नवी मुंबई काँग्रेसचे सचिव सुधीर पाटील यांची काँग्रेसला सोडचिट्ठी

नवी मुंबई:काँग्रेस मध्ये मागील दीड दशकापासून पक्षाशी एकनिष्ठ असणारे विधमान काँग्रेस पक्षाचे सचिव सुधीर पाटील यांनी काँग्रेस पक्षाला आपल्या समर्थकांसहित सोडचिट्ठी दिली.यामुळे नवी मुंबई काँग्रेसला खिंडार पडले आहे. सुधीर पाटील यांनी दूरदृष्टी असलेल्या राष्ट्रीय भाजप पक्षात प्रवेश केल्याचे निश्चित केले आहे.

शनिवारी बेलापूर मतदारसंघाच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या समक्ष भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.यामागे नवी मुंबईचे शिल्पकार व भूमीपुत्रांचे दैवत दि. बा.पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यास काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडून कोणत्याही प्रकारची भूमिका घेतली जात नसल्याचे मुख्य कारण सांगितले जात आहे.

सुधीर पाटील २००५ पासून युवक काँग्रेसच्या माध्यमातून आपल्या राजकीय कारकीर्दीस सुरुवात केली.त्यांनी पहिले युवक काँग्रेसचे प्रभाग अध्यक्ष म्हणून काम पाहिले.त्यानंतर २००८ ला बेलापूर युवक काँग्रेसचे विभाग अध्यक्ष,२०१४ मध्ये बेलापूर विभाग युवक सरचिटणीस,२०१८ मध्ये त्यांच्या कामाचा दर्जा पाहत युवा काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्ष पदावर वरणी लागली.त्याच काळात जिल्हा काँग्रेस कमिटीवर सचिव पदावरही काम पाहिले.पण जिल्हा स्तरावर प्रमुखांचा व्हिजन असमाधानकारक वाटल्याने त्यांनी पक्ष बदलण्याचे निर्णय घेतल्याचे सूत्रांनी माहिती दिली.

सुधीर पाटील यांनी आपल्या सतरा वर्षाच्या कार्यकाळात सिडको,पालिका तसेच निमशासकीय विभागात नागरिकांच्या हक्कासाठी लढाई दिली आहे.प्रकल्पग्रस्त,भूमिपुत्रांनी पुकारलेल्या विविध आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदविला आहे.नवी मुंबईचे शिल्पकार आणि प्रकल्प ग्रस्तांचे दैवत स्व.दि. बा .पाटील यांचे नाव विमानतळाला द्यावे.यासाठी नेहमीच सहभागी झाले आहेत.आग्रोली गावातील स्मशानभूमीचा विषय यशस्वी पार पडला आहे.दरवर्षी क्रिकेट सामने भरवून नवी मुंबईतील खेळाडूंना व्यासपीठ मिळवून दिले आहे.तसेच कोरोनाच्या काळात सामाजिक कार्या बरोबरच पालिका आस्थापनेवर कार्यरत असणाऱ्या घटकांना न्याय मिळवून दिला आहे.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

जिल्हाध्यक्ष संदेश ठाकूर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत तरुण कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश