स्कुल चले हम

चला, बघता-बघता जून महिना सरला आणि जुलै आला. मुलं शाळेत जाऊन मस्त रुळली. मित्र-मैत्रिणींमध्ये गप्पा रंगल्या. लपूनछपून आणलेल्या मोबाईलमधले गावाकडील फोटो दाखवून झाले. शिक्षकांनी पदभार स्वीकारले आणि अभ्यासक्रमास दिशा मिळू लागली.

वार्षिक परीक्षांचे निकाल लागले आणि मुले आपल्या पालकांसमवेत गावाकडल्या घरी उन्हाळी सुट्टी एंजॉय करण्यासाठी म्हणून निघून गेली. ठरल्या प्रमाणे शिक्षकांनी सुद्धा काही काळ विराम घेऊन कौटुंबिक क्षेत्राकडे लक्ष वेधले. सर्व शाळा ओस पडल्या. तेथील  परिसर शांत झाला.

आंबा-काजूच्या बागांमधून मस्त मजा करता करता सुट्टीचे दिवस कसे भुर्रर्रकन निघून गेले. हौस-मौज, खेळ, धमाल करून झाली व नकळत सुट्टी केव्हां संपली ते कळण्याआधीच पुस्तकांच्या लिस्ट, वह्या, पेन-पेन्सिल इत्यादी शालोपयोगी वस्तुंची खरेदी सुरू झाली.

पालकांची लगबग सुरू झाली. नवीन युनिफॉर्म त्याची आऊट फिटिंग, टेलरिंग सर्वांमध्ये पालकांची दमछाक होताना दिसते. त्यातंच लाजत खोम्सत आला मॉन्सून. सरीवर सरी येऊ लागल्या. यंदाचा उन्हाळा तसा गावाकडे तेव्हढा नाही जाणवला. पण शहरी भागात चाळीशी पार केलेला सूर्य ताप..असहनीय वाटला. केव्हां एकदाचा बरसतो पाऊस तोही मेघगर्जने सह! आणि खरंच बरसला मजेमजेने पाऊस!  मग आले रेनकोट, पावसाळी किटोज. छत्रीचा आधार. पालकांच्या एकूण बजेटचा पारा आणखी ताप वाढवणारा असेल. पण महागाई काही केल्या सोडेना कुणाला. सारेच हताश आणि बेजार आहेत. काय करणार? सुचेना पालकांना!

कशाबशा आपल्या पाल्यांच्या शालेय गरजा पूर्ण करून पालक लागले आपल्या इतर कौटुंबिक गरजा पूर्ण करण्याच्या तयारीत. दमछाक झालेले पालक, आर्थिक गणित विस्कटल्याने निराश दिसत आहेत.  

चला, बघता-बघता जून महिना सरला आणि जुलै आला. मुलं शाळेत जाऊन मस्त रुळली. मित्र-मैत्रिणींमध्ये गप्पा रंगल्या. लपूनछपून आणलेल्या मोबाईलमधले गावाकडील फोटो दाखवून झाले. शिक्षकांनी पदभार स्वीकारले आणि अभ्यासक्रमास दिशा मिळू लागली. पुस्तकांची पाने उलटुन नोट्‌स लिहिल्या जात आहेत. जे कळतंय ते लिहिले जाते, कळत नसेल त्याची खात्री गुगलवरून केली जात आहे. पूर्वी शिक्षकांची भीती वाटत असे म्हणून आम्ही पालकांना विचारायचो. आता पाल्ये गुगलकडे चौकशी करतात. पालक-शिक्षक खरंच दोलायमान स्थितीत आहेत का?

लगेचच शाळांमध्ये वृक्षारोपण सप्ताह सुरू होईल. त्यांतून मोकळे होतो न होतो तोच पंधरा ऑगस्ट येऊ पाहतोय. पाऊस सर्वत्र मजेशीर बरसतोय.  तिकडे ग्रामीण भागात कृषी क्षेत्रात भात, नाचणी तसेच इतरत्र अनेक पिकांची लागवड सुरू झाली असणार. कृषी प्रधान भारत देश सुजलाम सुफलाम होता, आजही आहे, यापुढेही तो राहणार. वंदे मातरम! मात्र अतिवृष्टीमुळे काही रोग डोकं काढू पाहतात. त्यापासून सर्वांनी आणि विशेषतः विद्यार्थ्यांनी काळजी घेतली पाहिजे. डांस-मच्छर, पिस्सु, डेंग्यू, तापसाळ इत्यादी रोगाची लागण होऊ नये म्हणून स्वतःची काळजी घ्यायला पाहिजे. साथीचे रोग बघता-बघता पसरतात. तब्येतीची हलाखी होतेच; शिवाय शाळेचा अभ्यास बुडतो.पालक हताश होतात.

जागतिक टी-२० क्रिकेट कप आम्ही जिंकलो. आजही सोशल मीडियावर तरुणाई जल्लोषात नाचत-गात आहे. रील बनवून एकमेकांना त्या शेअर करत आहेत. पावसाळी फुटबॉल खेळणारे तरुण रग्बी खेळायला जावे तसे चिखलात माखून आलेले दिसतील. पावसाळा आला की सर्दी पडसे, खोकला इत्यादी तब्येतीच्या कुरबुरी सुरू होतातच. घरातली वयस्कर मंडळी गूळ घालून आल्याचा तिखट काढा बनवून देतात. अनुभवी लोक असेच आसपास घरात वावरताना दिसतात. कौटुंबिक वातावरण योग्य असावे त्यासाठी वृध्द अनुभवी लोक घरात असावेत. त्यांचा अनादर होता कामा नये.

शाळा-कॉलेजात जाता-येताना गेटाबाहेर खाऊ विकत घेऊ नये. त्यांत काय असेल, नसेल, सांगणे अवघड आहे. अलिकडे अमली पदार्थांचे पेव सर्वत्र फुटल्याचे पेपरात छापून येत आहे. सोशल मीडियावरसुद्धा या विषयीं अनेकदा मार्गदर्शक लेख लिहिले जातात. घरच्या मंडळींनी आपल्या पाल्यांना गरजेपेक्षा जास्त पैसे देऊ नये. दिल्यास ते खर्च का व कसे झाले त्या विषयी विचारणा करावी.जगातील बरेचसे लोक परदर्शक वागतात. काही निवडक असतील जे वाईटपणा घेऊन जगत असतील, मग आपण अश्यांच्या नादी का लागावे?

स्कुल, शाळा, कॉलेज, क्लास इत्यादि शैक्षणिक क्षेत्रात आपली मुलं व्यवस्थित आहेत ना? याकडे पालकांचे  पूर्ण लक्ष असणे आवश्यक आहे. वाईटाचा तिरस्कार करण्यापेक्षा आपण किती परिपूर्ण वागतो, जगतो, ते महत्वाचे आहे. सर्वाना खूप खूप सदिच्छा. जय भारत! -इकबाल शर्फ मुकादम 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

नवयुवकांच्या व्यथा