दिवाळीत आनंदाबरोबर सुरक्षितताही जपा ! नॅशनल बर्न्स सेंटरचा नागरिकांना सावधतेचा सल्ला
वाढते धर्मांतर : एक गंभीर समस्या !
एका खटल्यातील जामिनाच्या प्रकरणी निकाल देताना अलाहाबाद उच्च न्यायालयाने देशातील वाढत्या धर्मांतराबाबत केलेल्या वक्तव्यामुळे भारतातील धर्मांतराचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. ‘उत्तरप्रदेशमध्ये निरपराध गरीब लोकांना दिशाभूल करून ख्रिस्ती बनवले जात आहे. असेच धर्मांतर होत राहिले, तर एक दिवस भारतातील बहुसंख्य लोकसंख्या अल्पसंख्य होईल.' असे वक्तव्य न्यायमूर्ती रोहित रंजन अग्रवाल यांनी करताना धर्मांतर करणाऱ्या धार्मिक मेळाव्यांवर तात्काळ बंदी घालण्याचा आदेशही दिला आहे. ‘अशा घटना राज्यघटनेच्या विरोधात आहेत,' असेही त्यांनी यावेळी नमूद केले आहे.
कैलास नावाच्या एका ख्रिस्त्याने उत्तरप्रदेशातील एका हिंंदु व्यक्तीचे धर्मांतर केले होते. या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे. त्याच्या जामिनावर न्यायालयात सुनावणी चालू आहे. ‘कैलास याच्यावरील आरोप गंभीर आहेत. अशा स्थितीत त्याची जामिनावर सुटका होऊ शकत नाही,' असे सांगत न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळला.
आजतागायत हिंदुस्थानावर अनेक आक्रमणे झाली. अरबांपासून इंग्रजांपर्यंत लुटीच्या उद्देशाने भारतात आलेल्या आक्रमकांनी देशातील वैभव तर लुटलेच; याशिवाय तलवारीच्या बळावर तर काही ठिकाणी विविध आमिषे दाखवून स्थानिक हिंंदू जनतेचे मोठ्या प्रमाणात धर्मांतर घडवून आणले. महम्मद कासीम, औरंगजेब, टिपू सुलतान, हैदराबादमधील निजाम यांनी हिंदूंचे तलवारीच्या बळावर धर्मांतर केले. ज्यांनी धर्मांतरास नकार दिला त्यांच्या कत्तली करण्यात आल्या. काश्मीर, पंजाब, उत्तरप्रदेश आणि दिल्ली या उत्तरेकडील भागात या काळात मोठ्या प्रमाणात धर्मांतर झाले.या धर्मांतरितांची संख्या एव्हढी प्रचंड होती की पुढे पाकिस्तान, अफगाणिस्तान, कंबोडिया आणि ब्रह्मदेश यांसारखे मुस्लिमांचे स्वतंत्र देश हिंदुस्थानापासून वेगळे झाले. खिस्ती धर्माच्या स्थापनेनंतर पहिल्याच शतकात (वर्ष ५२ मध्ये) सेंट थॉमस हा खिस्ती धर्मोपदेशक हिंदुस्थानातील केरळ प्रांतात आला आणि त्याने तेथे खिस्ती धर्माचा प्रसार चालू केला.
