हिंदी भाषेचा प्रसार करून तिला आंतरराष्ट्रीय वैभव प्राप्त करून द्यावे (हिंदी दिवस .. १४ सप्टेंबर)

आज भारतातील सुमारे ४३. ६३ टक्के लोक हिंदी बोलतात. त्यांची संख्या जवळपास ५२ कोटी ८३ लाख  इतकी आहे देशातील अनेक राज्यात ती एक अधिकृत भाषा आहे. जगात चायनीज, स्पॅनिश व इंग्रजी यानंतर  हिंदी भाषा म्हणजेच ती चौथ्या  क्रमांकावर आहे.

 भारत स्वतंत्र झाल्यानंतर सुमारे दोन वर्षानंतर म्हणजेच १४ सप्टेंबर १९४९ या दिवशी संविधान सभेने देवनागरी लिपीतील राजभाषा म्हणून हिंदी भाषेची  निवड केली. त्यानंतर साहित्यिक काका कालेलकर, सेठ गोविंददास, हजारी प्रसाद त्रिवेदी यांनी हिंदीचे वैभव वाढविण्यासाठी खूप प्रयत्न केले. तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी १४ सप्टें १९५३ या दिवशी हिंदी भाषा दिवस म्हणून मान्यता दिली. तेव्हापासून भारतभर १४ सप्टेंबर हा दिवस हिंदी दिवस साजरा केला जातो. याच दिवशी हिंदी भाषेतील एक साहित्यिक व्योहार राजेंद्र सिन्हा यांचा ५० वा वाढदिवस होता.  या दिवशी केन्द्र सरकारतर्फे  तसेच विविध राज्यसरकारतर्फे हिंदी भाषेच्या विकास व प्रसारासाठी अनेक कार्यक्रम पार पाडले जातात या दिवसाला धरून हिंदी सप्ताह सुद्धा साजरा केला जातो. हिंदी निबंध लेखन, वादविवाद स्पर्धा, काव्य गोष्टी, कवी संमेलन याद्वारे जनजागृती केली जाते. महात्मा गांधी यांनी १९१८ साली भरलेल्या हिंदी साहित्यिक संमेलनात हिंदी ही राष्ट्रभाषा म्हणून व्हावी हा विचार व्यक्त केला होता.

 भारतीय संविधानात ज्या २२ भाषा अधिकृत भाषा म्हणून दाखविल्या आहेत. त्यामध्ये हिंदी ही एक भाषा आहे . हिंदीला राष्ट्रभाषा करण्याच्या हालचाली करण्यात आल्या; पण त्याला दक्षिणेकडील राज्यांनी विरोध केला व त्यावेळी इंग्रजीला सुद्धा एक राजभाषा म्हणून मान्यता देण्यात आली. आजही जरी जगात हिंदी बोलणाराची भाषा चौथ्या नंबरवर असली तरीही युनोमध्ये ती अधिकृत भाषा म्हणून नाही युनोच्या अधिकृत भाषा म्हणून अरेबिक, चायनीज, इंग्लिश, फ्रेंच, रशियन व स्पॅनिश या आहेत  अटलबिहारी वाजपेयींनी युनो मध्ये हिंदी भाषेत भाषण करून एक इतिहास निर्माण केला होता. जगातील अनेक देशात उदा नेपाळ, बंगला देश, अमेरिका, ब्रिटन, जर्मनी,न्यूझीलंड, मॉरिशस , दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान इत्यादी देशात हिंदी चा प्रसार झाला आहे. हल्ली इंटरनेटच्या वापरता सुद्धा हिंदी चा प्रसार वाढत आहे. विशेष बाब म्हणजे दक्षिण पॅसिफिक मधील पेलनेशिया या फिजी नावाच्या आयर्लंडची हिंदी ही अधिकारीक भाषा आहे.

जरी हिंदी दिवस म्हणून १४ सप्टेंबर हा दिवस साजरा केला जात असला तरीही जागतिक हिंदी दिन मात्र १० जानेवारी रोजी साजरा केला जातो. १४ सप्टेंबर या दिवशी राज्यभाषा कीर्ती पुरस्कार व राजभाषा गौरव पुरस्कार देऊन अनेकांना  गौरविले जाते. गौरव पुरस्कार हा लोकांनी हिंदी भाषेकरिता केलेल्या कार्यासाठी आहे हा पुरस्कार विज्ञान व टेक्निकल या विषयातील हिंदीच्या प्रोत्साहनाबद्दल दिला जातो. १० हजाराहुन २ लाख एवढया रकमेच्या पुरस्कारांनी गौरविले जाते. प्रथम पुरस्कार दोन लाख रुपयांचा असून द्वितीय पुरस्कार दीड लाख तर तृतीय पुरस्कार ७५हजारांचा आहे. या शिवाय दहा दहा हजाराचे पुरस्कार दिले जातात. राज्यभाषा पुरस्कार हा समिती किंवा एकाद्या विभागाला देण्यात येतो. विशेषतः सरकारी कार्यालयात हिंदीच्या प्रसारासाठी व उल्लेखनीय कार्यासाठी आहे. आज हिंदी भाषेवर अनेक इंग्रजी शब्दांचे आक्रमण होत आहे.हिंदीला अधिक अधिक व्यापक प्रसिद्धी लाभली पाहिजे व तिचा प्रसार अनेक ठिकाणी व अनेक देशात होणे जरुरीचे आहे. तसेच युनोमध्ये ती  अधिकृत भाषा व्हावी म्हणून प्रयत्न करणे जरुरीचे आहे  शाळा कॉलेजमध्ये हिंदी भाषेला प्रोत्साहन देणे जरुरीचे आहे. आज साऱ्या भारतभर संपर्क असलेली भाषा म्हणून हिंदीचे स्थान आहे. - शांताराम वाघ
 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

 जागतिक ओझोन दिवस