दिवाळीत आनंदाबरोबर सुरक्षितताही जपा ! नॅशनल बर्न्स सेंटरचा नागरिकांना सावधतेचा सल्ला
काहीकडे पैशाची रास, काहींना मिळेना अन्नाचा घास!
सध्या देशात दोन प्रकारची तरुणाई वावरत आहे, ज्यांना चांगल्या वेतनाची नोकरी आहे. ज्यांच्याकडे बापजाद्याचा वडिलोपार्जित व्यवसाय, धंदा आहे ती मंडळी मजा करण्यात कचरत नाहीत; तर दुसरीकडे ज्यांना आपल्या गरजा स्वतःच्या कमाईने पुऱ्या करता येत नाहीत, त्यांना आपल्या घरच्यांच्या कमाईवर अवलंबून रहावे लागते. आपले मन मारुन जगावे लागते. अशी तरुणाई वाममार्गाला लागताना दिसत आहे. अशा मंडळींचा फायदा उठवण्याचे प्रताप एकतर राजकारणी मंडळी करतात किंवा गाव-शहरांतील माफिया मंडळी म्हणजेच दोन नंबरचे धंदे करणारे उचलतांना दिसतात.
नव्वदच्या दशकात भारतात संगणक क्रांती आली. सुरुवातीला या बदलाच्या विरोधात तत्कालीन विरोधी पक्षाने आवाज उठवत निदर्शने मोर्चे काढले, बेरोजगारी वाढण्याची अशंका वर्तवली. परंतु काही दिवसातच या क्रांतीचे चांगले परिणाम दिसून येऊ लागले. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधींच्या विचाराला तळागाळातून चांगला प्रतिसाद मिळू लागला, शिक्षणक्षेत्रात आमुलाग्र बदल झाले, परिणामस्व रुप आयटी व माहिती तंत्रज्ञानाच्या जोरावर अनेक मुला-मुलींना विविध क्षेत्रात चांगल्या नोकऱ्या मिळू लागल्या. काहींनी तर या तंत्रज्ञानाच्या जोरावर परदेशात नोकऱ्या मिळवल्या. त्यामुळे त्यांच्या हातात चांगला पैसा खुळखुळू लागला. काहींचे पालक जे विविध क्षेत्रात नोकऱ्या करायचे. त्यांच्या पगाराच्या तुलनेत मुलांना कितीतरी पटीने अधिक पगार मिळू लागला.
या क्रांतीने आता वरचा टप्पा गाठला आहे. आरामशीर काम व हातात अधिक पैसा असल्याने तरुणाई मौजमजा व महागड्या वस्तंूच्या खरेदीकडे वळू लागली, त्याचा समाजावर चांगला-वाईट परिणाम दिसून येऊ लागला. ज्यांनी आपल्या संस्कारात राहून जीवन जगणे सुरु ठेवले ते आज सुखात आपले जीवन जगत आहेत. पण ज्यांना पैशाचा माज चढला ते आज दुर्देशेत जगताना दिसत आहेत. म्हणतात ना प्रत्येक नवीन शोधाचे चांगले वाईट परिणाम असतात ते खरेच आहे.
आता तर जवळपास कोणत्याही क्षेत्रात जा, तेथे मुबलक पगारासह अनेक सवलती मिळतात. पूर्वी खर्चासाठी खिशात रोख रवकम ठेवावी लागायची, ती रवकम सांभाळणे महाकठीण काम असायचे, कारण गर्दीतून प्रवास करतांना, मग तो बसचा प्रवास असो वा रेल्वेचा, चोऱ्या पाकीटमाऱ्या हे अटळच असायचे, या नवीन क्रांतीने ‘डिजिटल' पेमेन्टची सोय झाल्याने आता कोणी पाकिटात पैसे ठेवत नाही. अगदी लहानमोठ्या खरेदीसाठीही क्रेडिट कार्ड, गुगल पे, पे.टी.एम.चा वापर सर्रास वाढला आहे. त्यामुळे पाकिटमाऱ्यांचा धंदा जवळपास संपल्यात जमा आहे. पण चोर हे क्रांतीच्या पुढचे असतात आता त्यांनी याच क्षेत्रात प्रगती करत, ऑनलाईन फ्रॉड करण्याचे तंत्र वाढले आहे. त्यामुळे नोकरी करणारा असो, व्यापार करणारा असो व फ्रॉडने पैसे कमावणारा असो, यांच्याकडे मुबलक पैसा येताना दिसत आहे. आलेल्या पैशाचा विनियोग कसा करायचा हाच प्रश्न त्यांच्यापुढे उभा असतो. त्यामुळे त्यांचा समज असा झाला आहे की, खर्च करण्यासाठीच पैसे मिळवायचे असतात. हे खरे असले, तरी ते किती आणि कोठे खर्च करावेत याबाबत प्रत्येक पिढीची मानसिकता वेगळी असते. पूर्वीची पिढी हात राखून खर्च करणारी होती आणि नव तरुणाई भरपूर पैसे खर्च करतांना दिसत आहे. काळानुरुप असे बदल अपेक्षितच असतात. वय हा पैशाच्या खर्चातील मोठा घटक असतो. कोणत्या वयात काय खरेदी करावी हे समजण्यासाठी हा घटक उपयुवत ठरतो.
