दिवाळीत आनंदाबरोबर सुरक्षितताही जपा ! नॅशनल बर्न्स सेंटरचा नागरिकांना सावधतेचा सल्ला
मुशाफिरी
आपल्याकडे नाव ही केवळ लांबून हाक मारण्याची सोय नाही. त्यात अस्मिता, देशाभिमान, ओळख, परंपरा, वारसा, प्रतिष्ठा, इतिहास असे बरेच काही दडलेले असते. म्हणून कुणी कुणाचे नाव चूकीचे उच्चारले तर राडा होतो. विशेषकरुन देश, राज्य, जिल्हा, तालुका, गाव, धार्मिक स्थळ यांच्या नावांबद्दल आपल्याकडील लोक अधिक संवेदनशील असतात. जगाच्या पाठीवर आपला भारत हा कदाचित एकमेव देश असेल की ज्याला भारत, इंडिया व हिंदुस्थान या तीन तीन नावांनी ओळखले जाते.
नावांना काही अर्थ असावा का, की नुसतीच एका नगापासून दुसरा नग वेगळा ओळखता यावा म्हणून नाव दिले जाते? नाव तसे बऱ्याच गोष्टींनाही दिले जाते. जसे गाव, शहर, बाजार, बस स्थानक, रेल्वे स्थानक, जिल्हा, तालुका, देश, खंड, औषध इत्यादी. मानवांना तर दिले जातेच; पण प्राणी-पक्षी, झाडे, नद्या, पर्वत यांनाही नावे दिली जातात. म्हणजेच नाव, ओळख, पहचान हे सारे त्या त्या मानवी जीव, वस्तू इ, बाबींच्या अस्तित्वाची व मान्यतेची घेतली जाणारी पध्दतशीर दखल आहे असे म्हटले तर ते गैर ठरु नये. नावामुळे इतिहास, भूगोल, मानसशास्त्र, समाजशास्त्र, आरोग्य शास्त्र यांमध्ये नोंदी ठेवणे सुकर होत असते.
दोन तीन पिढ्यांपूर्वी स्वातंत्र्यपूर्व काळात उपचाराच्या नीटशा सोयी नव्हत्या, रोगराई, महामारी येत असे. त्यावर योग्य त्या प्रतिबंधक लसी शोधल्या गेल्या नव्हत्या, साधने नव्हती, मोठमोठी इस्पितळे नव्हती तेंव्हा साथीच्या रोगांत अनेक महिला, बालके, ज्येष्ठ नागरिक दगावत असत. सुरक्षित बाळंतपणे होत नसत. त्यामुळे अनेक अर्भकांचे मृत्यु होत. यावर योग्य तो उपाय नसल्याने त्यावेळचे लोक भगताकडे, देवर्षीकडे धाव घेत. मग तो सांगे, ‘झाडावरुन, पानावरुन, फुलावरुन, प्राण्यांवरुन, नद्या, पर्वतांवरुन मुलांची नावे ठेव.' मग दगड्या, धोंड्या, उंदऱ्या, धोतऱ्या अशी नावे ठेवली जात. आपला समाज अनुकरणप्रिय आहे आणि देवाधर्माला मानणारेही अनेक लोक असल्याने देवी देवतांवरुनही नावे ठेवली जातात. जसे राम, लक्ष्मण, दत्तात्रय, जयराम, विष्णू, गजानन, शंकर, पुंडलिक, कुंडलिक, वि्ील, गणेश, श्रीकृष्ण, बलराम, भीम, धर्मा, शिव, अनंत, सीता, सरस्वती, लक्ष्मी, गंगा, जमुना, सिंधु वगैरे नावे. आता अशी नावे आत्या किंवा मातापित्यांनी ठेवल्यावर ती ‘सार्थ' ठरवण्याची जबाबदारी त्या त्या नामधारीकडे असते. पण प्रत्यक्षात तसे पाहायला मिळतेच असे नाही, हेही पाहायला मिळते. नावात शिव असलेल्या लिट्टेचा अतिरेकी ‘शिवरासन' याने तत्कालिन भारतीय पंतप्रधान राजीव गांधी यांची मानवी बॉम्बच्या साहाय्याने कशी हत्या केंली होती, हेही सर्वांना ज्ञात आहेच. आई-वडिलांनी मोठ्या आवडीने व शिवछत्रपतींवरील अपार निष्ठा आणि आदरापोटी आपल्या मुलाचे नाव शिवाजी ठेवावे आणि त्या मुलाने मोठे झाल्यावर पिठाची गिरणी चालवावी असाही मामला कधीकधी दिसून येतो. मातापित्याने प्रेमाने नाव ठेवावे विश्वनाथ आणि हा दिवटा मोठा झाल्यावर शेजारच्याच चौकात दारु पिऊन उताणा पडत असेल आणि म्हाताऱ्या आईबापाला किंवा त्याच्या बायकोपोरांना मान खाली घालून त्याच्या बगलेत हात घालत घरी न्यावे लागत असेल तर त्या बिचाऱ्या देवाधिदेव विश्वनाथाने करावे तरी काय?
