रामजपाने तमाशा निवडणूकीचा

ऐन सुखाच्या वयात आपल्या सावत्र आईच्या सांगण्यावरुन वडिलांनी दिलेला शब्द पाळण्यासाठी राजवस्त्र उतरवून वनवासी वल्कले रामाने धारण केली. आजच्या भोगवादी राज्यकर्त्यांनी एवढे लक्षात ठेवले, तरी देशातील कितीतरी भ्रष्टाचार कमी होईल. रामाचे जीवन, वागणे, आचरण ही सर्वांना मार्गदर्शक शिकवण होती. यासाठीच रामाचे नामस्मरण करावे असे सांगितले जाते. या रामनामाचा वापर करुन रामाच्या आदर्शाच्या विरुध्द वाटचाल सुरु आहे. सुरळीत चाललेल्या नात्या-गोत्यात, जाती-धर्मात तेढ, वादंग, कारण-अकारण भेदभाव निर्माण करुन आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी माणूसकीच्या मढ्यावर जळत्या सरणाचा वापर केला जात आहे.

अयोध्येमध्ये २२ जानेवारीला मंदिराची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली तेव्हा विविध विचारवंतानी व संतानी विरोध दर्शवत मंदिराचे अर्धवट बांधकाम असल्याचा मुद्दाही उपस्थित केला होता. त्या विरोधाला धुडकावून नरेंद्र मोदींनी मंदिराची व मुर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. त्यानंतर गदारोळ झाला, पण आता रामनवमीच्या निमित्ताने राम भवतांना हा स्वर्गीय व ऐतिहासिक संधी सनातन धर्मियांना मिळाली आहे.

तसे पाहता दरवर्षी रामनवमीला, रामजन्मोत्सव साजरा केला जातच होता. पण नुकत्याच पार पडलेल्या रामनवमीचे व उत्सवाचे चित्र जरा वेगळेच होते. जागोजागी त्या निमित्ताने रथयात्रांचे आयोजन करण्यात आले होते. मंदिरा-मंदिरात हा दिवस मोठ्या थाटात साजरा केला गेला. या मंदिरासाठी फार मोठा संघर्ष करावा लागला आहे. त्याचा कालावधी किमान ५०० वर्षाचा आहे. भारतावर आक्रमण करणाऱ्या मोगलांनी व त्यातल्या त्यात बाबराने राममंदिराच्या जागेवर बाबरी मस्जीद बांधून रामाच्या अस्तीत्वालाच धवका दिला होता. पण कालपरत्वे, अनेक संघर्षानंतर बाबरी मशीद पाडून, अयोध्येत भव्य राम मंदिराचा शिलान्यांस झाला व आता मंदिर पुर्णत्वास जाण्याच्या मार्गावर आहे. मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठाही झाली आहे.

हिच बाब घेऊन भाजपाचे कार्यकर्ते मतदारांकडे मतांची मागणी करत आहेत. राम हा आस्थेचा विषय आहे. रामभवत म्हणण्यापेक्षा मोदी भवत म्हणतात ‘रामाला ज्याने आणले त्यांनाच आम्ही सत्तेवर आणू.' खरं तर रामाला आणण्याची ताकद कुणातच नाही. राम हे नावच एवढे मोठे आहे की, ते नावच सर्वांना आणते, सर्वांना जपते व सर्वात मिसळून राहते. श्रीरामाचा अवतार झाला तो त्रेता युगात. अयोध्येचा राजा दशरथ आणि त्यांच्या तीन राण्या, कौसल्या, सुमित्रा अन्‌ कैकयी यांना एकच दुःख होते. त्यांना पुत्र संतान नव्हते. राजगादीला वारस नव्हता. राजाला राजपुत्र नव्हते. आपल्याला पुत्रसंतान व्हावे म्हणून धर्मनिष्ठ राजा दशरथाने राजगुरुंच्या मार्गदर्शनाखाली पुत्रकामेष्टी यज्ञ केला. यज्ञदेवता अर्थात अग्निनारायण हे प्रसन्न झाले. त्यांनी राजाच्या हातात प्रसादफळे दिली. तो प्रसाद भक्षण केल्यावर तीनही राण्यांना पुढे उचित वेळी चार पुत्र झाले. तो हा दिवस म्हणजे चैत्र शुध्द नवमीचा. त्या राजपुत्रांची नावे राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न अशी ठेवली गेली.

