दिवाळीत आनंदाबरोबर सुरक्षितताही जपा ! नॅशनल बर्न्स सेंटरचा नागरिकांना सावधतेचा सल्ला
शहरी पावसाळा
आज पाऊस बेहिसाब बरसत आहे. प्लॅस्टिक म्हणजे आज चेष्टा झाली आहे. बंदी असून सर्वत्र सहज उपलब्ध आहे! विविध कंपनीचे लोक मागणी तसा पुरवठा कायम करत आहेत. मग प्लॅस्टिकवर बंदी येणार कशी? हे मी नव्हे, इथले नागरिक सांगत आहेत. चिंतेचा विषय आहे, पण लोक चेष्टेने घेतात. वाईट वाटतं. निकलो ना बेनकाब...जमाना खराब है! असेच काहीसे आजच्या शहरी पावसाळ्यात अनुभवायला मिळतंय.
रात्र थोडी सोंगं फार...अशी ग्रामीण म्हण आहे. गावी पावसाळ्यात लोक पूर्ण तयारीनिशी जगत असतात. तरणा, म्हातारा... अशी एकापाठोपाठ एक नक्षत्रे येत-जात असतात. अमावस्या-पौर्णिमेला सहसा घरातून कुणी बाहेर पडत नाही. कारण या दिवशी पाऊस कोसळणार, हे निश्चित! त्यामुळे ग्रामीण कोष्टक तेथील रहिवासी कायम पाळतात. अशा दिवशी पाऊस नेहमीच जास्त पडतो, हा आजवरचा अनुभव सांगतो. दर्या भरती, नदीच्या पण्याची एकूण वाढती पातळी, यावर स्थानिक लोकं कायम लक्ष केंद्रित करतात आणि निर्णय घेत असतात. अशावेळी खरंच कुठे जायचे असेल तर स्थानिक धोका पत्करतो. अन्यथा दमाने घेतो, घरीच राहतो.
पण, शहरांतील जनजीवन फार वेगळे आणि आव्हानात्मक आहे, फास्ट आहे. खुद्द मुंबई येथे जेव्हां मी हायस्कूल, कॉलेज कालावधी दरम्यान राहिलो त्यावेळी आजच्या एव्हढी तेथील जनसंख्या नव्हती. पाऊस तोच असायचा; मात्र प्लॅस्टिकचा वापर तेव्हढा नसायचा. गटारे सफाई कामगारांकडून वेळोवेळी स्वछ केली जायची, पाण्याचा निचरा लवकर व्हायचा. मोबाईल नसल्याने टेलिव्हिजनवर लोक अपडेट्स घेत असत. त्यावेळी राजकीयदृष्ट्या लोक समंजस होते. समाजकारण हा केंद्रबिंदू असायचा. विधिमंडळ हीच खरी राजकीय खलबते खेळण्याची जागा असायची. सर्व पक्षातील लोक विधिमंडळात हमरीतुमरीवर बोलायचे. नंतर बाहेर आले की सारे मैत्री जपायचे. गोविंदा पथक, गणेश मंडळे यांमध्ये चुरस असायची, हिरस केव्हाच दिसली नाही. पाऊस हा त्यातलाच एक भाग. पाऊस असो वा नसो, त्यावेळी सर्व सण व्यवस्थित साजरे व्हायचे. आनंदमय वातावरण असायचे.
आज पाऊस बेहिसाब बरसत आहे. प्लॅस्टिक म्हणजे आज चेष्टा झाली आहे. बंदी असून सर्वत्र सहज उपलब्ध आहे! विविध कंपनीचे लोक मागणी तसा पुरवठा कायम करत आहेत. मग प्लॅस्टिकवर बंदी येणार कशी? हे मी नव्हे, इथले नागरिक सांगत आहेत. चिंतेचा विषय आहे, पण लोक चेष्टेने घेतात. वाईट वाटतं.
निकलो ना बेनकाब...जमाना खराब है! असेच काहिसे आजच्या शहरी पावसाळ्यात अनुभवायला मिळतंय. चौदा मजली टॉवरवरून थेट खाली पाहताच रस्ता कमी आणि ढग सर्वत्र विखुरलेले दिसतात. जोवर ते पाण्याचे ओझे रिकामे करत नाही, तोवर पाऊस पडायचा थांबत नाही. असे दृश्य कायम दिसते. वाशी येथील भाजी मंडईमध्ये गेल्या शनिवारी उभा होतो, बाहेर सरीवर सरी कोसळत होत्या. इतक्यात मोबाईलवर कुणाचा तरी फोन वाजला. हातात फळं, भाजीपाल्याची पिशवी आणि दुसऱ्या मुठीत फाटकी छत्री! फोन घेणे शक्यच नव्हते. शहरी पावसाळा अनुभवायला जिगर लागते. शिवाय तो भोगावाच लागतो, त्याला पर्याय नाही. राहत्या बिल्डिंगखाली नात आणि मी दोघेही उभे होतो, स्कुल बसची वाट पहात होतो. इतक्यांत एक सायकलस्वार समोर येऊन उभा राहिला व जोरजोराने भंगारवाला असे बेंबीच्या देठापासून ओरडू लागला. इतक्यात स्कुल बस येऊन उभी राहिली. इतर विद्यार्थ्यांसमवेत नात शाळेत निघून गेली. त्या भंगारवाल्याकडे पाहून मी बोलू लागलो...बुढ्ढे लोगोको लेकर जाता है क्या? तो आतल्या आत हसत होता. घडी मे तोला घडी मे मासा, अशीच काहीशी गत झाली आहे या शहरी पावसाची! अमावस्या-पौर्णिमा या अंधश्रद्धा समजल्या जात असाव्यात. नक्षत्र तरणा आहे वाहन बेडुक आहे...असे म्हणताच चेष्टेने हसतात, बरेचसे शहरवासी. लगेच प्रश्न विचारतात, तुम्ही कोकणातले का?
