दिवाळीत आनंदाबरोबर सुरक्षितताही जपा ! नॅशनल बर्न्स सेंटरचा नागरिकांना सावधतेचा सल्ला
या वर्षी वातावरणातील बदलाची सर्वाधिक झळ
या एप्रिल मे महिन्यात तापमान वाढीने सर्व जगाला चिंता करायला भाग पाडले आहे. जागतिक तापमान वाढ हा काय नवीन विषय नाही. ओझन वायूचे छिद्र सुई आणि दोऱ्याने शिवता येणार नाही. पण ते छिद्र अधिक मोठे होणार नाही यासाठी त्यावरील उपाय योजना जगाने करण्याची गरज आहे.
भारतातील राजस्थानमधील चुरू येथे या हंगामातील सर्वोच्च तापमान ५०.५ डिग्री सेल्सियस नोंदवले गेले, जे सामान्य तापमानापेक्षा खूप जास्त आहे. याआधी १ जून२०१९ रोजी चुरू येथे सव्रााधिक तापमान ५०.८ अंश होते. पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्लीचे काही भाग, पश्चिम उत्तर प्रदेश आणि पश्चिम मध्य प्रदेशातील अनेक भागांमध्ये परिस्थिती राजस्थानसारखी होण्याच्या मार्गावर आहे. देशातील अनेक भागांमध्ये कमाल तापमान विक्रमी पातळीपासून थंड होण्याची अपेक्षा असताना, उष्णतेची लाट आज पर्यंत कायम आहे. आपला महाराष्ट्रदेखील यातून सुटलेला नाही. महाराष्ट्रातील चंद्रपूर (४३. २), वर्धा (४२.५) व विदर्भातील इतर जिल्ह्यातील तापमान ४१ डिग्री सेल्सियसच्या वर आहे. शेतकरी राजा शेतीची कामे करू शकत नाही. सकाळी ९-१० वाजताच रस्त्यावरील वर्दळ कमी होतांना संपूर्ण मे महिन्यात दिसली. आपण म्हणजे मानवाने स्वतःहून हे संकट ओढवून घेतले आहे.
आपले जीवन अधिकाधिक सुखकर बनविण्यासाठी मानवाने निर्माण केलेल्या कृत्रिम भौतिक साधनाने ही वेळ आपल्यावर आलेली आहे. भरमसाठ जंगलतोड, डोंगरांचे सपाटीकरण, वाढते रासायनिक कारखाने आणि त्याच्या जोडीला वाढलेली सिंमेटची जंगले याने हे तापमान कमी होत नाही. यावर उपाययोजना होतात; पण त्या फक्त कागदोपत्री. प्रत्यक्षात सर्व आलबेल चालू असते. मागे एक कार्टून सोशल मीडियावर फिरताना दिसत होते, ज्यात माणसांच्या रांगा ए. सी. च्या दुकाना पुढे दिसतात; पण मोफत झाडेवाटप करणाऱ्या कडे एकही व्यक्ती फिरकत नाही. म्हणजे मानव एखादे झाड लावण्यापेक्षा कृत्रिम थंडावा निर्माण करणाऱ्या ए. सी खरेदी करण्यासाठी बाहेर पडत आहे. पण त्यांना माहीत नाही की, ओझोनचे छिद्र मोठे करायला मदत करणारा वायू ज्याला क्लोरो पलुरो कार्बन(सी.एफ.सी.) हे नाव आहे तो बाहेर पडतो. त्यामुळे खरंतर या अशा यंत्रांवर व त्या निर्माण करणाऱ्या कारखान्यावर बंदी घातली पाहिजे. वातावरणातील हरितगृह वायू जसे की, मिथेन, नायट्रस ऑक्साईड व बाष्प यांचे संतुलन होणे गरजेचे आहे. याचे संतुलन बिघडते की उष्णता निर्माण होते. त्यामुळे वैश्विक तापमान वाढ होत असते. याला असंतुलित हरितगृह परिणाम ( ग्लोबल वॉर्मिंग) म्हणतात. सुमारे १७५० मानवी क्रियांमुळे कार्बन डाय ऑक्साईड आणि इतर हरितगृह वायूंचे प्रमाण वाढले आहे. कार्बन डाय ऑक्साईड वातावरणीय एकाग्रता पूर्व-औद्योगिक पातळीपेक्षा १०० पीपीएम जास्त आहे. कार्बन डाय ऑक्साईडचे नैसर्गिक स्त्रोत मानवी क्रिया स्त्रोेतांपेक्षा २० पट जास्त असतात. मानवी क्रिया हरितगृह वायूंचे मुख्य स्त्रोेतः जीवाश्म इंधन आणि जंगलतोड ज्वलन यामुळे हवेतील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण जास्त होते. जमीन वापर (मुख्यतः उष्ण कटिबंधातील जंगलतोड) संपूर्ण मानववंशिक कार्बन डाय ऑक्साईड उत्सर्जनाच्या एक तृतीयांश भागांपर्यंत आहे.
खत व्यवस्थापन, भात शेती, जमीन वापर, पाणथळ बदल, मानवनिर्मित तलाव,पाइपलाइन तोटा आणि उत्सर्जन यामुळे मिथेन वातावरणीय एकाग्रता वाढते. किण्वन प्रक्रिया आणि लक्ष्यित करणारी अनेक नवीन शैली दुषित प्रणाली वातावरणातील मिथेन स्त्रोेत आहे. याचे संतुलन करायचे असेल तर अधिकाधिक झाडे लावली पाहीजेत ती जगवली पाहिजेत तरच हवेतील मुख्य हानिकारक कार्बनडायॉक्साईड हा वायू झाडांमध्ये शोषला जावून त्याचे रूपांतर ऑक्सिजन वायूत होईल. ही स्वच्छ हवा वातावरण बदलास थोड्या प्रमाणात रोखू शकेल. पावसाचे प्रमाण वाढेल. अन्नधान्य मोठ्या प्रमाणात पिकले जाईल. बर्फाचे वितळणे कमी होईल व समुद्राच्या पाण्याची पातळी वाढणार नाही. कोणतेही शहर पाण्याखाली जाणार नाही. कोणी या वाढत्या तापमानामुळे होरपळून मरणार नाही. जंगल वाढले, तर पर्यावरण अबाधित राहिल. हे सर्व भयंकर कृत्ये ज्या मानवाने वाढवली त्यालाच उपाययोजना करून त्यावर मात करायची आहे. सजीव सृष्टी वाचवण्यासाठी मानवा तुलाच प्रयत्न करायचे आहेत. उठ झोपेचे सोंग घेऊन तुला जास्त दिवस जगता येणार नाही. विनाश समोर दिसत आहे. त्याला सामोरे जा! मानवा सामोरे जा! - डॉ. श्रीकृष्ण दि. तुपारे, प्राध्यापक आ. प्र. वि. महाविद्यालय, नागोठणे