शेवटचा शिष्यवृत्ती अर्ज मंजूर होईपर्यंत ऑनलाईन प्रक्रिया सुरु ठेवण्याची मागणी

 

 नवी मुंबई ः नवी मुंबई शहरातील गरीब आणि गरजू विद्यार्थी शिष्यवृत्ती लाभापासून वंचित ठेऊ नयेत यासाठी ऑनलाईन शिष्यवृत्तीची द्वितीय टप्प्यातील प्रक्रियेकरिता वेबसाईट बंद न करता, विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी आणखी २ महिने मुदतवाढ देण्याची मागणी महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत यांनी समाज विकास विभागाचे उपायुवत दादासाहेब चाबुकस्वार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. अन्यथा त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

नवी मुंबईतील हजारो गरीब आणि गरजू विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहु नये म्हणून महापालिका समाज विकास विभागामार्फत घटनात्मक धोरणांची अंमलबजावणी सातत्त्याने करीत आहे. या वर्षीपासून प्रथमच ऑनलाईन शिष्यवृत्ती उपक्रम यशस्वी अंमलबजावणी कडे प्रवास करीत आहेत. परंतु, आजही ऑनलाईन प्रणालीमुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये गोंधळ निर्माण झालेला आहे. दुसरीकडे शिष्यवृत्ती करिता सदर करावयाचे पुराव्याअंतर्गत बँक पासबुक, उत्पन्नचा दाखला, जातीचा दाखला, शाळा-महाविद्यालयाकडील घोषणापत्रे तसेच इतर पुरावे, दस्तावेज याकरिता अद्यापही विलंब होत आहे. या समस्यांचा सध्या शिष्यवृत्तीसाठी अर्ज दाखल करु इच्छिणाऱ्या विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना होत आहे, अशी बाब दशरथ भगत यांनी सदर निवेदनाद्वारे महापालिका उपायुवत चाबुकस्वार यांच्या निदर्शनास आणून दिली आहे.


शिष्यवृत्ती योजना ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी अटी-शर्ती नुसार लाभार्थी म्हणून आवेदकाचे बँक खात्यासह रजिस्ट्रेशन, लाभार्थ्यांचे पुरावे उपलोड करणे, लाभार्थीच्या पात्रतेबाबत अंतिम मंजुरीचा ओटीपी प्राप्त करणे, असे तीन टप्पे आहेत. शहरातील काही राष्ट्रीयवृÀत बँकांकडून आजही विद्यार्थ्यांचे बँक खाते उघडण्यात दिरंगाई झालेली आहे. ज्या लाभार्थ्यांनी प्रथम टप्प्यात नोंदणी अर्ज भरलेले आहे, परंतु द्वितीय टप्प्यासाठी अपलोड करावयाचे आवश्यक पुरावे जमा करण्यासाठी विलंब होत आहे,असे पुरावे (बँक पासबुक, उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला, शाळा-महाविद्यालय कडील घोषणापत्रे) अपलोड करण्याची अंतिम मुदत वाढविण्या यावी. अन्यथा किमान २० हजारांहून अधिक लाभार्थी विद्यार्थी शिष्यवृत्ती नोंदणी करुनही बेदखल होतील. अनेक गरीब आणि गरजू लाभार्थीच्या वास्तव्याच्या ठिकाणी मोबाईल नेटवर्कचा अभाव, पालक व विद्यार्थी यांना ओटीपीचे अज्ञान नाही, अशा समस्या दशरथ भगत यांनी निवेदनाद्वारे महापालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्या. त्यामुळे शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळण्यासाठी अर्ज प्रक्रियेतील द्वितीय
टप्प्याच्या पुर्ततेसाठी किमान २ महिने मुदतवाढीसह संबधित योजनेची वेबसाईट बंद करु नये, अशी मागणी दशरथ भगत यांनी केली आहे. अन्यथा त्यांनी सदर घटनात्मक हक्कासाठी वंचित पालक आणि विद्यार्थी यांच्यासोबत रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

यंदा प्रथमच आग्रा किल्ल्यात साजरी होणार शिवजयंती