१४९८ मध्ये वास्को द गामाच्या नेतृत्वाखाली पोर्तुगिजांनी हिंदुस्थानात पाय ठेवले आणि खिस्त्यांच्या साम्राज्यवादी धर्ममताचा राजकीय प्रवास चालू झाला. वास्को द गामाच्या पाठोपाठ खिस्ती धर्मप्रसार करणारे मिशनरी आले. त्यानंतर ‘व्यापारी दृष्टीकोनातून राज्यविस्तार या तत्त्वापेक्षा ‘खिस्ती धर्मप्रसार' हाच पोर्तुगिजांचा प्रमुख हेतू झाला. त्यातून बाटवाबाटवी चालू झाली. खिस्ती मिशनरी रात्रीच्या वेळी घरामागील विहिरीत पाव टाकत आणि सकाळी लोक ते पाणी प्यायले की, ‘तुम्ही खिस्ती झालात,' असे त्यांना सांगत. घाबरलेले हिंदू ‘आपण फसलो,' असे ओळखून खिस्ती धर्माप्रमाणे वागू लागत. सेंट झेवियर हा स्वतःची धर्मांतराची रीत सांगतांना लिहितो, ‘एका मासात मी त्रावणकोर राज्यात १० हजारांहून अधिक पुरुष, स्त्रिया आणि मुले यांना बाटवून त्यांची नावे पोर्तुगीज केली. बाप्तिस्मा दिल्यावर या नवख्रिस्त्यांना मी त्यांचे देव आणि देवघर नष्ट करण्याचा आदेश दिला. अशा रीतीने मी एका गावाहून दुसऱ्या गावी जात लोकांना ख्रिस्ती बनवले. १७५७ मध्ये ‘ईस्ट इंडिया कंपनीचे राज्य बंगालमध्ये स्थापन झाले. त्यानंतर १८ व्या शतकाच्या शेवटी चार्ल्स ग्रँट या इंग्रजाने ‘हिंदुस्थानात खिस्ती धर्मप्रचार कसा करता येईल,' याविषयी प्रबंध बनवून तो ब्रिटीश संसदेत विल्यम विल्बरफोर्स, अन्य काही खासदार आणि कॅन्टरबरीचे आर्चबिशप यांच्याकडे पाठवला. चार्ल्स ग्रँटच्या या प्रस्तावावर ब्रिटिश संसदेत सतत आठ दिवस चर्चा झाल्यानंतर खिस्ती मिशनऱ्यांंना धर्मप्रसाराची अनुमती मिळाली. १८५७ च्या स्वातंत्र्य युद्धानंतर खिस्ती मिशनरी आणि ब्रिटीश साम्राज्यशाही यांचे नाते अधिक दृढ झाले. वर्ष १८५९ मध्ये ‘भारतात शक्य तितक्या लवकर खिस्ती धर्माचा जितका प्रचार आपण करू, तितके ते आपल्या साम्राज्यासाठी हिताचे आहे,' असे लॉर्ड पामरस्टनने कॅन्टरबरीच्या आर्चबिशपला सांगितले होते. इंग्रजांनी हिंदुस्थानात पाय रोवल्यानंतर ‘हिंदुस्थानी लोकांना कोणत्या भाषेत शिक्षण द्यावे,' यासंबंधी विचार चालू असतांना ब्रिटीश शिक्षणतज्ञ लॉर्ड मेकॉले याने कट्टर खिस्ती धर्मवादी आणि धर्मप्रसारक असलेल्या त्याच्या वडिलांना पत्रांतून कळवले, इंग्रजी भाषेत शिक्षण घेतलेला हिंदू कधीही त्याच्या धर्माशी बांधील रहात नाही. असे अहिंदू पुढे हिंदु धर्म कसा चुकीचा आहे आणि खिस्ती धर्म कसा श्रेष्ठ आहे, याचा ठामपणे प्रसार करतात आणि त्यांच्यापैकी काही जण खिस्ती धर्म स्वीकारतात. भारताला लुटण्याच्या आणि भारतात ख्रिस्ती धर्मप्रसार करण्याच्या उद्देशाने आलेले इंग्रज आजही काही जणांना सुधारणावादी वाटतात. आपल्या मुलाने फाडफाड इंग्रजी बोलावे यासाठी आज अनेक पालक आपल्या मुलांना मिशनरी शाळांमध्ये घालतात हे भारताचे दुर्दैवच म्हणावे लागेल.