नावे ठेवताना शवयतो आदर्शवत वाटणारी पौराणिक व्यक्तीमत्वे, देवता, यशस्वी व्यवती यांच्या नावांच्या निवडीला प्राधान्य दिले जाते. पुराणात तसे रावण, कंस, दुर्योधन, दुःशासन, हिडिंबा, कैकयी, शुर्पणखा अशा नावांचीही व्यवितमत्वे होऊन गेली आहेत. पण त्यांची नावे कुणी आपल्या मुलाबाळांना दिली आहेत असे क्वचितच दिसून येते. आपल्याकडील नाट्य-चित्रपट-मालिका सृष्टीत आई-वडिलांनी ठेवलेल्या नावाव्यतिरिक्त आणखीही एखादे नाव कुणा दिग्दर्शक, निर्माता किंवा अन्य जाणकाराने बहाल केल्याच्याही घटना आहेत. जसे राजेश खन्ना या भारताच्या पहिल्याच सुपरस्टारचे मूळ नाव यतीन खन्ना असे होते. शिवाय तो दुसऱ्या परिवारात दत्तक म्हणून गेला होता. त्याला हिंदी फिल्म जगताने राजेश खन्ना या नावाने नवी पहचान दिली व त्याच्या यशस्वितेेने प्रसिध्दीची शिखरे पादाक्रांत केली. दिलीप कुमार याचेही नाव युसुफ खान होते. त्याला दिलीप कुमार हे नाव देण्यात आले व तो सर्वधर्मियांत तुफान लोकप्रियता मिळवणारा अभिनेता ठरला. ‘जानी' अर्थात राजकुमार याचे नाव कुलभूषण पंडित होते. तर सुनिल दत्त याचे मूळ नाव बलराज दत्त असे होते व तो अभिनेता नव्हे, तर गायक बनण्यासाठी मुंबईत आला होता. पांढरे शुभ्र शूज व नृत्यनिपुणतेसाठी सुप्रसिध्द असलेल्या जीतेंद्र याचेही मूळ नाव रविंद्र कपूर असे आहे. मराठी-हिंदी सिने-नाट्य सृष्टीत सुप्रसिध्द असलेल्या नाना पाटेकरांचे मूळ नाव विश्वनाथ आहे. तर यशवंत दत्त हे नाव धारण केलेले दिवंगत अभिनेते म्हणजे यशवंत महाडिक होत. भारताची घटना ज्यांनी लिहिली त्या डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांचे मूळचे आडनाव सकपाळ होते. आंबवडे गावावरुन आंबवडेकर हे आडनाव ते लावीत असत. पण त्यांचे शालेय जीवनातील शिक्षक महादेव आंबेडकर यांनी त्यांना आंबेडकर हे आडनाव लावण्याची सूचना केल्याचे इतिहास सांगतो.
आपल्याकडे नाव ही केवळ लांबून हाक मारण्याची सोय नाही. त्यात अस्मिता, देशाभिमान, ओळख, परंपरा, वारसा, प्रतिष्ठा, इतिहास असे बरेच काही दडलेले असते. म्हणून कुणी कुणाचे नाव चूकीचे उच्चारले तर राडा होतो. विशेषकरुन देश, राज्य, जिल्हा, तालुका, गाव, धार्मिक स्थळ यांच्या नावांबद्दल आपल्याकडील लोक अधिक संवेदनशील असतात. जगाच्या पाठीवर आपला भारत हा एकमेव देश असेल की ज्याला भारत, इंडिया व हिंदुस्थान या तीन तीन नावांनी ओळखले जाते. विशेष म्हणजे आपल्या शेजारील कुरापतखोर व नासक्या मानसिकतेचा देश असलेल्या पाकिस्तानातील राजकारणी आणि तेथील सर्वसामान्य जनताही भारताचा उल्लेख ‘हिंदुस्थान' असाच करत असतात. याच परक्या आक्रमकांनी भारतावर अनेकदा हल्ले करुन आपली देवळे, दैवतांच्या मूर्ती, देवळांतील मौल्यवान चीजवस्तू यांची लूट आणि नासधूस केली. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांना तसेच भारतीय स्त्रीया, मुलींना खूप त्रास देण्याचे काम केले. त्यांच्यापैकी काहीजण धार्मिक तत्वावर फाळणी झाल्यावरही याच देशाला मातृभूमी मानून भारतातच राहिले. अनेकजण भारताच्या जनजीवनात दुधात विरघळलेल्या साखरेप्रमाणे विरघळले. त्यांच्यातील उस्ताद बिस्मिल्ला खान, अमजद अलिखान, नौशाद, नर्गिस, मीनाकुमारी, वहिदा रहमान, मुमताझ, मोहम्मद रफी, मन्सूर अलि खान पतौडी, ए.आर.रहमान या व अशा शेकडोंना तमाम भारतवासियांनी अलोट प्रेम दिले. मात्र आजही सिमेपलिकडच्यांचे काही नासके अवशेष काश्मीर, उत्तर प्रदेश, बिहार, भिवंडी, मालेगाव, बैंगनवाडी अशा ठिकाणी राहुन पाकिस्तान जिंकले की फटाके वाजवण्याचे काम करत असतात. त्यामुळे त्यांचे नाव कुठेच नको अशी देशप्रेमी नागरिकांची अपेक्षा असल्यास गैर ते काय? तरीही मूळच्या खडकी या शहराचे औरंगाबाद असे जुलमाने ठेवलेले नाव छत्रपती संभाजीनगर केले किंवा फैजाबादचे अयोध्या, अलिगढचे हरीगड, फिरोजाबादचे चंद्रनगर, मैनपुरीचे मायापुरी केले तर काही लोकांच्या पोटात मुरडा येतो. म्हणजेच नावांना अर्थ तर हवाच; पण त्यामागची पार्श्वभूमी इतिहास, तात्कालिक-प्रासंगिक कारणेही महत्वाची ठरत असतात.
