दिवाळीत आनंदाबरोबर सुरक्षितताही जपा ! नॅशनल बर्न्स सेंटरचा नागरिकांना सावधतेचा सल्ला
मना सज्जना नियमित लेखमाला
भगवंताचे विस्मरण म्हणजे नरजन्माची हानी
आयुष्याचा जेवढा काळ भगवंताच्या विस्मरणात गेला तेवढा आपल्या आयुष्याचा नाशचझाला असे समजावे.भगवंताच्या स्मरणाशिवाय केलेले कर्म म्हणजे शरीराला झालेले केवळ कष्टच होय.
मना जे घडी राघवेवीण गेली।
जनी आपुली ते तुवा हानी केली।
रघुनायकावीण तो शीण आहे।
जनी दक्ष तो लक्ष लावूनी पाहे । श्रीराम ४६।
समर्थ म्हणतात आपल्या मनोव्यापाराकडे सावधपणे लक्ष ठेवावे. मन कोणत्या विचारांच्या संगतीत राहते याचे सातत्याने निरीक्षण करावे. दुष्ट विचारांची संगत, तामस विचारांची संगत नको. अशाश्वत विनाशी वस्तू, व्यक्तींचे विचार नकोत. समर्थांचा आग्रह आहे की मनाने सतत भगवंताचा विचार करावा. शाश्वताचे स्मरण करावे. सदा सर्वदा रामाच्या संगतीत राहावे. भगवंताचे अखंड अनुसंधान असावे. तरच परमार्थाची साधना सफल होईल. अन्यथा देहाकडून केवळ कर्मकांडेच घडतील. जे साधायला हवे ते साधणारनाही. नित्य समाधानाचा अनुभव येणार नाही. दुःखाची निवृत्ती होणार नाही.
असे झाले की मग माणसाला प्रश्न पडतो, ”मी देवाचे एवढे करतो पण देव माझ्याकडे पाहत नाही, मला मदत करत नाही. तो खरेच आहे का? असेल तर कुठे आहे?” मनुष्य देवाचे म्हणून बरेच काही करतो पण अहंतेने करतो. मी मोठी पूजा केली, मी मोठा दानधर्म केला, मी एवढी पारायणे केली, मी एवढ्या तीर्थयात्रा केल्या, सगळीकडे ‘मी चा पाढा. ‘मी चे स्मरण.आपण जे कर्म, ज्या क्रिया करतो, त्या सर्व देहाच्या सहाय्यानेच करतो. पण देहाला शक्ती, बुद्धी देणारा कोण आहे याचा विचार करत नाही. देवासाठी म्हणून जे करतो त्यातही स्वतःचा स्वार्थच मुख्य असतो. देवाचे प्रेम गौण असते. ज्या उपचारात प्रेम नसते, भाव नसतो, नम्रता नसते, ते उपचार भगवंतापर्यंत पोहोचत नाहीत. भगवंताच्या स्मरणाशिवाय केलेली कृती, गेलेला क्षण, हा व्यर्थ जातो. त्यातून काहीही लाभ होत नाही. आयुष्यातील जेवढा काळ भगवंताच्या विस्मरणात गेला तेवढा आपल्या आयुष्याचा नाशच झाला असे समजावे.
