पाळा शिस्त, राहा मस्त! भोंदू बाबा करतील फस्त

दिनांक १३-१४ जुलैला कॉंग्रेस नेते राहूल गांधी हे पंढरपूरच्या वारी सोहळ्यात हजेरी लावणार असल्याची वार्ता येताच, त्यांच्या सहभागाला विरोध सुरु झाला आहे. पालखी (वारी) सोहळ्यात राहूल गांधीच्या विरोधाला पुष्टी करताना सांगितले जाते की, राहूल गांधी हे हिंदू नाहीत, त्यामुळे त्यांनी वारीत सहभागी होऊ नये, तर राहूल गांधीचे समर्थक म्हणतात, ‘पंढरीचा विठोबा' हा कोणत्याही जाती धर्माचा नाही. त्याला फक्तभक्तीचा लळा आहे. तसे पाहता वारीत बहुतांश सर्वच जाती, धर्माचे, प्रांताचे लोक सहभागी होतात. त्यांच्यात आपापसात दुजाभाव कधीच पहायला मिळत नाही. मग हा विरोध कशाला?

गेल्या काही दिवसापासून संसदेत ‘हिन्दु' या शब्दावरुन वादविवाद सुरु आहेत. देश स्वतंत्र झाल्यापासून या देशात सर्वच जातीधर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहत आले आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळातही या देशात विविध धर्मीय, प्रांतीय लोक शांततेत जगत होते, मात्र २०१४ नंतरचा कालखंड जाती-जातीत, धर्मा-धर्मात भेदभाव निर्माण करणारा ठरु लागला आहे. या देशावर अनेक मुसलमान राजांनी राज्य केले, इंग्रजांनी, फ्रेंचानी राज्य केले, परंतु त्या काळात हिंदू धर्म कधीच संकटात नव्हता. मात्र, आता २०१४ नंतर भाजपाचे सरकार हे जवळपास हिंदूचेच सरकार कार्यरत असूनही सर्वत्र बोलबाला केला जातोय की, ‘हिंदू धर्म संकटात आहे' म्हणून जातीजातीत तेढ निर्माण केली जातये, हे देशासाठी घातक आहे.

राहूल गांधीनी भर संसदेत असली-नकली हिंदूची भाषा केली व तेथूनच वादाला वाचा फुटली. या देशाला विविध संप्रदायाची परंपरा आहे. आणि ते ते संप्रदाय आपली वैशिष्ट्ये टिकवून आहेत. ते आपल्या संप्रदायाच्या परंपरेचे पालन करताना कधीही दुसऱ्या संप्रदायावर टिका-टिप्पणी करीत नाहीत. स्वतः एवढाच मान इतर संप्रदायांनाही देतात. त्यापैकीच एक आहे ‘वारकरी' संप्रदाय अनेकजण या संप्रदायास भवितपंथ, माळकरी पंथ असेही म्हणतात. ‘वारी' ही खास वारकरी संप्रदायाची संकल्पना आहे. देशात हा शब्द व ही संकल्पना फवत वारकरी संप्रदायातच आढळते. देशातील अन्य संप्रदायामध्ये ‘यात्रा' असा धार्मिक शब्द आढळतो, पण ‘यात्रा' व ‘वारी' या शब्दात संकल्पनात्मक जमीन अस्मानाचा फरक आहे. पंढरपूरची ‘यात्रा' नाही तर ‘वारी' आहे. पंढरपूरच्या विठ्ठलाचे भक्त एखाद्या फडाशी संलग्न होऊन त्या फडाच्या प्रमुखाकडून संकल्पनायुवत तुळशीची माळा गळ्यात घालतात आणि ठराविक काळाने, दरवर्षी नियमितपणे विठ्ठलाच्या दर्शनाला जातात. श्री विठ्ठलाच्या दर्शनास असे वारंवार जाणे म्हणजे ‘वारी'. पुन्हा-पुन्हा पंढरीला जाणे म्हणजे ‘पंढरीची वारी'.

