संजय राऊत यांच्या हस्ते कोपरखैरणे मधील पाच शाखांचे उद्‌घाटन

 शिवसैनिकांनो! गद्दारांना कायमचे गाडा
 

नवी मुंबई ः ‘शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे' मधून गद्दार, पळपुटे, ठेकेदार आणि दलाल निघून गेले आहेत. निखाऱ्यावर जी राख साचली होती ती उडाल्याने निष्ठेचा निखारा धगधगला आहे. शिवसेना अमरज्योत आहे. तिच्यावर
कोणी कितीही गुळण्या टाकण्याचा प्रयत्न केला तरी ती विझणार नाही. त्यामुळे पुन्हा तोंड वर करणार नाहीत अशा पध्दतीने गद्दारांना असे गाडा, असा घणाघात शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी कोपरखैरणेे मध्ये केला. नवी मुंबईमध्ये कोपरखैरणे परिसरात उपशहरप्रमुख मधुकर राऊत (सेक्टर-३), विजयानंद माने (सेक्टर-६), किरण हिनुकले (सेक्टर-८), रवींद्र म्हात्रे (सेक्टर-८) आणि विजय शेट्टे (सेक्टर-१५) यांनी नव्याने सुरु केलेल्या शिवसेना शाखांचे उद्‌घाटन २५ डिसेंबर रोजी खासदार संजय राऊत यांच्या हस्ते झाले. त्यावेळी खा. राऊत यांनी उपस्थितांना संबोधित व्ोÀले. यावेळी हजारो शिवसैनिकांनी खा. संजय राऊत यांचे भगव्या जल्लोषात जोरदार स्वागत केले. ‘शिवसेना झिंदाबाद, कोण आला रे कोण आला शिवसेनेचा वाघ आला' या घोषणांनी संपूर्ण कोपरखैरणे दणाणून निघाले. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना खासदार राऊत म्हणाले की, शिवसेना दोन झाल्या आहेत, असे काहीजण बोलतात. मात्र, शिवसेना शिवसेनाप्रमुखांचीच असून ती एकच आहे. दुसरा आहे, तो गट आहे. त्याला जास्त किंमत द्यायची नाही. ‘शिवसेना'ला संकटे आणि संघर्ष नवीन नाही. या संकटातूनही शिवसेना उभारी घ्ोणार आहे, असा विश्वासही खा. संजय राऊत यांनी यावेळी व्यक्त केला.

शिवसेना शहरप्रमुख प्रवीण म्हात्रे यांनी आयोजित केलेल्या धर्मवीर चषक क्रिकेट स्पर्धेचे बक्षीस वितरणही खासदार राऊत यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी खासदार राजन विचारे, संपर्कप्रमुख नीलेश पराडकर, संपर्कप्रमुख विद्याधर  व्हाण, जिल्हाप्रमुख वि्ील मोरे, द्वारकानाथ भोईर, उपजिल्हाप्रमुख मनोज हळदणकर, जिल्हा संघटक सौ. रंजना शिंत्रे, उपजिल्हा संघटक वैशाली घोरपडे, शहरप्रमुख विजय माने, माजी नगरसेवक चेतन नाईक, आदि उपस्थित होते. शिवसेनाप्रमुखांनी माकडांची केली माणसे... हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी वेळ जात नाही म्हणून शिवसेना स्थापन केली नव्हती. तर मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी शिवसेना स्थापन झाली आहे.  शिवसेनाप्रमुखांनी माकडांना माणसे बनवली, माणसांना सरदार केले आणि त्याच सरदारांना पाठीत खंजीर खुपसला. खरे तर गद्दारांना ढाल-तलवार मिळण्याऐवजी खंजीरच निवडणूक चिन्ह मिळायला पाहिजे होते, असाही समाचार खासदार राऊत यांनी यावेळी घ्ोतला. त्याच कोठीत तुम्हाला जावे लागणार...

माझा आवाज दाबण्यासाठी मला जेलमध्ये टाकले. तरीपण माझा आवाज दबला नाही. कारण मी शिवसेनाप्रमुखांचा शिवसैनिक आहे. ज्या कोठडीत मी रहायला होतो, त्याच कोठडीत तुम्हालाही जावे लागणार आहे. तुमच्या फायली तयार आहेत. आमचे सरकार आले की तुमची कोठडी नक्की आहे, ते गद्दारांनी विसरु नये, असा इशाराही खासदार राऊत यांनी यावेळी दिला.

पुन्हा एकदा उध्दव ठाकरे...
दरम्यान, येत्या फेब्रुवारी नंतर राज्यातील सर्व सत्ता समीकरण बदलले जाणार आहे. अलिबाबा आणि ४० चोरांचे काही खरे नाही. पण, आमच्यातून जरी ४० घरी गेले तरी आपल्याला १४० आमदार निवडून आणायचे आहेत. तेव्हा सज्ज
व्हा...पुन्हा एकदा उध्दव ठाकरे. महाराष्ट्राच्या विधानसभेवर आमचीच सत्ता येणार असून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री शिवसैनिकच होणार, असा विश्वासही खा. संजय राऊत यांनी यावेळी व्यवत व्ोÀला. तसेच नवी मुंबई शहर कायम
शिवसेना पक्षाच्या पाठिशी राहिले आहे. नवी मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीतही शिवसेनाचा भगवा फडकणार असून महापौर देखील शिवसेनेचा होईल, असेही राऊत म्हणाले. यंदा शिवतिर्थावरील ‘शिवसेना'च्या दसरा मेळावावेळी मी जेल मध्ये होतो. पण, भूमीपुत्र मैदानावरील शिवसैनिकांची गर्दी बघून मला शिवतिर्थावरील दसरा मेळाव्याला आलो की काय? असे वाटले. तेव्हा काय हे मैदान आणि काय हे शिवसैनिक, नो खोके-एकदम ओके असे बोलून खा. संजय राऊत यांनी येथे जमलेली गर्दी विनाखोवयाची आहे. शिवसैनिकांचा उत्साह बघून आपण कुठेतरी तरी युध्दासाठी तयार झालो असल्याचे जाणवते. आम्ही भूमीपुत्रांच्या मैदानावर आहोत. आमची पळवुÀट्यांची नव्हे संकटावेळी विरोधकांच्या छाताडावर उभी राहणारी शिवसेना आहे. आम्हाला कितीही धमकी द्या, खोट्या पोलीस कारवाया करा, हद्दपार करा, तुरुंगात डांबा नाहीतर काहीही करा आम्ही गप्प
बसणार नाही, असा इशाराही खा. राऊत यांनी शेवटी विरोधकांना दिला.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

 आमदार गणेश नाईक यांच्या लक्षवेधीवर सरकारची  ग्वाही