हिंदुस्थानातील वाढत्या धर्मांतरावर आजच उपाय काढला नाही तर भविष्यात देशातील अनेक भागांत हिंदू अल्पसंख्य झाल्याचे पाहायला मिळेल हे अलाहाबाद उच्च न्यायालयाने वर्तवलेले भाकीत तंतोतंत सत्य असून देशातील काही भागांत आज हिंदू अल्पसंख्य झाले आहेत. देशात धर्मांतरबंदी कायदा लागू करण्यासाठी अनेक हिंदुत्वनिष्ठ आणि राष्ट्रप्रेमी संघटना मागील अनेक वर्षांपासून सनदशीर मार्गाने प्रयत्न करत आहेत, मात्र सरकारच धर्मांतरबंदीविषयी उदासीन असल्यामुळे वाढत्या धर्मांतरावर आळा बसलेला नाही. कोरोनासारख्या आपत्तीकाळात ख्रिस्ती मिशनऱ्यांनी मदतीच्या नावाखाली भारतातील तब्बल १ लक्ष हतबल लोकांचे धर्मांतर केल्याचे वृत्त मध्यंतरी प्रसिद्ध झाले होते. आदिवासी पाड्यांत, दारिद्रय रेषेखालील वस्त्यांमध्ये जाऊन मिशनरी थोड्या थोडक्या मदतीच्या मोबदल्यात गरीबांचे धर्मांतर करतात हे ऐकले होते; मात्र कोरोनासारख्या महामारीत जिथे सरकारने कडक लॉकडाऊन जाहीर केलेला असतानाही सरकारने घालून दिलेले नियम पायदळी तुडवून ही मंडळी धर्मांतराचा एक कलमी कार्यक्रम राबवत होती. साऱ्या जगाला समतेचा आणि निःस्वार्थ सेवेचा संदेश देणाऱ्या भगवान येशूच्या आत्म्याला त्यांच्या अनुयायांकडून गोरगरीबांच्या असहायतेचा घेतला जात असलेला गैरफायदा पाहून किती वेदना होत असतील याची कल्पनाही करवत नाही. एका हाताने द्यायचे आणि दुसऱ्या हाताने गरजवंताचा धर्म बदलायचा हा कुठला धर्मप्रसार म्हणायचा?
येशूच साऱ्या जगाचा तारणहार आहे, अशा आशयाची पत्रके आजही अनेक भागांत घराघरांत वाटली जातात, भिंतीवर अशा स्वरूपाचे संदेश काही ठिकाणी पाहायला मिळतात. हल्ली तर इंटरनेटवरसुद्धा जाहिरातींच्या रकान्यात अशा प्रकारची वाक्ये पाहायला मिळतात. धर्मांतरासाठी वातावरणनिर्मिती करण्याची ही पद्धत असून व्यवहारात पिचलेली, शारीरिक किंवा मानसिक समस्यांनी ग्रासलेली व्यक्ती अशा प्रकारच्या संदेशांना बळी पडते. ख्रिस्ती धर्मांतरित झालेली काही स्थानिक मंडळी गावागावांत जाऊन गावकऱ्यांशी त्यांच्या भाषेत संवाद साधतात, त्यांना छोटी छोटी पुस्तके वाचायला देतात ज्यामध्ये येशूला प्रार्थना केल्यावर, त्याची उपासना केल्यावर कशी दैन्य दुःख दूर झाली याचा महिमा वर्णन केलेला असतो. ग्रामीण भागांत लघुपट, स्लाईड शो आदींच्या माध्यमातून ग्रामस्थांना ख्रिस्ती धर्म स्वीकारल्यावर अनेकांची कशी भरभराट झाली हे बिंबवण्याचा प्रयत्न केला जातो. उच्चभ्रू वस्त्यांमध्ये व्यसनांपासून आणि अमली पदार्थांपासून मुक्ती देण्याचे वर्ग भरवले जाऊन त्या