अनेकांना विचित्र, अर्थ लक्षात न घेता आपल्या अपत्यांना नाव ठेवण्याची खोड असते. जसे ‘विनोद' हे नाव तसे चांगले. पण एखादे जोडपे पाहुण्यांना आपला विनोद नावाचा मुलगा दाखवताना काय सांगेल? हा बघा आमचा ‘विनोद!' यातून जोक घडण्याचीच शवयता अधिक! कारण ‘विनोद' चा अर्थ वेगळाच आहे. निमिष म्हणजे क्षणाचा किंचितसा भाग. पण हे नाव मुलाला अनेकजण ठेवू लागलेत याला काय म्हणावे? यतीन नाव ठिक आहे. त्याचा अर्थ तपस्वी असा आहे. पण कुणी आपल्या मुलग्याचे नाव यतीम ठेवले तर? त्याचा अर्थ बेवारशी, आई-बापाचा पत्ता नसलेला असा आहे. आभा म्हणजे तेज! अनेकजण आपल्या कन्येचे नाव आभा ठेवतात. (तसे तर लालुप्रसादने त्याच्या मुलीचे नाव ‘मिसा' असेही ठेवले आहे. त्याला कोण काय करणार म्हणा!) पण म्हणून कुणी आपल्या मुलीचे नाव जबा, गबा किंवा डबा ठेवले तर तो हसण्यावारी नेण्याचा विषय बनून जाईल. गेल्या काही वर्षांपासून काही जुलमी मुगल व परके इंग्रज यांच्या कालावधीत या भारतातील विविध गावे, शहरे, महानगरे, बस व रेल्वे स्थानके यांना देण्यात आलेली नावे बदलून अस्सल देशी व या भारतभूमीला शोभतील अशी नामांतरे केली जात आहेत, ही समाधानाची बाब आहे व त्याला काही अर्थ व योग्य ती कारणमीमांसाही आहे. उस्मानाबादचे धाराशिव, अलाहाबादचे प्रयाग राज, एल्फिन्स्टन रोडचे प्रभादेवी, सॅण्डहर्स्ट रोडचे डोंगरी, मुंबई सेन्ट्रलचे जगन्नाथ शंकर शेठ, करी रोडचे लालबाग, मरीन लाईन्सचे मुंबादेवी, चर्नी रोडचे गिरगाव, डॉकयार्ड रोडचे माझगाव, किंग्ज सर्कलचे तीर्थंकर पार्श्वनाथ अशी अस्सल देशी नावे देण्यात येणार असल्याने भारतवासियांनी त्याचे स्वागत करायला हरकत नाही.
मराठी मातीतल्या मराठी वळणाच्या कलाकृतींना मराठी नावे असावीत ही अपेक्षा अगदीच गैर नाही. पण गेल्या काही वर्षांत आलेल्या मराठी नाटकांची नावे पाहिल्यास वेगळाच प्रकार पाहायला मिळतो. शिवाजी अंडरग्राऊड इन भीमनगर मोहल्ला, लव्ह इन रिलेशनशिप, व्हाईट लीली ॲण्ड नाईट रायडर, ॲग्रेसिव्ह, प्रपोजल, यु टर्न, वैशाली कॉटेज, ऑल लाईन क्लीयर; तसेच मराठी चित्रपटांच्या बाबतीत म्हणायचे झाल्यास वन वे तिकीट, मिस्टर ॲण्ड मिसेस अनवान्टेड, चापेकर ब्रदर्स वगैरे. हे हिंदी सिनेसृष्टीत अनेक वर्षे सुरु आहे. जसे गॅम्बलर, दि ग्रेट गॅम्बलर, दि ट्रेन, दि बर्निंग ट्रेन, आग दि फायर, व्हिवटोरिया नंबर टू झिरो थ्री, बॉम्बे फोर हंड्रेड ॲन्ड फाईव्ह माईल्स, डॉन, ज्वेल थिफ वगैरे वगैरे..! तर ते असो. याला आपण भाषा संकर म्हणू या की भाषा भगीनींचे एकमेकींतील प्रेम म्हणू या की राष्ट्रीय एकात्मता म्हणू या? काहीही म्हणा! पण त्या म्हणण्याला काही अर्थ असू द्या, एवढेच! - राजेंद्र गोपीनाथ घरत, उपसंपादक दै. आपलं नवे शहर