असंख्य भाविक बालाजी दर्शनास तिरुपतीला जातात, अनेकजण काशीला, तसेच चारधाम दर्शनाला जातात. त्याला वारी म्हणत नाहीत. तर ‘तीर्थयात्रा' म्हटले जाते. या यात्रा भाविक स्वेच्छेने, स्वतःच्या सोयीने केव्हाही आणि कधीही करतात आणि ठराविक काळाने वारंवार करीत नाहीत. पंढरीची वारी ही एकदाच करण्याची नसून सातत्याने, वारंवार, जन्मभर व पिढ्यान्‌पिढ्या करण्याची साधना आहे. ही साधना महाराष्ट्रासह अनेक राज्यातील हजारो घराणी करत आहेत आणि पंढरपूरला नियमित विठ्ठल दर्शनास जाणाऱ्यांना यात्रिक नव्हे, तर ‘वारकरी' म्हटले जाते. याचा इतिहासही मनोरंजक आहे. वारकऱ्यांच्या दिंडीला, वारीला प्रारंभ झाला तो द्वारकेहून. कृष्णदेव हे दिंडीरवनात आहेत म्हणून रुविमणी दिंडीरवनात द्वारकेहून निघाली. तिच्या मागोमाग गोकुळ मधून गोपवृंद आले. राधा आली. पंढरपूरला विठ्ठलरुपात कृष्ण आहे. दिंडीश, दिंडीरवन आणि दिंडी ही तिन्ही नावे वारकरी संप्रदायात, विठ्ठलभक्त वर्गात प्रसिध्द आहेत. विठ्ठलाला पांडूरंग नावानेही ओळखले जाते. पांडुरंगाला कन्नड भाषेत ‘पंडरगे' ही म्हणतात. या वारीत विविध ठिकाणाहून पालख्या सहभागी होतात व ठिकठिकाणी पालखी सोहळेही होतात.

महाराष्ट्रात या वारकरी संप्रदायाला मानाचे स्थान आहे. वारकऱ्यांना भोजन देण्यासाठी ठिकठिकाणी, त्या त्या गावचे गावकरी अथवा काही वैयवितकरित्या अन्नदान केंद्रे उघडतात, वारीमध्ये सामील कोणीही वारकरी कधीच उपाशी वा तहानलेला राहत नाही, ही  सर्व विठ्ठलाची कृपा मानली जाते. विठ्ठलाचे भक्त हे काही एका जाती-कुळीचे नाहीत, सर्व धर्म समभाव व सहभाग अशी ही वारी असते. या वारीची परंपरा जवळपास १३०० ते १४०० वर्षापूर्वी सुरु झाल्याचे सांगण्यात येते. पण खरी सुरुवात १७३४ साली झाल्याचा उल्लेख आढळतो. दिंडीतून गावोगावचे लोक सहभाग घेतात. ‘विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल' चा जयघोष करत वारकरी मंडळी पायी चालत, सावळ्या विठ्ठलाच्या दर्शनाला जातात. गत काही वर्षापासून विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणाऱ्यांची संख्या ८ ते १० लाखांवर पोहचली आहे. एवढा मोठा समुदाय असूनही वारीत कधीच अफरा-तफरी, चेंगरा-चेंगरी होत नाही. हेवा-दावा होत नाही. वारीतील सर्वजण एक दुसऱ्याचा मान राखून वागतांना दिसतात.

वारीत अनेक संताचा समावेश असतो. ही संत मंडळी आपल्या किर्तनातून लोकांना फवत वि्ीलभवतीचा महिमा सांगतात, त्याचा आपल्या वागण्या-बोलण्यावर कसा चांगला परिणाम होतो याचीही माहिती देतात. पण, स्वतःचा उदो-उदो कधीच करीत नाहीत, स्वतःला विठ्ठलापेक्षा मोठे कधीच मानत नाहीत. समाजात, दोन प्रकारची लोकं असतात. एक सकारात्मक दृष्टीकोन ठेवणारी व दुसरा नकारात्मक दृष्टीकोन ठेवणारी. सकारात्मक दृष्टीकोनवाले हेवा-दावा, जातीभेद, लिंगभेद वा वयोभेद ठेवत नाहीत. वारीत सर्वच जात धर्मांचे लोक एक समान वागतात. तुकारामाचे अभंग गाऊन दाखवणारे काही मुस्लीमही आहेत, ते विठ्ठलाचा महिमा सांगण्यासाठी किर्तनही करतात. त्यांना सकारात्मक विचारवाले कधीही रोखत नाहीत. त्यांचा हेवा करत नाहीत. पण, या वारकरी संप्रदायातही आता नकारात्मक विचारधाऱ्यांचा शिरकाव झाला आहे. ही मंडळी स्वतःच्या फायद्यासाठी वारकरी संप्रदायाला वेठीस धरत आहेत.