माध्यमातून ख्रिस्ती धर्माकडे लोकांना आकर्षित केले जाते. आदिवासी आणि गरीब वस्त्यांमध्ये पैसे, शिक्षण, धान्य, कपडे, मुलांना खेळणी, खाऊ, वैद्यकीय उपचार आदी प्रलोभने दाखवून धर्मांतर केले जाते. नैसर्गिक आपत्ती तर मिशनऱ्यांसाठी नामी संधी असते. अशा ठिकाणी मदतीच्या नावाखाली धर्मांतराचा अजेंडा राबवला जातो. वृद्धाश्रम, कुष्ठरोग निर्मूलन संस्था, रुग्णसेवा, परित्यक्तागृहे, शाळा इत्यादी सेवाकार्यांच्या आडून हिंदूंच्या धर्मांतराचे काम मिशनरी करत आहेत. मिशनऱ्यांच्या मार्फत भरवले जाणारे मोठमोठे महोत्सव हें धर्मांतराच्या हेतूनेच भरवले जातात. यावेळी अगोदरच ठरवलेल्या काही व्यक्तींना व्यासपीठावर बोलावले जाते. या व्यक्ती भयंकर शारिरिक व्याधीनी ग्रस्त असल्याचे भासवले जाते. व्यासपीठावर कर्यक्रम नियंत्रित करणारा पाद्री मोठनोठ्याने किंचाळत कोणतातरी मंत्र पुटपुटतो आणि व्याधीग्रस्त माणसाला धावायला, नाचायला प्रवृत्त करतो. काही मिनिटांपूर्वी कुबड्यांच्या किंवा अन्य कोणाच्या सहाय्याने स्टेजवर पोहोचणारा माणूस पाद्रीच्या मंत्र पुटपुटण्याने आणि किंचालण्याने वेड्यासारखा सैरावैरा धावू लागतो. हा सारा चमत्कार असल्याचे आयोजकांकडून भासवले आणि बिंबवले जाते आणि हा चमत्कार पाहण्यासाठी जमलेले भोळेभाबडे हिंदुही यावर विश्वास ठेवतात. आपण ख्रिस्ती पंथ स्वीकारला कि आपल्याही साऱ्या व्याधी दूर होऊन आपल्याही जीवनात चमत्कार घडेल या आशेने धर्मपरिवर्तन करतात.
महाराष्ट्रसारख्या पुरोगामी राज्यात जिथे अशा प्रकारचे चमत्कार करण्याचा दावा करणे कायदेशीर गुन्हा आहे. अशा राज्यातही या मिशनऱ्यांचे महोत्सव हजारोच्या उपस्थितित साजरे होतात. हिंदूंच्या प्रथा परंपरांना अंधश्रद्धेचे लेबल लावणाऱ्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीला हें दिसत नाही का? आजपर्यंतच्या राज्याकर्त्यांच्या नाकर्तेपणामुळे लडाख, मिझोराम, लक्षद्वीप, काश्मीर, नागालँड, मेघालय, अरुणाचल प्रदेश, पंजाब आणि काश्मीर राज्यांत हिंदु अल्पसंख्य झाले आहेत. स्वातंत्र्यानंतर आजपर्यंत देशातील हिंदूंचे धर्मांतरण झाल्याचे वर्षनिहाय आकडे पाहिल्यास हे असेच चालत राहिले तर काही वर्षांनी हिंदुस्थानात हिंदूच नामशेष होतील की काय असे भय वाटू लागले आहे. इतिहासात मुघलांनी मंदिरे पाडून मशिदी उभारल्या; आता बळाने नाही मात्र छळाने चर्च उभे रहात आहेत. ही राष्टीय समस्या आहे आणि तितकीच गंभीरही आहे. धर्मांतरण बंदी कायद्याची गरज यानिमित्ताने पुन्हा एकदा निर्माण झाली आहे, हेच खरे !- जगन घाणेकर