आरपीआयचे नवी मुंबई महानगरपालिकेविरोधात हल्लाबोल आंदोलन    

नवी मुंबई : नवी मुंबईत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यात यावा या प्रमुख मागणीसह महापालिकेचे शहर अभियंता यांना पदावरून हटविणे यासह इतर मागण्यासांठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नवी मुंबईच्या वतीने मंगळवारी दुपारी वाशीतील शिवाजी चौकात नवी मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासना विरोधात हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष माजी आमदार सुमंतराव गायकवाड तसेच पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष व निरीक्षक सिद्राम ओहोळ मराठा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब मिरजे, नवी मुंबई जिल्हा युवक अध्यक्ष यशपाल ओहोळ यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.  

या हल्लाबोल आंदोलनात नवी मुंबईत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यात यावा या प्रमुख मागणीसह नियमबाह्य व स्वतच्या मार्जितल्या अधिकारी, राजकीय पक्षाच्या लोकांना कामे देऊन त्यात भ्रष्टाचार करणा-या शहर अभियंता यांना पदावरुन हटविण्याची मागणी करण्यात आली. त्याचप्रमाणे झोपडपट्टी वासीयांना लवकरात लवकर फोटो पास द्यावा, गुन्हे दाखल झालेल्या संबंधित अधिकारी, डॉक्टर यांना निलंबित करावे, सफाई कामगारांना समान काम, समान वेतन देणे, फेरीवाला धोरण राबविण्यात यावे तसेच वाशी येथील महापालिकेच्या रुग्णालयात सुपर स्पेशालिस्ट डॉक्टरांची सोय व एमआरआय मशीनची सोय उपलब्ध करुन द्यावी. आदी मागण्याही आंदोलनकर्त्यांनी केल्या. या आंदोलनात महिला जिल्हा अध्यक्ष शीलाताई बोदडे, नंदा गायकवाड, रमेश बोदडे, बाळू गायकवाड, अभिमान जगताप, यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.  

 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटीची बांधकामे नियमित करताना एकच दर आकारण्याची मागणी