मनसेच्या रायगड जिल्हाध्यक्षपदी संदेश ठाकूर

उरण : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कट्टर व एकनिष्ठ कार्यकर्ते व रायगड जिल्ह्यात सर्वप्रथम मनसेचा प्रचार व प्रचार करणारे, शाखा स्थापन करणारे उरण तालुक्याचे सुपुत्र संदेश ठाकूर यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रायगड जिल्हाध्यक्ष (उरण पनवेल ) पदी निवड करण्यात आली आहे. उरण तालुक्यात मनसे पक्ष वाढविण्यात, पक्षाचा विस्तार करण्यात संदेश ठाकूर यांची भूमिका महत्वाची आहे. आजपर्यंतच्या कार्याची दखल घेत पक्षाने त्यांच्यावर जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविली आहे. जिल्हाध्यक्ष निवडीचे नियुक्ती पत्र राजसाहेब यांनी त्यांना दिले आहे. संदेश ठाकूर यांच्या निवडीचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात येत असून विविध क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. संदेश ठाकूर यांना जिल्हाध्यक्ष पद मिळाल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या निवडी बद्दल संदेश ठाकूर यांनी राजसाहेब ठाकरे व मनसेच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांचे आभार मानले आहे.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

काँगेसच्या सदस्यांची जास्तीत जास्त डिजिटल नोंदणी करा - महेंद्रशेठ घरत