श्रीराम हे श्रीरामायण या महर्षि वाल्मिकीच्या ग्रंथाचे नायक आहेत. एक आदर्श पुत्र-पती-बंधू, स्वामी धर्मरक्षक आणि कर्तव्यदक्ष प्रजा पालक म्हणून रामाचे नाव घेतले जाते. श्रीराम हा पितृवचन पालक म्हणून रामाचे नाव घेतले जाते. श्रीराम हा पितृवचन पालक, मातृभवत, एक वचनी आणि आदर्श असे व्यवितमत्व होते. श्रीरामाने बालपणीच आपल्या गुरुंच्या यज्ञाचे, धर्माचे संरक्षण केले. दुष्ट राक्षसांचा संहार केला. अहिल्येचा उध्दार करुन त्याने पतीत पावन हे विशेषण खरे केले. राजा जनकाच्या मिथिला नगरीत जावून शिव धनुष्याचा भंग केला. भूमीकन्या सीतेबरोबर विवाह केला. श्रीराम अयोध्येचे राजपद भूषवणार म्हणून सारी प्रजा आनंदात असतानाच मातृ-पितृ आज्ञेचे पालन करीत त्याने चौदा वर्षाचा वनवास स्वीकारला. सीता हरणाच्या निमित्ताने लंकाधिपती रावण आणि त्याची राक्षससेना यांचा वध केला. मर्यादा पुरुषोत्तम हे रामाचे आणखी एक वैशिष्ट्य. श्रीरामाचे जीवन, त्याची कर्तव्य निष्ठा, संयम, शौर्य, औदार्य हे सारचे कसे अगदी वंदनीय आणि आचरणीय आहे. या आदर्श अवताराची आपल्याला सदैव आठवण राहावी आणि तो आदर्श आणि ते गुण आपण काही अंशी तरी आपल्यात उतरावेत म्हणून हे रामजन्माचे निमित्त असते. रामनवमी म्हणजेच रामजन्माच्या दिवशी देशभरातील मठ मंदिरात भजन, पूजन, कीर्तन, प्रवचन असे कार्यक्रम करुन हा जन्मोत्सव सोहळा साजरा केला जातो. काही ठिकाणी तर गुढीपाडवा ते रामनवमी या काळात रामायण गं्रथाचे वाचन, रामकथेचे निवेदन, गीत रामायणाचे गायन आदी कार्यक्रमही केले जातात. या काळाला राम नवरात्र असेही म्हणतात. मध्यान्ह काळी म्हणजे दुपारी बारा वाजता रामजन्माचा पाळणा म्हणून हा रामजन्मोत्सव केला जातो. सुंठवडा वाटला जातो.

श्रीराम ही सर्व अबाल वृध्दांची लाडकी देवता असल्यामुळे सर्व लहान थोर मंडळी या उत्सवात भाग घेतात. श्रीराम कथा ही जशी पावन तसच प्रभू रामाचे नाव हे सुध्दा पापनाशक, संकट निवारक, भवत रक्षक असे आहे. जर श्रीराम या नाम लेखनाने पाण्यावर पाषाण तरले, तर श्रध्दा, भवती निष्ठापूर्वक श्रीरामाचे नाम घेणारा नामधारक हा या भवसागरीका तरणार नाही? नवकीच तरणार, मात्र त्यासाठी त्या श्रीरामाची मनःपुर्वक उपासना करायला हवी हे विसरुन चालणार नाही. समर्थ रामदासांनी ‘श्रीराम जयराम जय जय राम' हा त्रयोदशाक्षरी मंत्र संपूर्ण विश्वाला दिलेला आहे. समर्थ रामदासांच्या या मंत्राचा पुनरुच्चार ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांनी केला. श्रीराम नामाच्या नौकेतून या भवसागरातील सर्व दुःखे, संकटे कशी तरुन जातात याचा उपदेश या दोन्ही संतानी केला. उत्तर भारतातही श्रीरामाच्या नामाचे स्मरण जप करण्याचे तुलसीदास संतानी सांगितले आहे.

रामाचे जीवन हे त्यागमय होते, दुसऱ्यांसाठी जगणारे ते जीवन होते. त्यामुळेच श्रीराम हे आदर्श ठरतात. ऐन सुखाच्या वयात आपल्या सावत्र आईच्या सांगण्यावरुन वडिलांनी दिलेला शब्द पाळण्यासाठी राजवस्त्र उतरवून वनवासी वल्कले धारण करण्याचे धारिष्ट्य प्रभू रामाने दाखवले. आजच्या भोगवादी राज्यकर्त्यांनी एवढे जरी लक्षात ठेवले, तरी देशातील कितीतरी भ्रष्टाचार कमी होईल. यासाठीच या देशात रामराज्य यावे अशी अपेक्षा नेहमी केली जाते. रामाचे जीवन, वागणे, आचरण ही सर्वांना मार्गदर्शक अशी शिकवण होती. यासाठीच रामाचे नामस्मरण सतत करावे असे सांगितले जाते. कारण जिथे राम आहे, तिथे गैर काही होणार नाही. वाईटाचे उच्चाटन होते. नामस्मरणातून सर्व काही साध्य होते. चैत्रातील कडावयाच्या उन्हातही राम नवमीचा उत्सव हा आपल्याला उत्साह देणारा ठरतो. याचे कारणच राम नावात एक प्रकारची उर्जा आहे. रामाचे नाव आणि नामस्मरण घेण्यासाठी कोणत्याही वेळकाळाची गरज नाही. प्रभाते मनी राम चिंतित जावा असे सांगून समर्थानी उठल्या उठल्या प्रातःस्मरण रामाचे नाव घेऊन आपल्या दिवसाची सुरुवात केली आहे. तर समर्थ एका श्लोकात म्हणतात मुखी घास घेता म्हणावे श्रीराम. प्रत्येक क्षणाला रामाचे नाव घेऊन एक उर्जा प्राप्त करावी. असे सांगून राम नामाच्या उर्जेचे महत्त्व रामदासासह अनेक संतानी सांगितले आहे.

