‘एनएमएमटी'च्या आगारांमध्ये उपहारगृह सुरु करण्याची मागणी

‘एनएमएमटी'च्या आगारांमध्ये उपहारगृह सुरु करण्याची ‘काँग्रेस'चे रविंद्र सावंत यांची मागणी

नवी मुंबई ः नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रम अर्थात ‘एनएमएमटी'च्या तुर्भे, आसूडगांव आणि घणसोली आगारामध्ये कर्मचाऱ्यांकरिता तातडीने उपहारगृह सुरु करावे, अशी मागणी ‘नवी मुंबई जिल्हा काँग्रेस'चे प्रववते तथा कामगार नेते रविंद्र सावंत यांनी महापालिका आयुवतांकडे केली आहे. राज्यात नव्हे तर देशामध्ये नवी मुंबई महापालिकेची श्रीमंत महापालिका म्हणून गणना होत आहे. नवी मुंबई महापालिकेवर चांगल्या कामकाजामुळे राज्य आणि देशपातळीवर सतत पुरस्कारांचा वर्षाव होत असतो. महापालिकेच्या अडीच हजार कोटी रुपयांच्या एफडी विविध बँकांमध्ये आहेत. महापालिकेचा सर्व नावलौकिक आणि भरभराट कर्मचारी तसेच अधिकाऱ्यांच्या परिश्रमामुळेच शक्य झालेली आहे. त्यामुळे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचीही महापालिकेने तितकीच काळजी घेणे तसेच त्यांना सुविधा पुरविणे आवश्यक आहे, असे रविंद्र सावंत यांनी महापालिका आयुवतांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे.

महापालिकेच्या परिवहन उपक्रमाचे तुर्भे, आसूडगांव आणि  घणसोली असे तीन आगार कार्यरत आहेत. ‘एनएमएमटी'च्या बसेसचे संचलन तसेच दुरुस्ती याआगारांमार्फत होत असते. सदर तीनही आगारांमध्ये महापालिका प्रशासनाने कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या सेवेसाठी उपहारगृह सुरु करणे आवश्यक आहे. कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या श्रमपरिहारासाठी लवकरात लवकर प्रशासनाने उपहारगृह सुरु केल्यास आगाराच्या बाहेर जाण्याची कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना गरज भासणार नाही. शिवाय त्यासाठी त्यांचा खर्च होणारा वेळही वाचेल. त्यामुळे ‘एनएमएमटी'च्या तुर्भे, आसूडगांव आणि घणसोली आगारामध्ये उपहारगृह सुरु करण्याबाबत कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या मागणीला महापालिका प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद देत लवकरात लवकर संबंधितांना तीनही आगारांमध्ये उपहारगृह सुरु करण्याचे निर्देश संबंधितांना द्यावेत, अशी मागणी रविंद्र सावंत यांनी महापालिका आयुवत नार्वेकर यांच्याकडे केली आहे.

 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

खारघर टाटा रुग्णालयातील प्रतिक्षा यादी संपणार