भगवंताच्या स्मरणाशिवाय केलेले कर्म म्हणजे शरीराला झालेले केवळ कष्टच होय. असे व्यर्थ श्रम करून जीव महदभाग्याने मिळालेला मनुष्यजन्म वाया घालवतो. गेलेली वेळपरत मिळवता येत नाही. वेळ निघून गेल्यावर केवळ पश्चात्ताप उरतो. शरीर जर्जर झाल्यावर माणसाला वाटते की अरेरे! आपण जसे वागलो तसे वागायला नको होते. असे वाटणे हेही भाग्याचे म्हणायला हवे कारण सगळ्यांनाच आपल्या केलेल्या कृत्याचा पश्चात्ताप होतोच असे नाही. समर्थ म्हणतात ना, आपले अवगुण जो मानी गुण। तो एक मूर्ख. खूप सावधपणे, जागरूकतेने स्वतःच्या जीवनाकडे पाहायला हवे. सज्जनांच्या संगतीत राहिले की चांगले विचार कानावर पडतात. पुन्हा पुन्हा ऐकून, नित्य सत्संग करून सुविचार मनावर बिंबतात. संत-सद्गुरूच आपल्याला जीवन कसे सुंदरतेने जगावे हे शिकवतात. समाधान कसे प्राप्त करावे हे शिकवतात. आपल्या नरजन्माचे ध्येय जे आत्मज्ञान त्याचा लाभ करून देतात. ते मिळवण्यासाठी काय साधन करावे, कसे करावे हे सांगतात.
इंग्रजी भाषेत एक सुविचार आहे, ”बेटर लेट दॅन नेव्हर” म्हणजे कधीच न करण्यापेक्षा उशिरा केले तरी चालेल. आतापर्यंतचे आयुष्य अज्ञानात व्यतीत केले. पण काही पूर्वसुकृतामुळे संत-सद्गुरूंची प्रत्यक्षात किंवा ग्रंथरूपात भेट झाली आणि डोळे उघडले तर त्याच क्षणापासून खरे जीवन सुरू करावे. आत्तापर्यंत भगवंताची ओळख नव्हती. सद्गुरूंनी ती करून दिली.यापुढे त्याला विसरणार नाही याची काळजी घ्यावी. अति दक्षतेने आपल्या ध्येयाकडे, संपूर्ण कल्याणाकडे लक्ष ठेवावे. सद्गुरूंनी सांगितलेली साधना खूप मनापासून करावी. अनाठायी कल्पना, अनावश्यक वासना, यावर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न करावेत. इंद्रियांचा निग्रह करण्याचा प्रयत्न करावा. मन दृश्य, अशाश्वत जगात रमत असेल तर त्याला धरून बांधून शाश्वत भगवंता जवळ आणून ठेवावे. तिथे एकाग्र करण्याचा अभ्यास करावा.
जेवढा वेळ आपल्याजवळ शिल्लक आहे (किती ते माहीत नाही) तो सत्कारणी लावावा. प्रपंचात आवश्यक असलेली, देहाने करायची सर्व कर्मे करावीत. पण अहंता सोडून, कर्तृत्व भाव भगवंताला अर्पण करून करावीत. भगवंतासाठी म्हणून जे पूजा, अर्चा, यात्रा इ. करतो तेकेवळ त्याच्या प्रेमासाठी करावे. प्रपंचात काही लाभ व्हावा या हेतूने किंवा स्वतःचा मोठेपणा मिरवण्यासाठी करू नये. खरे तर आपली प्रत्येक क्रिया भगवंतासाठी म्हणूनच करावी. त्याच्या कृपेनेच ती होते आहे या भावनेने करावी. या प्रकारे वाटचाल सुरू ठेवलीतर आत्मकल्याणाचे ध्येय गाठता येईल. जीवन वाया जाणार नाही. त्यासाठी अखंड सावधपणे आपल्या विचार आणि वर्तनाकडे लक्ष ठेवून भगवंताला प्रार्थना करावी, ”निशीदिनी तव मी नाम स्मरावे। विसर तुझा न पडावा। देवा प्रसाद हा मज द्यावा.”
जय जय रघुवीर समर्थ
मना सज्जना नियमित लेखमाला
भगवंताचे विस्मरण म्हणजे नरजन्माची हानी
आयुष्याचा जेवढा काळ भगवंताच्या विस्मरणात गेला तेवढा आपल्या आयुष्याचा नाशचझाला असे समजावे.भगवंताच्या स्मरणाशिवाय केलेले कर्म म्हणजे शरीराला झालेले केवळ कष्टच होय.
\मना जे घडी राघवेवीण गेली।

जय जय रघुवीर समर्थ -सौ. आसावरी भोईर