राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडुन राज्य सरकारचा जाहिर निषेध
नवी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना विधानमंडळातून निलंबित केल्याने पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने या अन्यायकारक घटनेचा निषेध म्हणून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पनवेल मधील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे जाहीर निदर्शने केली. तसेच विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर आणि घटनाबाह्य सरकारचा निषेध केला.
प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सचिव सूरदास गोवारी, जिह्याचे अध्यक्ष सतीश पाटील, जिल्हा उपाध्यक्ष आर.एन. यादव,ज्येष्ठ नेते सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष किशोर देवदेकर, माजी नगराध्यक्ष सुनील मोहड, माजी नगरसेवक सुनील नाईक या प्रमुख पदाधिका-यांसह राष्ट्रवादीचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते