दिवाळीत आनंदाबरोबर सुरक्षितताही जपा ! नॅशनल बर्न्स सेंटरचा नागरिकांना सावधतेचा सल्ला
रक्तदान करा..जीवाला जीवन द्या...
१४ जून याच दिवशी २००५ साली जागतिक रक्तदान दिवस साजरा करण्याची प्रथा सुरु झाली. जागतिक आरोग्य संघटना, इंटरनॅशन फेडेरेशन ऑफ रेड क्रॉस आणि रेड क्रिसॅट सोसायटीज यांच्या संयुक्त विद्यमाने २००५ साली प्रथम जागतिक रक्तदान दिवस साजरा करण्यात आला. त्यानंतर तो याच दिवशी जगभर साजरा करण्यात येऊ लागला. या वर्षीचे रक्तदानाचे घोषवाक्य असे आहे "years of celebrating giving thank you blood doners" या वर्षीचे घोष वाक्य आहे "Give blood and save the life" रक्त हे जीवनाचा महत्वाचा भाग आहे . एखादा माणूस रक्तदान केल्यानंतर ज्यास रक्त मिळते. जीवदान मिळते. त्यामुळे रक्तदानामुळे एखाद्याचे प्राण वाचू शकतात रक्तदान करण्याअगोदर काही काळजी घेणे महत्वाचे आहे. रक्तदानाच्या अगोदर अँटी बीऑटिक औषधे घेऊ नयेत. तसेच शरीरावर रक्तदानाच्या अगोदर टॅटू काढू नयेत. गोवर, कांजण्या इत्यादी लसीकरण केलेले नसावे. गंभीर आजार असलेल्या व्यक्तीनी रक्तदान करू नये. स्तनपान करत असलेल्या मातांनी रक्तदान करू नये. रक्तदान करणारांचे वय १८ ते ६५ या दरम्यान असावे. रक्तदान करण्याचे अनेक फायदे आहेत. रक्तदानामुळे एक जीवाचे प्राण वाचतात. रक्तदान केल्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. तसेच रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होते. हृदय रोग बरा होण्यास मदत होते. कँसरसारख्या आजाराचा धोका कमी होतो. विशेष म्हणजे मानसिक आरोग्य सुधारते. आज भारतात अनेक जण वारंवार रक्तदान करतात. सुरेश कुमार सैनी या भारतीय माणसाने एकूण १३० वेळा रक्तदान व ९३ वेळा प्लेटलेट असे एकूण २२३ वेळा दान करण्याचा विक्रम केला आहे एखादा अपघात किंवा गंभीर आजार यामध्ये रक्ताची अतिशय आवश्यकता असते रक्ताचे एकूण चार गट आहेत. याचा शोध कार्ल लँडस्टेनर याने लावला. याबद्दल या शाश्त्रज्ञाला १९३० सालचे नोबेल पारितोषिक मिळाले होते. रक्ताचे ए , बी एबी, व ओ असे चार गट आहेत. ओ गटाचे रक्त कोणत्याही रक्तगटाच्या माणसाला चालते. मानवी शरीर इतके गतिशील आहे की पोषक आहाराच्या मदतीने काही दिवसातच लाल रक्तपेशींचे पुन्हा निर्मितीकरण होण्यास सक्षम होते. जास्त प्रमाणात रक्त कमी झाल्यास मृत्यू येण्याची शक्यता असते. म्हणून रक्त देणे ही जीव वाचविण्याची कृती असते. आज अनेक ठिकाणी हॉस्पिटल्स, रक्तपेढ्या इत्यादी ठिकाणी रक्त जमा करतात. या दिवशी अनेक ठिकाणी रक्तदानाचा प्रचार केला जातो. रक्तदानाची शिबिरे आयोजित केली जातात. लोकांना याबद्दल जनजागृती केली जाते. रक्तदानाचे महत्व लोकांना समजावून सांगितले जाते. भारतात रक्तदानाची सुरवात १९४२ मध्ये झाली. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी कलकत्ता येथे एका रक्तदान बँकेची स्थापना करण्यात आली होती. लीना मुळगावकर यांनी १९५४ साली रक्तदानाबद्दल जनतेत मोठ्या प्रमाणात जागृती केली होती आपले वाढदिवस, वर्धापन दिन अशा दिवशी रक्तदान केल्याने दिवसाचे महत्व वाढते. तर मग करा रक्तदान व वाचावा एका जीवाचा जीव !...... - शांताराम वाघ, पुणे