श्रीराम हे हिंदु धर्मियांचे आदर्श अन्‌ लाडके दैवत आहे. जगाच्या कल्याणासाठी, धर्म रक्षणासाठी, दुष्टांच्या निर्दालनासाठी, भगवान महाविष्णूनी जे दशावतार घेतले. त्यामध्ये श्रीराम अवतार हा त्यांचा सातवा अवतार आहे. चांगले वागावे कसे, कोणत्या वेळी कोणता निर्णय घेणे उचित आहे हे रामाने जगून दाखवले. रामाने उपदेश केला नाही. तर अनुकरणीय वर्तन केले. पण आज देशात काय चालू आहे? या रामाच्या नामाचा वापर करुन, रामाच्या आदर्शाच्या अगदी विरुध्द वाटचाल सुरु आहे. सुरळीत चाललेल्या नात्या-गोत्यात, जाती-धर्मात तेढ निर्माण करुन वादंग पेटवले जात आहेत. कारण-अकारण भेदभाव निर्माण करुन आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी माणूसकीच्या मढ्यावर जळत्या सरणाचा वापर केला जात आहे. आजची नेते मंडळी श्रीरामाचा मंत्र म्हणत समोरच्या व्यवितचा गळा कापत आहेत. याला म्हणतात, ‘मुँंह मे राम और बगल में सुरी' आजची नेते मंडळी, ब्युरोक्रसी, किंवा विविध खात्यातील कर्मचाऱ्यांपैकी बरीच मंडळी, ‘खातात' एकाचे व गुण गात्यात दुसऱ्यांचे आणि  कामे करतात तिसऱ्यांचे. खाल्ल्या मिठाला जागावे असे म्हणतात, पण या युगात मिठाला जागण्याचे व दिलेले वचन पाळण्याचा विसर पडला आहे. माणूस एवढा मोठा झाला आहे की तो देवालाही (रामालाही) स्वतःचे निवास स्थान देऊ करत आहे. ज्या रामाने आपल्या पित्याच्या वचनपूर्तीसाठी राजमहालाचा त्याग केला. वनवासात चौदा वर्ष चंद्रमौळी कुटीत काढले. रेशमी वस्त्रे त्यागून वल्कले परिधान केले; ना त्यांना कशाचा मोह झाला. तरीही रामाने आपला नितीधर्म सोडला नाही, आता त्यांचे भवत सुख चैनीत जिवन व्यतित करीत, निती धर्माला बगल देत, वचनालाही विसरुन  आपली वाटचाल करत आहेत. अधर्माने वागत आहेत आणि त्यालाच रामराज्य समजत आहेत. या रामराज्याला स्वतः रामही पस्तावत असेल. म्हणत असेल की, ‘हेच का फळ मम तपाला' असल्या भवतगणापेक्षा, भवत नसलेले परवडले.

अयोध्येत हजारो कोटी रुपये खर्च करुन अलिशान मंदिर तर बनवले. पण त्यात खऱ्या रामाला जागाच नाही; नेपाळवरुन मुर्तीसाठी शाळीग्राम मागवला, त्यापासून मुर्ती घडवण्यात आली, पण ती मुर्ती म्हणजे रामाचे खरे रुप बनली नाही, त्यात टेवनॉलॉजीचा वापर करुन खेळणे बनले आहे. मात्र अंधभवत त्याला खरा राम समजू लागले आहेत. हीच शोकांतिका आहे. खरा राम तर प्रत्येक आस्तिकांच्या हृदयात बसलेला आहे. त्याला भल्या मोठ्या मंदिराची गरज नाही. खरे भवत देवाला किंवा रामाला मंदिराच्या कळसात पाहतात पण अद्याप मंदिराचा कळसच बनलेला नाही. सर्वसामान्य माणसे जेव्हा संकटसमयी बोलतात की, तो वरचा सर्व पहात आहे. जे काय करायचे तो वरचाच करेल. मग जमीनीवरची मुर्ती कोणाला पाहिल? सर्व सामान्यांचे सोडा, तज्ज्ञ डॉवटरही आपल्या परीने रुग्णाला बरे करण्याचा प्रयत्न करतात व सर्व उपाय संपल्यावर म्हणतात आता वरचाच काय ते करेल, देवावर भरोसा ठेवा.

आजही खेड्यापाड्यातून जेव्हा लोक एकमेकाला भेटतात तेव्हा त्यांच्या तोंडून पहिलाच शब्द निघतो ‘राम-राम' मेल्यावरही म्हणतात ‘राम बोलो राम' किंवा ‘आम्ही जातो आमच्या गावा; आमचा राम-राम घ्यावा.'

सध्या रामभवतांनी रामाची शिकवण तर अंगीकारली नाहीच उलट त्याच्या विपरीत वागून खुद्द रामालाच लाज वाटावी अशी वर्तणूक दिसून येत आहे. -भिमराव गांधले 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

मुशाफिरी