असो, नवी मुंबईमधील सर्वांत जलद गतीने ज्या विभामगाचा विकास घडला असेल तो म्हणजे खारघर हा नोड होय. तरीही यंदाचा उन्हाळा चार मास सर्वत्र आग ओकत होता. ५० सेल्सिअसपर्यँत पारा गेला म्हणूनच ज्या धरणांतून नवी मुंबईतील लोकांना पाणी पुरवठा केला जातो, तेथील जलाशय शुष्क पडू लागले. अतिउष्म्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन होऊन जाते व जलाशयातले पाणी वाहून नेणाऱ्या जलवाहिन्या देखील शुष्क झाल्या. अलिकडे नव्याने उभारी घेणारे शहर म्हणजे तळोजा नोड होय. फेज-१ आणि फेज-२ अशा दोन विभागात विखुरलेल्या या शहरांत मात्र प्रशासनाने विकासाच्या मार्गाचा उपभोग जनतेला कमी होत आहे याकडे कमालीचे दुर्लक्ष होत आहे. चौदा मजली टॉवर एका रांगेत सर्वत्र उभे राहिलेत खरे; मग त्यांस लागणारा वीज पुरवठा योग्य असावा, पाणी पुरवठा अनिश्चित कसा? अजून पेट्रोल पंप सुविधा नाही. अन्नधान्य पुरविणारा एखादा शॉपिंग मॉल किंवा -श्ीीू असावे. भाजी, मंडई तसेच मासळीचा बाजार व्यवस्थित केला जाईल याकडे लक्ष द्यावे. ऑटो रिक्षा सहज उपलब्ध होत नाही. बस सेवा अधूनमधून जाता येता दिसते.
इकडे पावसाचं पाणी मात्र साचत नाही. गटार सिस्टीम व्यवस्थित केली गेलेली असावी. सफाई दूत आपल्या वेळेत येऊन सेवा देतांना दिसतात. कचरा गाडी वेळेत येऊन सर्व सोसायटीमधला कचरा घेऊन जातात. त्यांचा मनापासून मी ऋणी आहे. रस्ते छान आहेत. मात्र मध्येच गॅस लाईनचे खोदकाम सुरू होताच पुन्हा स्वप्नभंग होतो. अनेक सुविधांनी वंचित असा हा भाग बहुतांशी नजिकच्या खारघर शहरावर जास्त अवलंबून राहतो. प्रशासनाने याकडे जास्त लक्ष द्यावे. अजूनही फेज-२ मध्ये इमारतीचे बांधकाम अविरत सुरू आहे. त्यामुळे कामगार वर्ग जास्त आहे. म्हणूनच सुलभ शौचालयांची सोय असणे गरजेचे आहे.
नवी मुंबईचा पाऊस म्हणजे केव्हाही वाशीपर्यँत रेल्वे, बस किंवा ऑटोने जाता येईल असा आहे. आता तळोजा ते बेलापूर असा मेट्रो प्रवास सुरु झाला आहे. तरुणांई तसेच ऑफिसमध्ये जाणाऱ्यांची छान सोय झाली. पोलिसांची हायवे लगतच्या सबवेवर कायम गस्त असते. कायदा/सुव्यवस्था उत्तम आहे. इथले लोक संमिश्र आहेत. त्यामुळं खूप गंमत वाटते. भारत एक देश, एक समाज तसेच तळोजा एक समाज म्हणून सर्व जगतात. मात्र डी-मार्ट सारखी सुविधा असेल, शासकीय हॉस्पिटल असेल, भाजी मंडईची सुविधा असेल तर ऑटो सुविधा आपसूकच शक्य होईल.
पण अनेक पावसाळे गेले.. अमुक येणार, तमुकची सुविधा केली जाणार... असं फक्त ऐकिवात येते. प्रत्यक्ष होताना काही दिसत नाही. सुलभ शौैचालय ही काळाची गरज आहे. त्याकडे तातडीने लक्ष दिले गेले पाहिजे. लोक तसेही जगतात, काय करणार? त्यांचे ही काय चुकतंय म्हणा? सुबह होती है शाम होती है, जिंदगी युंही तमाम होती है... अशा धुनमध्ये सारे जगताना दिसतात. प्रशासन आणि रहिवासी यांच्यात कायम सुसंवाद असावा, हिच सदिच्छा. -इक्बाल शर्फ मुकादम