दिवाळीत आनंदाबरोबर सुरक्षितताही जपा ! नॅशनल बर्न्स सेंटरचा नागरिकांना सावधतेचा सल्ला
‘हलाल प्रमाणपत्र'ला मात देण्यासाठी ‘ओम प्रमाणपत्र' !
एकीकडे आतंकवादाचे कंबरडे मोडण्यासाठी महासत्ता एकत्र येत आहेत तर दुसरीकडे हलाल प्रमाणपत्रांचे वाटप करून मोठी अर्थव्यवस्था उभारणाऱ्या गैरसरकारी इस्लामी संघटना आतंकवादाला रसद पुरवत आहेत. अनेक देशांनी त्यांच्या देशांत हलाल प्रमाणपत्र वाटपावर बंदी आणली आहे, भारतात मात्र या संघटनांचे जाळे समस्त राज्यांत पसरले आहे. तामिळनाडूसारख्या राज्यात तर प्रसाद बनवणाऱ्या कंपन्यांनीही हलाल सर्टिफिकेशन केले आहे. देशभरात हलाल प्रमाणपत्राचे प्रस्थ वाढत असताना प्रसादविक्रेत्यांसाठी प्रायोगिक तत्वावर सुरु करण्यात आलेले ‘ओम प्रमाणपत्र' येणाऱ्या काळात समस्त हिंदू व्यावसायिकांसाठी आणि ग्राहकांसाठी क्रांतिकारी ठरणार असल्याचे मत जाणकार व्यक्त करत आहेत.
प्रसिद्ध तीर्थक्षेत्रे आणि मंदिरांमध्ये भाविकांची नेहमीच गर्दी पाहायला मिळते. अनेक जण अशा ठिकाणी सहपरिवार दर्शनासाठी येतात. देवतेच्या चरणी लिन झाल्यावर मिळणारे चैतन्य आणि आशीर्वाद आपले मित्रमंडळी, नातेवाईक आणि शेजारीपाजारी यांनाही मिळावेत यासाठी या पवित्र ठिकाणी बाहेर दुकानात मिळणारा प्रसाद भाविक सोबत घेऊन जातात. ज्यांना हा प्रसाद दिला जातो तेसुद्धा त्या देवतेचे स्मरण करून श्रद्धेने प्रसाद ग्रहण करतात. सध्या काही तीर्थक्षेत्राचे चित्र पाहिल्यास अशा ठिकाणी गायीच्या चरबीपासून बनवलेल्या तुपापासूनचे पदार्थ, खवा, पेढा यासारखे प्रसादाचे पदार्थ विक्रीसाठी ठेवण्यात आल्याचे उघड झाले आहे.
तामिळनाडूतील काही मंदिरांत ‘हलाल' प्रमाणित प्रसाद विकला जात होता. अशा ठिकाणचा प्रसाद विकत घेऊन भक्तगण श्रद्धेने देवतेच्या चरणी अर्पण करतात, हा एकप्रकारे हिंदूंच्या धार्मिक श्रद्धेवरील मोठा आघात आहे. अनेक तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अहिंदू दुकानदारांची प्रसादाची, पूजा साहित्यांची दुकाने असतात. त्यांच्याकडील प्रसाद आणि साहित्य शुद्ध अन् पवित्र असेल, असे सांगता येत नाही. बाहेरगावाहून आलेल्या भाविकांना शुद्ध प्रसाद कुठे मिळतो, याची माहिती नसते. त्यामुळे तीर्थस्थानांच्या ठिकाणी शुद्ध प्रसादाची विक्री करणाऱ्या हिंदू दुकानदारांना ‘स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारका'चे कार्याध्यक्ष श्री. रणजीत सावरकर यांच्या ‘ओम प्रतिष्ठान”च्या वतीने ‘ओम प्रमाणपत्र (सर्टिफिकेट) देण्याचा उपक्रम चालू करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील त्र्यंबकेश्वर येथील मंदिर परिसरातील १०० प्रसाद विक्रेत्यांना ‘ओम सर्टिफिकेट' देण्यात आले आहे. ओम प्रमाणपत्र संपूर्ण देशभरातील मंदिर परिसरातील दुकानदारांसाठी चालू करण्याचे प्रयत्न ‘ओम प्रतिष्ठान”च्या वतीने केले जाणार आहेत. ‘ओम प्रतिष्ठान'च्या वतीने सुरु करण्यात आलेल्या या उपक्रमाचे स्वागत करून देशभरातील हिंदू प्रसाद विक्रेत्यांनी हे ‘ओम प्रमाणपत्र' अवश्य घ्यावे असे विनंतिवजा आवाहन तेलंगणा येथील आमदार श्री. टी. राजासिंह यांनी गोवा येथे चालू असलेल्या ‘वैश्विक हिंदु राष्ट्र अधिवेशना”च्या निमित्ताने पणजी, गोवा येथे पार पडलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना केले. देशभरात हलाल प्रमाणपत्राचे प्रस्थ वाढत असताना प्रसादविक्रेत्यांसाठी प्रायोगिक तत्वावर सुरु करण्यात आलेले ‘ओम प्रमाणपत्र' येणाऱ्या काळात समस्त हिंदू व्यावसायिकांसाठी आणि ग्राहकांसाठी क्रांतिकारी ठरणार असल्याचे मत जाणकार व्यक्त करत आहेत.
