस्लिम, शीख, ख्रिस्तीधर्मीय व्यवतीसोबत केले तर त्यांना काहीच होत नाही असा समज कुणीच करुन घेऊ नये. कोणत्याही दृष्टीकोनातून पाहा..देश, देशातील सर्व नागरिक-महिला-मुलींची सुरक्षिततेबद्दल आस्था, वृ्ध्द-ज्येष्ठांप्रति आदर, देशाच्या सैनिकांसाठी संवेदनशीलता, तिरंग्याप्रति जाज्वल्य अभिमान हा साऱ्या या भारतात राहणाऱ्या प्रत्येकाला वाटलाच पाहिजे. भारतातील शांतीप्रिय जैन, पारशी समुदाय यांच्यामधील बहुसंख्यांकांचा मला या बद्दल प्रचंड अभिमान वाटतो.
अक्षता म्हात्रे, यशश्री शिंदे यांच्या हत्यांना जबाबदार गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी, मग ते कोणत्याही जाती-धर्माचे का असेनात आणि हुंडा बळी, लव्ह जिहाद अथवा अन्य कोणत्याही कारणांसाठी कुणाच्याही जीवाशी खेळू पाहणाऱ्या व्यक्तीला या देशाच्या कायदा-सुव्यस्थेने व ती राखण्याची जबाबदारी असणाऱ्या यंत्रणांनी कधीही मोकळे सोडू नये हीच आता काळाची गरज आहे. मात्र या साऱ्यात नवी मुंबईची एक नकारात्मक, नकोशी वाटणारी ओळख सर्वदूर गेली याचेही दुःख आहे.
- राजेंद्र गोपीनाथ घरत, उपसंपादक, दै. आपलं नवे शहर