महाराष्ट्रात विविध पक्षांची सरकारे आली, त्या त्या वेळी, त्या सरकारच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची महापूजा झाली. ही इथली परंपरा आहे. पण मागच्या काही वर्षात या पूजेवरुनही वाद निर्माण होत आहेत. खुद्द विठ्ठलाला सर्व समान वाटत असताना आपण भेदभाव करणारे कोण? सध्या देशात संत परंपरेबरोबर, साधूचीही परंपरा वाढीस लागली आहे. पूर्वीचे साधू, साधना करुन ज्ञान मिळवायचे व ते ज्ञान लोकांना सांगायचे, त्यामुळे लोकांचा साधूंवर विश्वास असायचा. लोक साधूंना मानाचे स्थान द्यायचे. पण सध्या या साधू सांप्रदायात, नकली साधूंचा प्रवेश झाला आहे. त्यांना कसलेही ज्ञान-विज्ञान माहित नसते. त्यांच्या अंगावर फवत भगवी वस्त्रे असतात, देखाव्यासाठी कमंडलू व इतर साधने असतात. ही मंडळी स्वतःचे महात्म्य सांगण्यासाठी तथाकथित शिष्यगण ठेवतात. गावा-गावात जाऊन साधूचे गुणगान सांगतात व भरपूर प्रचार करतात.

आजच्या या धकाधकीच्या जीवनात प्रत्येक माणूस शारीरिक व मानसिकदृष्ट्या खचलेला, भांबावलेला आहे, त्याला या पिढातून सुटकेचा मार्ग दिसत नाही, परिणामस्वरुप ही मंडळी असल्या ‘भोंदू बाबा'वर विश्वास ठेवून सुटकेसाठी त्यांच्या आश्रयाला जातात. संधीचा फायदा घेत ही भोंदू मंडळी आपल्या भाषण कौशल्याने लोकांची मने जिंकतात व लोकांवर आपला पगडा बसवतात. त्यामुळे या भोंदू बाबाच्या भवत मंडळीत वाढ होते. पुरेसे भक्त मिळताच ही तथाकथित साधू मंडळी मेळावे भरवतात त्यात हजारो-लाखो मंडळी सामिल होतात. पण त्या येणाऱ्या भक्त मंडळीसाठी पुरेशा सोयी-सुविधा उपलब्ध केल्या जात नाहीत. त्यातच हे तथाकथित साधू अशा काही अफलातून गोष्टी सांगतात की, त्या गोष्टी मिळवण्यासाठी लोकांमध्ये चढाओढ लागते, परिणाम स्वरुप चेंगरा-चेंगरी होऊन अनेकांना आपला जीव गमवावा लागतो.

काही वर्षापूर्वी नव्या मुंबईतही एक समागम मेळावा भरला होता. उन्हाळ्याचे दिवस असल्याने, उष्माघाताने व प्यायला पाणी न मिळाल्याने काहींचा मृत्यू झाला. असेच प्रकार अनेक ठिकाणी घडत असतात. ‘हज'च्या यात्रेतही अशा घटना घडताना दिसल्या आहेत. असाच एक प्रकार नुकताच ‘हाथरस' येथे घडला व त्यात १२५ ते १३० लोकांचा मृत्यू झाला.

ज्या साधूबाबाच्या ‘सत्संग' मेळाव्यात हा प्रकार घडला. तो पूर्वाश्रमीचा गुन्हेगार पोलीस निघाला, ज्याच्यावर विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. असेच अनेक साधू सध्या ‘तुरुंगात' जेलची हवा खात आहेत. ज्यांच्यावर अनेक गंभीर आरोप आहेत. तरीही त्यांची भक्तमंडळी आजही त्यांना साधूच मानून, त्यांची आराधना करताना दिसतात तेव्हा, लोकांची किव करावीशी वाटते.

सध्या जग विज्ञानाने कुठे नेऊन ठेवले आहे आणि अंधभक्त मंडळी कुठे जात आहे. असेही नाही की, या भक्त मंडळीत फक्त अशिक्षित लोक आहेत. चांगले उच्चशिक्षितही यात आहेत. ही चिंतेची बाब आहे. खरंतर जिथे अनेक लाखांचा  समुदाय जमा होतो, तिथे असला प्रकार घडत नाही, तर जिथे काही लाख (एक दोन लाख) जमा होतात. तिथे चेंगरा-चेंगरी, व भाग-दौड होतेच कशी? वारकरी संप्रदायात श्रध्देबरोबर शिस्तीलाही महत्त्व दिले जाते. म्हणूनच वारीत असा गोंधळ पहायला मिळत नाही. -भिमराव गांधले 

 

 

 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

 हे अधिकारी तर आधुनिक राजे -महाराजे