सध्याच्या काळात ग्राहकाचे हे वय सात वर्षांनी घटले आहे. महागडे कपडे, महागड्या चैनींच्या वस्तु, महागडे आयफोनसह किंमती गाड्या (मोटारी, बाईक) मोठ्या स्क्रिनचे टिव्ही, मोठी घरे व त्यात किंमती फर्निचर व इंटिरिअरसह आलिशान वस्तु खरेदी करणारे शौकिन कमी नाहीत. तरुणाईचा खरेदीचा हा कल पाहून उत्पादक कंपन्याचा पूर्वीचा विचार बदलून, आपापल्या उत्पादनात नवनवीन डिझाईनसह त्यातील आधुनिक फेरबदल करण्यात येत आहेत. या फेरबदलात वारंवार नाविन्य आणले जात आहे. परिणामस्वरुप आजची नवीन असणारी सुविधा उद्या ती जुनी वाटू लागली जात आहे. त्यामुळे ग्राहकांच्या आवडी-निवडीही बदलू लागल्या आहेत. पूर्वीचा ग्राहक हा किमान चाळीशीचा असायचा त्याचे वय सध्या तीसवर येऊन ठेपले आहे.
देशातील ७० % इलेविट्रक कारची खरेदी २० ते ३० वर्षाच्या ग्राहकांकडून होत असल्याचा निष्कर्ष समोर आला आहे. याच काळात ॲप्पलच्या आयफोनची खरेदी करणाऱ्या ग्रहाकांचे सरासरी वय ३३ ते ३४ वर्षावरुन २८-२९ वर्षावर आणि ५५ इंच किंवा त्यापेक्षा मोठ्या स्क्रिनचे टीव्ही खरेदी करणाऱ्या ग्राहकाचे सरासरी वय ३५-३६ वर्षावरुन २९-३० वर्षावर असल्याचे उद्योग समुहाचे तज्ज्ञ म्हणतात. फ्रॉस्ट फ्री रेफ्रीजरेटर किंवा डिश वॉशरची खरेदी करणाऱ्यांचे वयसुध्दा कमीच असल्याचे दिसून येत आहे. मोटारींच्या किंमती वाढत असल्या, तरी मागणीचे प्रमाण घटताना दिसत नाही. मोटारींच्या किंमती वाढल्या व त्यांच्या इंधनाचा दरही कितीही वाढला तरी सध्याची तरुणाई त्यांची तमा न बाळगता त्या खरेदी करण्याकडे वळत आहेत. ही तरुणाई महत्वाकांक्षी असून, नवीन तंत्रज्ञान आणि कनेवटीव्हीटी या त्यांच्या गरजा असून, त्यासाठी जास्त पैसे देण्याची त्यांची तयारी आहे. कामकरी वर्गात तरुणांचे प्रमाण वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे.
पूर्वीसारखी परिस्थिती राहिलेली नाही, सध्याची तरुणाई कामावर रुजू होताच मिळणारे भरभवकम वेतन आणि कन्झूमर फायनान्ससारख्या सुविधांमुळे ग्राहकांचा कल महागड्या वस्तुंच्या खरेदीकडे वळतांना दिसतोय. पूर्वी नोकरीला लागताच काही हजाराची सॅलरी मिळायची. तिच आता काही लाखावर पोहचली आहे. त्यामुळे नोकरीला लागताच त्यांना किमान दहा लाखाची गाडी, किंवा स्मार्टफोन ज्याची किंमत लाखाच्यावर असली तरी या तरुणाईला ते महाग वाटत नाही.देशात सध्या दळण-वळणासाठी वापरण्यात येणारे रस्ते कमी पडू लागले आहेत. सरकारने वा विविध संस्थांनी गेल्या काही वर्षात नवनवीन रस्त्यांची, पूलांची, ओव्हर ब्रीजची सोय करण्याचा सपाटा लावला आहे. पूर्वीचे दोन पदरी-तीन पदरी रोड केव्हाच बाद होऊन त्याठिकाणी सहा पदरी, आठ पदरी रोड झाले तरीही, ट्रॅफिक जॅमची समस्या वाढतच आहे.