‘मांस मटण यांच्यापुरती मय्राादित असलेली हलाल संकल्पना आज सौंदर्य प्रसाधनांसह अन्य उत्पादनांच्या बाबतीतही लागू करण्यात आली आहे. काही अशासकीय आस्थापने हलाल सर्टिफिकेशनच्या नावाखाली कंपन्यांकडून पैसे घेऊन त्यांना हलाल प्रमाणपत्र आणि उत्पादनांवर छापण्यासाठी हलालचे चिन्ह देतात. हलाल प्रमाणपत्र देणारी आस्थापने अतिरेकी कारवायांमध्ये सहभागी संघटनांना सहाय्य करतात. ‘भारतीय अर्थव्यवस्थेवरील हे मोठे आक्रमण असून उत्तर प्रदेशप्रमाणे महाराष्ट्रातही हलाल प्रमाणपत्रावर बंदी घालावी' अशी मागणी मध्यंतरी विधानसभेत करण्यात आली होती. भारतात बहुसंख्य हिंदू असूनही अनेक भारतीय कंपन्या आपली उत्पादने मुस्लिमांनी खरेदी करावीत म्हणून हलाल सर्टिफिकेशन करवून घेत आहेत. हे केवळ भारतात घडतेय असे नव्हे, तर हलाल सर्टिफिकेशन आज समस्त जगाची डोकेदुखी ठरत आहे. हलाल सर्टिफिकेशनच्या नावावर जागतिक पातळीवर एक मोठी अर्थव्यवस्था उभी राहिली आहे. मुस्लिमबहुल राष्ट्रांत लोक उत्पादनांवरील हलालचे चिन्ह पाहूनच खरेदी करत असल्याने व्यवसाय वृद्धीसाठी नामांकित कंपन्याही हलाल प्रमाणपत्र घेऊन प्रतिवर्षी ते रिन्यू करत आहेत. या समांतर अर्थव्यवस्थेचा देशातील सरकारला कोणत्याच प्रकारचा लाभ होत नाही. एकीकडे आतंकवादाचे कंबरडे मोडण्यासाठी महासत्ता एकत्र येत आहेत तर दुसरीकडे हलाल प्रमाणपत्रांचे वाटप करून मोठी अर्थव्यवस्था उभारणाऱ्या गैरसरकारी इस्लामी संघटना आतंकवादाला रसद पुरवत आहेत. संभाव्य धोके ओळखून अनेक देशांना त्यांच्या देशांत हलाल प्रमाणपत्र वाटपावर बंदी आणली आहे, भारतात मात्र या संघटनांचे जाळे समस्त राज्यांत पसरले आहे. तामिळनाडूसारख्या राज्यात तर प्रसाद बनवणाऱ्या कंपन्यांनीही हलाल सर्टिफिकेशन केले आहे. नुकत्याच पार पडलेल्या टी २० विश्वचषक सामन्यासाठी वेस्ट इंडिजमध्ये आलेल्या अफगाणिस्तानच्या संघाला जेवणात हलाल मांस मिळाले नाही म्हणून त्यांनी काही ठिकाणी स्वतः जेवण बनवले; तर काही ठिकाणी जिथे हलाल मांसाचे जेवण मिळते अशा ठिकाणी जाऊन जेवण केले. हलाल इकोनॉमीला मोठे करण्याचे हे एक जागतिक षडयंत्र असून भारतीयांनी यापासून सावध व्हायला हवे. हलाल इकोनॉमीला सहकार्य म्हणजे आतंकवादाला समर्थन हे समीकरण लक्षात घेऊन हलाल प्रमाणपत्र घेणाऱ्या कंपन्यांवर, उपहारगृहांवर आणि वस्तूंवर बहिष्कार घालायला हवा! वस्तू विकत घेताना त्यावर हलाल चिन्ह आहे का पडताळावे. हॉटेल, रेस्टोरंटमध्ये जाताना बोर्डावर, मेन्यूकार्डावर हलालचे चिन्ह आहे का तपासावे. देवदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना शुद्ध प्रसाद मिळावा यासाठी ओम प्रतिष्ठानच्या वतीने राबवण्यात येणारा ओम प्रमाणपत्र वाटपाचा उपक्रम पुढील काही वर्षात हलाल इकोनॉमीचे कंबरडे मोडण्यास साहाय्यभूत ठरू शकतो यासाठी गरज आहे ती बहुसंख्य हिंदूंच्या सहकार्याची ! -जगन घाणेकर