विधवांना सवलती व सहाय्य करून मुख्य समाज प्रवाहात आणणे जरुरीचे !

२००५ ते २०१० पर्यंत हा दिवस श्री लंका, नेपाळ, युके यूएसए बंगला देश, दक्षिण आफ्रिका तसेच भारत या देशात साजरा केला  जाऊ  लागला. २१ डिसेंबर २०१० या दिवशी संयुक्त राष्ट्रसंघातर्फे या दिनाची अधिकृत घोषणा झाली. २०११ पासून हा दिवस अधिकृतपणे २३ जुन रोजी साजरा करण्यास सुरवात झाली.

जगात व देशात विधवांची संख्या मोठी आहे. एका अंदाजानुसार जगात २४५ दशलक्ष विधवा स्त्रिया आहेत . त्यापैकी जवळपास ११५ दशलक्ष स्त्रिया दारिद्रयात आहेत. लुम्बा फाऊंडेशन चे भगवान लुम्बा यांची आई पुण्यवती लिंबा या १९५४ साली विधवा झाल्या. त्यानंतर विधवा दिवस साजरा करावा अशी कल्पना लुंबा यांना सुचली. २००५ ते २०१० पर्यंत हा दिवस श्री लंका, नेपाळ, युके यूएसए बंगला देश, दक्षिण आफ्रिका तसेच भारत या देशात साजरा केला  जाऊ  लागला. २१ डिसेंबर २०१० या दिवशी संयुक्त राष्ट्रसंघातर्फे या दिनाची अधिकृत घोषणा झाली. २०११ पासून हा दिवस अधिकृतपणे २३ जुन रोजी साजरा करण्यास सुरवात झाली.

एकट्या राहणाऱ्या अनेक स्त्रियांची परिस्तिती अत्यंत हलाखीची आहे. अनेक स्त्रियांची मुले परदेशात नोकरीस आहेत किंवा शिकत आहेत. त्यांना आपल्या घरी एकटेच राहावे लागते. पेन्शन किंवा साठविलेली पुंजी असेल तर ठीक नाहीतर कोणी मुले बाळे नसल्यास अत्यंत अवधड परिस्थिती निर्माण होते. ज्या स्त्रिया आयुष्यभर नोकरी करत होत्या व शेवटी त्यांना वैधव्य आले त्यांना पैशाची फार चिंता नसते; पण एकटेपणाची भावना वाढीस लागते. प्रत्येक कामासाठी दुसऱ्यावर अवलंबून राहावे लागते. समाजामध्ये सुद्धा विधवांना काही ठिकाणी सन्मानपूर्वक वागणूक दिली जात नाही. अलीकडे अनेक ठिकाणी त्यांना अनेक समारंभात बोलाविले जाते व सन्मानपूर्वक वागणूक दिली जाते हे बदलत्या काळाचे निदर्शक आहे. एखाद्या स्त्रीला अकाली वृद्धत्व आले तर तिला एकटीला आयुष्य कंठावे लागते. हे टाळण्यासाठी पुर्नाविवाह करणे ही काळाची गरज आहे. यामुळे तिला पुढील आयुष्यात एका जोडीदार लाभून आयुष्य सुखात काढता येते. अशा अनेक प्रश्नांची सोडवणूक दिनाच्या निमित्ताने झाली आहे. हेच या दिवसाचे वैशिष्ट्य आहे.

सरकारनेसुद्धा विधवांना अनेक प्रकारे साहाय्य करणे जरुरीचे आहे. त्यांना नोकरीत अग्रक्रम देणे, ज्यांना शिक्षण घावयाचे आहे त्यांना सुविधा पुरविणे, त्यांना समाजात सन्मान पूर्वक वागणूक मिळेल अशा पद्धतीने नियम व कायदे करणे ही कामे केली पाहिजेत या विधवा दिनाच्या निमित्ताने या प्रश्नाला चालना देण्याचे काम सर्वांनी करायला हवे.
- शांताराम वाघ 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

मना सज्जना नियमित लेखमाला