जेवढ्या प्रमाणात रस्ते बांधणी वाढत आहे, त्याच्या दुप्पट-तिप्पट प्रमाणात रस्त्यावरील मोटारींची वर्दळ वाढली आहे. याचे कारण २० ते ३० वर्ष वयातील ‘व्हाईट कॉलर' जॉब करणारे लोकसुध्दा वाढतांना दिसत आहेत. ज्यांना स्वतःचा जॉब नाही ते आपल्या बापजाद्याच्या कमाईवर आपले हे महागडे ‘शौक' पूर्ण करताना दिसून येत आहेत. सध्या देशात दोन प्रकारची तरुणाई वावरत आहे, ज्यांना चांगल्या वेतनाची नोकरी आहे. ज्यांच्याकडे बापजाद्याचा वडिलोपार्जित व्यवसाय, धंदा आहे ती मंडळी मजा करण्यात कचरत नाहीत; तर दुसरीकडे अशी बरीच मंडळी आहेत, ज्यांना आपल्या गरजा स्वतःच्या कमाईने पुऱ्या करता येत नाहीत, त्यांना आपल्या घरच्यांच्या कमाईवर अवलंबून रहावे लागते. आपले मन मारुन जगावे लागते. अशी तरुणाई वाममार्गाला लागताना दिसत आहे. अशा मंडळींचा फायदा उठवण्याचे प्रताप एकतर राजकारणी मंडळी करतात किंवा गाव-शहरांतील माफिया मंडळी म्हणजेच दोन नंबरचे धंदे करणारे उचलतांना दिसतात. या बेरोजगार तरुणाईकडून ही गुंड मंडळी आपला स्वार्थ व मतलब साधून घेतात व या तरुणाईला चार पैशाच्या मोहात अडकवून आपले बेकायदेशीर धंदे चालवून घेतात. त्यातून त्यांना भलामोठा लाभ होतो. त्यातलाच काही भाग या तरुणाईच्या तोंडावर फेकला जातो, या मिळणाऱ्या पैशाचा विनियोग ही मंडळी आपली ‘दुधाची तहान ताका'वर भागवत आपली वाटचाल करतात. मात्र ते पूर्णपणे सुखी वा समाधानी दिसून येत नाहीत. याच निराशेच्या वैफल्यातून त्यांच्याकडून इतरही अपराध घडताना आपण पहात असतो. याचे सरकारला काहीही वाटत नाही. मग ते सरकार कोणत्याही पक्षाचे असो, पण गत दहा वर्षात अपराधाचे प्रमाण वाढल्याचा निष्कर्ष समोर आला आहे. इतर अपराधाबरोबरच मानव तस्करीचे व महिलांवरील अत्याचाराचे प्रमाणही वाढल्याचे सांगितले जात आहे. यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न कोणी करील काय?
तरुणाईच्या या वैफल्यावर सध्या तरी विचार करायला कोणत्याच नेत्याला वेळ नाही. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणूकीत विजयी झालेल्या पक्षांना आपापले सरकार सत्येवर आणण्यासाठी कसरत करावी लागत आहे. खासदार फोडाफोडीसाठी अनेक वैकल्पे शोधली जात आहेत. मोठ्या प्रमाणात घोडेबाजार जोरात सुरु आहे. अनेक पक्षांना वा पक्षाच्या नेत्यांनी विविध प्रलोभने दाखवली जात आहेत. तर काही नेते मंडळी आपले म्हणणे मान्य करुन घेण्यासाठी व सरकारला पाठिंबा देण्यासाठी अनेक अटी-शर्तीचा वापर करत आहेत.. त्या अटी-शर्ती मान्य केल्या तरी, अटी-शर्ती घालणाऱ्यांचा पूर्ण भरवसा काय? कारण मागणाऱ्यांची भूक कधीच क्षमत नाही. उलट ती वाढतच जाते आणि शेवट अपचनात होतो.
त्याचा परिणाम सरकारवर होतोच, पण मोठा परिणाम तरुणाईवर होतो, त्यांच्या कमाईवर होतो. त्यांच्या समस्यांवर होतो. त्यांची कमाई घटली की, त्यांच्या लागलेल्या आलिशान खरेदी व जगण्यावर होणार हे ओघाने आलेच. मग ही मंडळी आपापल्या शकलीनुसार, भ्रष्टाचार व व्यभिचारच्या माध्यमातून आपापल्या इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार यात दोष कोणाचा? लोकांनी निवडून दिलेल्या नेत्यांचा की, वहावत गेलेल्या तरुणाईचा? -भिमराव गांधले